धाडसी पत्रकाराचे वृत्तांकनानुभव...

एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकी गुप्तचर संस्था नॅशनल सिक्युरिटी एजन्सी अर्थात एनएसएची इराक, अफगाणिस्तान युद्धासंबंधित संगणकीय व्यवस्थेत उपलब्ध गुप्त कागदपत्रे, माहिती ‘हॅक’ करून फोडली. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’चे धाडसी पत्रकार ग्लेन ग्रीनवाल्ड यांच्याकडे या सर्व गुप्त माहितीचे डिजिटल बाड स्नोडेनने हाँगकाँगमध्ये झालेल्या भेटीत सुपूर्द केले. पुढे ग्रीनवाल्ड ही माहिती अभ्यासून मानवतेला काळिमा फासणाऱ्या युद्धासंदर्भात खळबळजनक तथ्ये सादर करतात आणि अमेरिकेचा ‘(स्वयंघोषित) लोकशाहीचा पुरस्कर्ता’ हा मुखवटा उतरवतात. २०१२ साली ग्रीनवाल्ड यांनी स्नोडेनकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे ‘द गार्डियन’मध्ये वृत्तांकन केले. ग्रीनवाल्ड २०१८ नंतर पुन्हा चर्चेत आले ते ब्राझीलचे नवनिर्वाचित अध्यक्ष जाइर बोल्सोनारो आणि ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर्जिओ मोरो यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडणाऱ्या वार्तांकनामुळे. ग्रीनवाल्ड यांनी या सर्व वार्तांकनांविषयीचे अनुभव ‘सीक्र्युंरग डेमॉक्रसी : माय फाइट फॉर प्रेस फ्रीडम अॅण्ड जस्टिस इन बोल्सोनारोज् ब्राझील’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल...