Posts

संशोधकाची नव्वदी

Image
 वर्ष १९६०. तिचं वय २६. आफ्रिकेतील टांझानिया स्थित ‘गोम्बे नॅशनल पार्क’मध्ये सलग चार-पाच महिने ती तळ ठोकून होती, केवळ एका गोष्टीसाठी, ती म्हणजे या नॅशनल पार्कमधील चिम्पांझी माकडांनी तिला स्वीकारावं! तिला त्यांच्या जवळ येऊ द्यावं म्हणून. अखेर काही महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी या मोहिमेत ती यशस्वी झाली. चिम्पांझींच्या या वर्तनशास्त्राचा तिला सूक्ष्म अभ्यास करायचा होता. या अभ्यासावर तिनं नंतर काही प्रबंध लिहिले, त्यातल्या निष्कर्षांनी प्राणी अभ्यासकांची झोप उडवली. त्यांच्या समजेची मुळंच हलली. तारुण्यातली गुलछबू स्वप्नं पाहण्याऐवजी ही तरुणी गोम्बेतल्या चिम्पांझीवर संशोधन करत होती. त्या संशोधनाचा निष्कर्ष होता, की सर्वच माकडं काही शाकाहारी नाहीत. तिनं चिम्पांझी माकडांच्या टोळ्यांची युद्धं स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली. टोळीवर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांचे लचके तोडणारे चिम्पांझी तिनं पाहिले. चिम्पांझींवरच्या अनेकअंगी संशोधनावर तिनं केंब्रिजमधून ‘पीएच.डी.’ मिळवली… ही मुलगी म्हणजे ज्येष्ठ निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासक डॉ. जेन गुडाल.    ३ एप्रिल १९३४ रोजी जेन यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांच्या

साहित्य - सिनेमा २०२३

Image
 वाचन लिखानाच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष काही फार चांगलं गेलं नाही. कारण मागील दोन वर्षात जेव्हढं वाचन लेखन झालं त्या तुलनेत या वर्षी काहीच झालं नाही. आॅक्टोबर मध्ये एक परीक्षा असल्याने आॅगस्ट सप्टेंबर मध्ये त्याचा अभ्यासच सुरु होता. पण काही पुस्तकांनी मात्र खूपच चांगला वाचनानंद दिला. काही पुस्तकांनी अंतर्मुख व्हायलाही भाग पाडलं. उगाच लांबण न लावता वर्ष २०२३ मध्ये वाचलेली पुस्तके, पाहिलेले सिनेमे/डाॅक्युमेंटरी वाचलेले दिवाळी अंक यांची ही यादी. वाचलेली पुस्तके (२०२३) मराठी १) महाराष्ट्राची लोकयात्रा - डाॅ. सदानंद मोरे २) आय ॲम ओके यू आर ओके - थाॅमस हॅरिस - अविनाश ताडफळे ३) कालान्तर - अरूण टिकेकर ४) दृष्टिभ्रम - डाॅ. बाळ फोंडके ५) उद्या काय झालं - डाॅ. बाळ फोंडके ६) माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर ७) जगप्रसिद्ध विज्ञानकथा - निरंजन घाटे ८) चिरंजीव - डाॅ.बाळ फोंडके ९) जनक - शार्दुल सराफ (नाटक) १०) प्रेषित - जयंत नारळीकर ११) गर्नसी वाचक मंडळ - मेरिअॅन शाॅफर १२) चित्रपट प्रवाहांचा इतिहास - गणेश मतकरी १३) सिनेमाची गोष्ट - अनिल झणकर १४) निसर्गकल्लोळ - अतुल देऊळगावकर १५) पश्चिमप्रभा - महेश एलकु

