गोल्डा- एक ज्यू माता
इतिहासाला नवे वळण देण्याची क्षमता काही प्रत्येकात नसते. ज्या लोकात असे वळण देण्याची क्षमता असते त्यांची संख्या ही नेहमी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असते. आणि जगाचा नकाशा बदणाऱ्यांची संख्या तर ती त्याहूनही कमीच! अश्या कमी असणऱ्यांच्या यादीतील एक ठळक नाव म्हणजे इस्त्रायल च्या पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मेअर. गोल्डाचा जन्म ३ मे १८९८ रोजी युक्रेन(रशिया) मध्ये झाला. गोल्डाचे लहानपण तसे हालाखितच गेले. घरी झायाॅनवादी श्रमिक चळवळीचे लोक येत असत त्यामुळे आपणही या चळवळीत सामील व्हावे हे बालपणीच गोल्डाला वाटू लागले. लहानपणापासुन गोल्डावर तिच्या मोठ्या बहिणीचा शेयना प्रभाव होता. शेयनासुद्धा झायाॅनवादी होती. रशियन लोकांकडून ज्यूंवर होणारे 'प्रोग्रोम' हल्ल्यांना कंटाळून गोल्डाचे वडील आपल्या कुटुंबकबिल्यासह अमेरिकेत स्थाईक झाले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीला जागत एकदा गोल्डाच्या लहानपणी ती प्राथमिक शिक्षण घेत असताना सिनेगाॅग च्या चौकात झायाॅनवादी श्रमिक संघटनेच्या मोर्चात तिने केलेले भाषण असो वा तिच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत म्हणून तिने शाळेच्या ...