Posts

Showing posts from September, 2023

विश्वोत्पत्तीची नवलकथा

Image
 आपल्या भवतालाबाबत मानवाला असणारं कुतूहल हे आदिमकाळापासून आहे. याच कुतूहलापोटी मानवाने स्वत:च्या बुद्धिशक्तीच्या जोरावर संशोधनं केली. या संशोधनांच्या उपयोजनावर आपली भौतिक प्रगती साधली; पण ‘विश्वाचा हा सर्व पसारा नक्की आला कुठून?’ असा प्रश्न सतराव्या शतकात लायब्निझ या शास्त्रज्ञाने विचारला होता. सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन तर असे म्हणत की, ‘विज्ञानातील शोध म्हणजे, दोन व्यक्ती बुद्धिबळ खेळत असताना, एका तिसऱ्या व्यक्तीने ज्याला बुद्धिबळातलं काहीही माहीत नाही त्याने या दोघांना खेळताना पाहून बुद्धिबळाच्या खेळाचे नियम स्वत: समजून घेण्यासारखं आहे.’ विश्वाच्या उगमापासूनच्या इतिहासाचा आढावा ते विश्वाच्या अंताबद्दल आजचे प्रचलित सिद्धांत काय सांगतात त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न सुकल्प कारंजेकर यांनी केला आहे तो रोहन प्रकाशनतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आपले विश्व आणि त्याची नवलकथा’ या देखण्या पुस्तकात. या पुस्तकातील एकूण एकवीस प्रकरणांमधून विश्वशास्त्राच्या संशोधनाचा इतिहास तर समोर येतोच, सोबत महत्त्वाच्या शास्त्रज्ञांचा, सिद्धांतांचा आणि संज्ञांचादेखील परिचय होतो.   ...