प्रेरणादायी जीवन कहाणी

Image
  शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये (बी.एड) शैक्षणिक तत्वज्ञान या विषयात देश विदेशातील ज्या शिक्षणपद्धती आणि त्या पद्धती शोधून काढणाऱ्यां ज्या मोजक्या शिक्षणतज्ज्ञांची ओळख करुन दिली जाते त्यात इटलीच्या मारिया माँटेसरींचा समावेश असतो म्हणजे असतोच. लहान मुलं मोठ्यांचे ऐकत नाही म्हणजे ऐकण्यासाठी त्यांना फक्त बदडूनच काढले पाहीजे असा जो सर्वसामान्य आणि सर्वमान्य समज होता. त्या काळात वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेली एक मुलगी सहा वर्षाखालील मुलांच्या शिक्षणासाठी काही करु पाहते. या वयोगटातील मुला-मुलींसाठी शिकणे आणि शिकवणे हे सहज कसे होईल यासाठी धडपडते म्हणजे हे एक प्रकारे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखीच गोष्ट झाली. सहा वर्षाखालील मुलांना सहज सुलभ शैक्षणिक साहित्य तयार करणे ही त्या काळाच्या मानाने फारच पुढची गोष्ट होती. जिथे जन्मदाते वडील आपल्या शिक्षणाला विरोध करत होते (पुढे हा विरोध मावळला) तिथे काळाच्या बरीच पुढे असलेली ही शिक्षण पद्धती समाज सहज स्वीकारेल हे होणं शक्य नव्हतं. या सगळ्यासाठी डाॅ. मारिया माँटेसरी यांना करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या मार्गात आलेले खाच खळगे तसेच नंतरच्या काळात

कौटुंबिक उबेची गोष्ट...

Image
  अधिक चांगल्या संधी आणि चांगल्या राहणीमानाच्या शोधार्थ भारतीय लोक गेल्या शतकभरापासून वेगवेगळय़ा खंडांत राहिले. यापैकी अनेक कुटुंबं तिथंच स्थिर झाली आणि त्यांच्या दुसऱ्यातिसऱ्या पिढय़ांना त्या-त्या खंडांतल्या देशाचं नागरिकत्व मिळालं. पण दोन-तीन पिढय़ा कितीही वेगवेगळय़ा संस्कृतींत वावरल्या तरी कौटुंबिक उबेची भारतीयांना वाटणारी पारंपरिक महत्ता त्यांच्यावर आपोआप संस्कारित झाली. चेतना मारू या केनियात जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये जडणघडण झालेल्या, व्यवसायाने हिशेबनीस (अकाऊंटंट) असताना त्यांच्यात साहित्याचं ‘वारं’ धरलं. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांच्या भारतीय कुटुंबकथांचा सिलसिला अमेरिकी-ब्रिटिश मासिकांमधून सुरू झाला. त्यात गेल्या वर्षी पॅरिस रिव्ह्यूचं ‘प्लिम्टन’ कथापारितोषिक त्यांच्या ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स’ या कथेला मिळालं. त्या पुरस्काराची चमक-धमक साहित्यवर्तुळात असताना ‘वेस्टर्न लेन’ या पहिल्याच कादंबरीनं बुकरच्या लघुयादीत स्थान मिळवून मारू ‘सुपरस्टार लेखिका’ बनल्या आहेत. जेव्हा एखाद्या शहरात आपण राहिलेलो असतो, आपलं बालपण त्या शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागात गेलेलं असतं, आपल्याला आयुष्या

विश्वोत्पत्तीची नवलकथा

Image
 आपल्या भवतालाबाबत मानवाला असणारं कुतूहल हे आदिमकाळापासून आहे. याच कुतूहलापोटी मानवाने स्वत:च्या बुद्धिशक्तीच्या जोरावर संशोधनं केली. या संशोधनांच्या उपयोजनावर आपली भौतिक प्रगती साधली; पण ‘विश्वाचा हा सर्व पसारा नक्की आला कुठून?’ असा प्रश्न सतराव्या शतकात लायब्निझ या शास्त्रज्ञाने विचारला होता. सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन तर असे म्हणत की, ‘विज्ञानातील शोध म्हणजे, दोन व्यक्ती बुद्धिबळ खेळत असताना, एका तिसऱ्या व्यक्तीने ज्याला बुद्धिबळातलं काहीही माहीत नाही त्याने या दोघांना खेळताना पाहून बुद्धिबळाच्या खेळाचे नियम स्वत: समजून घेण्यासारखं आहे.’ विश्वाच्या उगमापासूनच्या इतिहासाचा आढावा ते विश्वाच्या अंताबद्दल आजचे प्रचलित सिद्धांत काय सांगतात त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न सुकल्प कारंजेकर यांनी केला आहे तो रोहन प्रकाशनतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आपले विश्व आणि त्याची नवलकथा’ या देखण्या पुस्तकात. या पुस्तकातील एकूण एकवीस प्रकरणांमधून विश्वशास्त्राच्या संशोधनाचा इतिहास तर समोर येतोच, सोबत महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा, सिद्धांतांचा आणि संज्ञांचादेखील परिचय होतो.    पुस्तकाच

