Posts

Showing posts from November, 2021

जैविक ओळख शोधताना…

Image
  दानी शापिरो या अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध चरित्र/ संस्मरण लेखिका. पती मायकल आणि मुलगा जेकब यांसोबत सुखाने आयुष्य कंठत होत्या. आयुष्यात कोणत्याच बाबतीत काहीही कमतरता नव्हती. पैसा होता, यशस्वी लेखिका म्हणून जगभर नाव झालेलं होतं. पण या सर्व सुखात आयुष्याची मध्यान्ह उलटून गेल्यावर अचानक अशी घटना घडली की तिचे व्रण दानींच्या मन, बुद्धी आणि शरीरावर कायमचेच कोरले गेले आहेत. दानींना निवृत्तीचे वेध लागलेले, चारएक वर्षांत मुलगा लग्न करून स्वतंत्र होईल. पण वयाच्या या टप्प्यावर अचानक दानींचे पती मायकल हे दानींच्या पुढ्यात एक वैद्यकीय अहवाल ठेवतात. तो वैद्यकीय अहवाल वाचून दानींच्या पायाखालची जमीन सरकते. या अहवालाचा अर्थ काय?  दानी स्वत:शीच विचार करू लागतात, ‘म्हणजे सुझी ही माझी कोणतीच बहीण नाही?… सावत्र बहीणसुद्धा नाही?’ दानींच्या पतीने- मायकलने सहज मौज म्हणून केलेली जनुकीय चाचणी (डीएनए टेस्ट); तिचा तो अहवाल ‘हे तुमचे जैविक वडील नाहीत!’ असे दानींच्या दिवंगत वडिलांबद्दल सांगत होता. अमेरिकेत आजकाल डीएनए टेस्ट किट हे वाढदिवसानिमित्त भेट म्हणून देण्याच्या प्रथेने चांगलाच जोर धरला आहे. म्हणजे, ५...