साहित्य -सिनेमा - २०२२
.jpeg)
वाचन, लेखन आणि सिनेमा पाहणे या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. यावर्षी वर्षभर ॲग्रोवन मध्ये एक 'मशागत' नावाचं साप्ताहिक सदर लिहिलं. मशागतचा अतिशय चांगला अनुभव आला. यावर्षीची सुरुवातच खूप छान झाली होती. पुणे आकाशवाणीवरील 'साहित्य विश्व' या कार्यक्रमात मराठी पुस्तकांची ओळख करवून देता येत होती. सात आठ मराठी पुस्तकांवर लिहायची संधीही मिळाली. पण पुढे हा कार्यक्रमच पुणे आकाशवाणीने बंद केला. तरी साधना, लोकसत्ता बुकमार्क, कर्तव्य साधना इथे चांगल्या पुस्तकांवर लिहिता आलं याचं समाधान आहेच. या वर्षी (२०२२) 'सिद्धार्थ' या हरमन हेस लिखित नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीला प्रकाशित होण्यास १०० वर्ष पूर्ण होत असल्याने दिल्लीच्या गाॅथे इनस्टिट्यूट, मॅक्समुल्लर भवनाच्या वेबसाइटसाठी सिद्धार्थवर एक लेख लिहिला. जयश्री हरी जोशींमुळे ही संधी मिळाली. शेती, काॅलेज, क्लासेस, या व्यापातून वाचनासाठी वेळ काढणे ही खरंच मोठी कसरत आहे. २३ जुलै रोजी आजीचे निधन झाले. तसेच २० आॅक्टोबरला गावात झालेल्या ढगफुटीने वाचनात मोठाच खंड पडला. मानधनाच्या बाबतीत मला साधना, लोकसत्ता आणि ॲग्रोवन यां...