औकात दाखवणारं आयुष्य!

Image
  काही लोकांचं खरं हे इतकं खरं असतं की ते आपल्याला अक्षरशः खोटं वाटतं. आपण जे वाचत आहोत ते घडणं जणू काही अशक्यच आहे असंही वाटून जातं. हे असं वाटण्याचे कारण म्हणजे सिनेमा जगतातील एखाद्या यशस्वी अभिनेत्याने आपल्या कुकर्माची, पापाची इतकी जाहीर कबुली दिलेली माझ्यातरी वाचनात आलेली नाही. मी नुकतच अभिनेते पियुष मिश्रा यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी 'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' हे वाचली. सिनेमा जगत हे जरी जादुई असलं आणि पडद्यावर तीन तास मनोरंजन करत आपलं वास्तव जग विसरून एका आभासी दुनियेची सफर घडवत असलं तरी, पडद्यावर ते साकारीत करणाऱ्या अभिनेत्याचे वास्तविक आयुष्य हे इतकं स्ख़लनशील होतं हे पचवणं फार जड जातं. आयुष्याची ही अशी पार्श्वभूमी असताना आपल्याला पुन्हा चांगलं जगता येतं हा आत्मविश्वास काही लोक आपल्यामध्ये भरतात. पियुष मिश्रा हे त्यातलंच एक नाव!        पियुष यांचा जन्म ग्वाल्हेर मध्ये १९६३ साली झाला. कलेची प्रतिभा घेऊन जन्मलेले पियुष यांना लहानपणापासून काही वेगळं करण्याची तहान होती. पण वेगळं करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे समजण्याचं ते वयही नव्हतं. शालेय अभ्यासात मन लागत

मातीगारी

Image
    आफ्रिकी साहित्य विश्वातील एक मोठं प्रस्थ म्हणजे गुगी वा थियांगो. थियांगो हे मूळचे केनिया या देशातील. थियांगो यांचे आपली मातृभाषा गिकुयू आणि इंग्रजीवरही प्रचंड प्रभुत्व आहे. सुरुवातीच्या चार कादंबऱ्या त्यांनी इंग्रजीत लिहिल्या. 'नागहिका दिंदा' हे नाटक लिहिल्यामुळे थियांगो यांना कैदेत ठेवले गेले होते. कैदेत असताना त्यांनी निर्णय घेतला की आपण कादंबरी ही आपल्या मातृभाषा गिकुयूतच लिहायला हवी. कैदेत लिहिण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करुन देत नसल्यामुळे त्यांनी आपली कादंबरी ही अक्षरशः टाॅयलेट पेपरवर लिहिली. पुढे त्यांनी आपल्या साहित्यिक अभिव्यक्ती साठी गिकुयूच कायम ठेवली. थियांगो यांची 'मातीगारी' ही कादंबरी सर्वप्रथम गिकुयू भाषेत १९८६ साली प्रकाशित झाली. माराठीत त्याचा नुकताच अनुवाद प्रसिद्ध केला आहे मैत्री प्रकाशनाने. तर अनुवाद केला आहे नितिन साळुंखे यांनी.      या कादंबरीच्या कथानकाला केनियातील तत्कालीन राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी आहे. केनियात सत्तर ऐंशीच्या दशकात प्रचंड राजकीय अनागोंदी होती. नावाला लोकशाही पण प्रत्यक्षात हुकूमशाहीच तिथे राज्य करत होती. अशा राजकीय अराजकते

