Posts

Showing posts from October, 2023

कौटुंबिक उबेची गोष्ट...

Image
  अधिक चांगल्या संधी आणि चांगल्या राहणीमानाच्या शोधार्थ भारतीय लोक गेल्या शतकभरापासून वेगवेगळय़ा खंडांत राहिले. यापैकी अनेक कुटुंबं तिथंच स्थिर झाली आणि त्यांच्या दुसऱ्यातिसऱ्या पिढय़ांना त्या-त्या खंडांतल्या देशाचं नागरिकत्व मिळालं. पण दोन-तीन पिढय़ा कितीही वेगवेगळय़ा संस्कृतींत वावरल्या तरी कौटुंबिक उबेची भारतीयांना वाटणारी पारंपरिक महत्ता त्यांच्यावर आपोआप संस्कारित झाली. चेतना मारू या केनियात जन्मलेल्या आणि ब्रिटनमध्ये जडणघडण झालेल्या, व्यवसायाने हिशेबनीस (अकाऊंटंट) असताना त्यांच्यात साहित्याचं ‘वारं’ धरलं. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांच्या भारतीय कुटुंबकथांचा सिलसिला अमेरिकी-ब्रिटिश मासिकांमधून सुरू झाला. त्यात गेल्या वर्षी पॅरिस रिव्ह्यूचं ‘प्लिम्टन’ कथापारितोषिक त्यांच्या ‘ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स’ या कथेला मिळालं. त्या पुरस्काराची चमक-धमक साहित्यवर्तुळात असताना ‘वेस्टर्न लेन’ या पहिल्याच कादंबरीनं बुकरच्या लघुयादीत स्थान मिळवून मारू ‘सुपरस्टार लेखिका’ बनल्या आहेत. जेव्हा एखाद्या शहरात आपण राहिलेलो असतो, आपलं बालपण त्या शहरातल्या एखाद्या विशिष्ट भागात गेलेलं असतं, आपल्याला आयु...