सजीव निर्जीवांमधील अद्वैत शोधणारा शास्त्रज्ञ - जगदीशचंद्र बसू

पॅरिस मध्ये भौतिकशास्त्र तज्ज्ञांची एक परिषद भरलेली होती त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी उभा होता. समोर एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ (फिजिअाॅलाॅजीस्ट) बसलेले होते. ते या भारतीय शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकून अस्वस्थ होत होते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण तसेच होते. त्या भारतीय शास्त्रज्ञाची मतं जर मान्य केली तर त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाला केराची टोपली दाखवावी लागणार होती! पण त्यांना त्या व्याख्यानात आपल्या चुका कदाचित उमगल्या असाव्यात. व्याख्यान संपले आणि ते भारतीय शास्त्रज्ञाला म्हणाले की," सुरवातीला मला तुमचे सर्वच मतं चुकीचे वाटत होते. पण भाषण पूर्ण ऐकल्यावर माझं मत बदललं". तर ते भारतीय शास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बसू व ते दिग्गज शरिरशास्त्रज्ञ होते डाॅ.वाॅलर. जगदीशचंद्र बसूंचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी मैमनसिंग जवळ राणिखल (अत्ताच्या ढाक्या जवळ) झाला. वडील भगवान चंद्र हे ब्रिटिशांच्या सेवेत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. वडील गेल्यानंतर जगदीशचंद्र बसूंचे आर्थिकदृष्ट्या खूप हाल झाले. वडिलांनी घेतलेले सर्व कर्ज एक एक क...