Scoop

Image
    जिग्ना व्होरा या गुन्हेगारी जगाच्या वार्ताहर. त्यांच्या 'बिहाइंड बार्स इन भायखळा' या पुस्तकावर आधारित व हंसल मेहता दिग्दर्शीत वेब सिरिज म्हणजे स्कूप. इतर वृत्तपत्रांना मिळण्यापूर्वी एखाद्या वृत्तपत्राला मिळालेली व त्याने प्रसिद्ध केलेली बातमी म्हणजे स्कूप. करिष्मा तन्ना या टिव्ही मालिका कराणाऱ्या अभिनेत्रीला स्कूप मध्ये जिग्नांची भूमिका साकार करण्याची चांगली संधी मिळाली आहे. त्या भूमिकेला पडद्यावर न्याय देण्यात ती मोठ्या प्रमणात यशस्वी ठरली आहे. जिग्ना ह्या 'एशियन एज' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या गुन्हेगारी जगताच्या वार्ताहर होत्या. 'मुंबई मिरर', 'मिड डे', 'फ्री प्रेस जर्नल' आणि 'एशियन एज' ही वर्तमानपत्रे आपला व्यवसाय वाढवणे, तसेच 'सर्वात आधी आपणच बातमी मिळवली/ छापली' या साठी या वर्तमानपत्रांची सुरु असलेली घाणेरडी चढाओढ या वेबमालिकेत पाहताना आपण फार अस्वस्थ होतो. सनसनाटी बातम्या मिळवायच्या. का मिळवायच्या ? तर, वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी. पत्रकारांनाही आपण किती डॅशिंग आहोत, आपली कशी वरवर पर्यंत 'पोहोच' आहे हे दाखवण्

गृहभंग

Image
      डॉ.एस.एल.भैरप्पा यांची मराठी वाचकांना आज वेगळी स्वतंत्र अशी ओळख करून देण्याची काही एक आवश्यकता नाही. गेल्या तीन चार दशकांहून अधिक काळापासून मराठी वाचकांचा भैरप्पांच्या पुस्तकांशी परिचय आहे. भैरप्पांची मराठीमध्ये मोठी ओळख निर्माण करून देण्यामध्ये त्यांच्या पुस्तकांच्या अनुवादिका उमा कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. उत्तम अनुवाद कसा असावा? यासंबंधीचे माझे साधे सोपे निकष आहेत. अनुवाद वाचत असताना आपण सतत अडखळतोय असं होता कामा नये. एखादं वाक्य वाचलं असता पुढचा संदर्भ लागण्यासाठी ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. गृहभंग या निकषावर अतिशय खरी उतरते. उमाताईंनी भैरप्पा यांची गेल्या वर्षी मराठीत अनुवादीत केली गेलेली कादंबरी म्हणजेच 'गृहभंग' ही होय. मला खूप आवडली ही कादंबरी.            'गृहभंग' चं कथानक घडतं ते १९२० - १९४५ या दरम्यान कर्नाटकातील 'रामसंद्र' या छोट्याशा गावात. ही गोष्ट आहे नंजम्मा ह्या कानडी ब्राम्हण स्त्रीची. या कादंबरीत वरील कालखंडात एकूण भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचं स्थान काय होतं हे वाचणं फार फार वेदनादायी आहे. नंजम्मा ही त्या स्त्री वर्गा

डिजिटल किमानतावाद

Image
  डीप वर्क या दणदणीत खपाच्या पुस्तकानंतर लेखक कॅल न्यूपोर्ट यांचं ताजं पुस्तक म्हणजे 'डिजिटल मिनिमलिझम' हे होय. डिजिटल क्रांतीनंतर आणि समाज माध्यमांच्या विस्फोटानंतर मानवी एकाग्रतेची कधी नव्हे ती इतकी शकले उडाली आहेत. समाज माध्यमांचे व्यावसायिक प्रारूप हेच मुळात 'दिखावे की दुनिया' यावर आधारित आहे. अशा या काळात उपभोक्तावाद या वादाने जगातील सर्व वादांवर मात केली आहे. समाज माध्यमांवर सतत क्रियाशील असल्याने मी त्यावर नियमितपणे काही ना काही कृती (activity) केलीच पाहिजे हे एक मोठं अनामिक दडपण आपल्यावर पडत असतं. या क्रियाशीलतेचा सेलेब्रिटी वर्ग सोडल्यास इतरांना तसा आर्थिक फायदा काहीच नसतो. मात्र समाज माध्यमांवर वेळ घालवल्यामुळे त्यांचा मात्र चांगलाच आर्थिक फायदा होतो. आता प्रश्न आहे आपला की आपण त्यांच्या जाळ्यात किती अडकायचं? किती वाहत जायचं? फेसबुक मित्रयादीतलं कुणीतरी हाॅटेल मध्ये जेवायला गेल्याचे, फिरायला गेल्याचे, ट्रेकिंगला गेल्याचे फोटो टाकतं त्यामुळे आपणही अशा आनंदापासून वंचित रहायला नको म्हणून आपल्यालाही तसं करावं वाटतं. हा जो दबाव समाज माध्यमं आपल्यावर सतत टाकत आहेत य

समलैंगिक पालकत्वाची गुंतागुंत

Image
स्पॅनिश कवयित्री इव्हा बाल्तसार यांची 'बोल्डर' ही गेल्या वर्षी इंग्रजीत अनुवादित झालेली कादंबरीका. या कादंबरीकेचा स्पॅनिश मधून इंग्रजीत अनुवाद केला आहे जुलिया सॅन्से यांनी. या कादंबरीची बुकर इंटरनॅशनल प्राईज २०२३ च्या दीर्घ यादीत(आता लघू यादीतही) निवड झाली आहे. त्यांची पहिली कादंबरी 'परमाफ्राॅस्ट' हिची भाषा जरी स्पष्ट आणि उपरोधीत असली तरी त्यापेक्षाही काकणभर जास्त धीट भाषेचा वापर 'बोल्डर' ह्या कादंबरीकेत केलेला आहे. 'बोल्डर' ही एका समलैंगिक पालकांची गोष्ट आहे. समलैंगिक संबंधाचे एक विचित्र रूप चित्रपट, वेब मालिका मधून आपल्यासमोर उभी केलं गेलं आहे. समलैंगिक जोडपं म्हटलं की ते जणू दिवसभर प्रणयधुंद असतात की काय असच दाखवलं जातं. त्यांनाही पोट-पाणी आहे, त्यासाठी त्यांनाही कामधंदा करावा लागतो. सांसारिक जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर असते. त्यांनाही पालक व्हावसं वाटतं. 'बोल्डर'ची भाषा अत्यंत धीट, सडेतोड तर काही ठिकाणी शिवराळ आहे. 'बोल्डर' ही एक बावीशीतली भटकी (नॉर्मेडीक) तरुणी आहे. व्यवसायाने ती एक उत्तम आचारी आहे. 'बोल्डर'ची समसा नावाच्य

एलिझाबेथ

Image
 १५४७ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सहावा एडवर्ड याला अगदी थोड्या काळासाठी राज्योपभोग घेता आला. त्याच्यानंतर त्याची जेष्ठ कन्या मेरी ही सिंहासनावर आरूढ झाली होती. मेरी ही कट्टर कॅथलिक असते. तिला एका मोठ्या व्याधीने त्रस्त केलेले असते. मेरीच्या मृत्यूनंतर तिची प्रोटेस्टंट असलेली सावत्र बहीण एलिझाबेथ ही राज्यावर येते. हीच ती इंग्लंडच्या सुवर्णयुगाची विधाती म्हणून इतिहासात ख्यातनाम असलेली पहिली एलिझाबेथ राणी. शेखर कपूर यांचा एलिझाबेथ (१९९८) हा ब्रिटिश सिनेमा या राणीची कारकीर्द दर्शवतो. राज्यावर आल्यानंतर एलिझाबेथने आपल्या बाह्य व अंतर्गत शत्रूंना दूर करून आपलं आसन कशाप्रकारे सदा सर्वकाळासाठी बळकट केलं याची एक उत्कंठावर्धक कहाणी म्हणजेच 'एलिझाबेथ'        या सिनेमाची सुरुवात ज्या दृश्याने होते त्यात तीन प्रोटेस्टंट पंथीय व्यक्तींना (दोन पुरुष व एक स्त्री) एका भर चौकात सरणावर उभे केले जाते. हातपाय करकचून आवळलेले असतात. स्वतःला सोडवण्यासाठीची याचना, ते आजूबाजूच्या त्यांच्या मृत्यूचा तमाशा पाहायला आलेल्यांकडे अगदी जीवाच्या आकांताने करत असतात. पण उलट ही

Spelling Bee

Image
    अमेरिकेत दहा ते पंधरा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना एका स्पर्धेचं प्रचंड आकर्षक असतं अन् ती स्पर्धा म्हणजे 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी.' ही फक्त 'स्पेलिंग बी' म्हणूनही ओळखली जाते. अमेरिकेत सध्या या स्पर्धेत भारतीय वंशाची मुलं, मुली हे प्रचंड यश मिळवत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांना असं वाटत होतं की, "आपल्या कामाला इथे भारतात प्रतिष्ठा नाही किंवा म्हणावा असा वाव मिळत नाही किंवा पैसा मिळत नाही" त्या मंडळींनी भारत सोडून अमेरिकेत स्थाईक होण्याचा धोका पत्करला होता. ह्या पहिल्या पिढीचा काळ हा अमेरिकेत पाय रोवण्यातच गेला. दुसऱ्या पिढीलाही स्थिरस्थावर होण्यात बराच काळ गेला. पण गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून येत असलेल्या तिसऱ्या पिढीला मात्र चांगलेच सुगीचे दिवस आहेत. ह्या पिढीची म्हणजेच नव्वोद्दोत्तर पिढीची मुलं हे मात्र या स्पर्धेत कमालीचं यश मिळवत आहेत. लिंडन जाॅन्सन अमेरिकेचे अध्यक्ष असताना ३ आॅक्टो १९६५ साली त्यांनी एक बील पास केलं ज्याला 'नागरिकत्व कायदा १९६५' असे म्हणतात. या कायद्यात असं म्हटलं होतं की, "ज्यांना अमेरिकेत स्थाईक होण्याची

फक्र-ए-अफगाण…

Image
अफगाणिस्तान या देशाचा इतिहास पाहता असे दिसते की, हा देश कायमच एक धगधगता अंगार राहीला आहे. आजही अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवला तेव्हा असे लक्षात वाटते की टोळी युगातून हा देश आजही बाहेर पडला आहे की नाही? पण याच पठाणांच्या देशात एक असा पठाण जन्माला आला होता ज्याने कधीही आपल्या हातात शस्त्र धरले नाही. मुळात ही कल्पनाच डोक्यात उतरत नाही की, एक पठाण गेल्या शतकात ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठं संघटन उभं करतो आणि त्याचा लढण्याचा मार्ग हा मात्र अहिंसा! पण हे खरं आहे की असा एक 'वीर' या मरूभूमीत जन्मला होता. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश म्हणजेच अवाढव्य अशा भारतीय उपखंडाचा इतिहास लिहिताना ज्यांना टाळून पुढे जाणे शक्यच नाही ते नाव म्हणजे खान अब्दुल गफारखान हे होय. बऱ्याच जणांना तर हे नावही ओळखीचं नसेल. स्वातंत्र्याच्या आगोदरची पिढी यांना 'खानसाहेब' किंवा 'बादशहाखान' म्हणत. इंग्रजीत 'फ्रंटिअर गांधी', हिन्दीत 'सीमान्त गांधी', मराठीत 'सरहद्द गांधी' तर अफगाणी लोक त्यांना 'बच्चा खान' म्हणत. पश्तू भाषेत 'बच्चा' शब्दाचा