ब्रायन ॲडम्स

 अंधाराला भेदत आणि कमरेजवळ एक इलेक्ट्रिक गिटार लटकवत स्टेजवर उभ्या केलेल्या एका स्टँड माईकजवळ तो येतो. अंगात एक साधासा टी शर्ट, चापून चोपून बसवलेला केसांचा भांग आणि नुकतीच दाढी केलेला असा एक गोरापान व्यक्ती त्या माईकचा ताबा घेतो. गिटारच्या तारा छेडत तो फक्त त्याच्या एका गाण्याचा मुखड्याची सुरुवात करत म्हणतो I got my ...! आणि स्टेडिअम जे सळसळत्या तरुणाईने खचाखच भरलयं त्यांच्यात या तीन शब्दाने जणू वीजच संचारते. पब्लिक  first real string म्हणत पुढचं सर्व कडवं पुर्ण करतं. हा त्याला फक्त गिटारने साथ देत असतो. ते गाणं म्हणजे ब्रायन ॲडम्सच्या Reckless या अल्बम मधलं  Summer of 69 होय. ब्रायन ॲडम्सचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस. ब्रायन आज वयाच्या एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. सन १९८४ ला रिलीज झालेल्या Reckless अल्बममधल्या summer of 69 या गाण्यावर तरुणाई आजही थिरकते. चार महिण्यात एखादं गाणं विस्मृतीत जाण्याच्या आजच्या या काळात छत्तीस वर्षापूर्वीच्या एका गाण्याच्या जोरावर  लोकांना खिळवून ठेवणं हे इतकं सोपे नाहीये. ते गाणंही तसंच असावं लागतं!  ब्रायनचा summer of 69 हा अल्बम चालण्याचं कारण मला असं वाटतं की, जगात कुठेही जा माणसांमध्ये प्रेम, विरह या भावना समान आहेत. त्याने माणसांचं आयुष्य व्यापून गेलेलं आहे. तारूण्यात प्रेमाचे आकर्षण ही गोष्ट जगात सगळीकडे समान आहे. काॅलेज संपल्यावर मनाला वाटणारी रूखरूख ही भावना देखील सगळीकडे समान आहेत. म्हणूनच हे गाणं सर्वांचं आवडतं असावं असं मला वाटतं. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो की काॅलेज मध्ये कधीही न गेलेला ब्रायन याने या गाण्यातला भाव कसा काय ओळखला असेल? जेव्हा ब्रायन Everything I do, I do it for you हे गाणं गातो तेव्हा कुणाही व्यक्तीला प्रेमभंगाने विव्हळणारा प्रियकर जाणवेल. I do it for you हे म्हणताना त्याचा करूण आवाज काळजाला चिरतो. 


   एकसष्टीत पदार्पण करत असताना सुद्धा ब्रायनचा आवाज मात्र आजही तरणाच वाटतो. ब्रायन त्याच्या बऱ्याच अल्बमच्या प्रमोशनसाठी भारतात येऊन गेलेला आहे. नव्वदीनंतरच्या कित्येक भारतीय गाण्यावर ब्रायनच्या गाण्याची छाप पहायला मिळते. ब्रायनची गाणी आणि त्याबरोबर इतरही इंग्रजी गाणी भारतात हिट होण्याचे कारण म्हणजे, १९९५-९६ च्या काळात ज्यावेळी अजून इंटरनेट व you tube ही वादळं भारतीय किणाऱ्यावर अजून धडकलेली नव्हती. अशा त्या काळात Mtv आणि चॅनल V यांनी इंग्रजी व्हिडीओ गाणे आपल्या चॅनलवर दाखवायला सुरुवात केली होती त्याच्यात आहे असं मला वाटतं. इंटरनेट आणि you tube आलं त्यावेळी लोकांच्या हाती घबाडचं लागलंय संगिताचं. त्यावेळी ब्रायनची जादू ओसरली जाईल की काय असं वाटू लागलं होतं. पण २००४-०५ च्या दरम्यान Here I am हे Spirit या ॲनिमेटेड सिनेमामधील गाणं हे शेवटचं हिट गाणं ठरलं. नव्वदीच्या आगोदर Everything I do, Love for women, Cuts like knife, I am ready चे चाहते आजही सापडतात. मराठीत अवधूत गुप्तेचं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे summer of 69 ची सरळ सरळ नक्कल केली आहे. 

   मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती आणि अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता त्यावेळी मला निराशा घेरायची. तेव्हा दोन गाण्यांनी मला खूपच मदत केली त्या फेज मधून बाहेर पडायला. एक होतं Eminem चं Not afraid जे जगाला तीन टाईम कोलून लावण्यास उद्युक्त करतं. तसंच दुसरं गाणं म्हणजे ब्रायन ॲडम्सचं Here I am हे होय. का कुणास ठाऊक पण त्यावेळी ऊसाला पाणी भरत असताना मी जेव्हा हे गाणं ऐकायचो तेव्हा माझा आतला आवाज सांगायचा,"आज्या! कुणीतरी आहे आपल्या सोबत" पण कोण? "ते मात्र माहीत नाही" पण कुणीतरी आहे हे मात्र नक्की!" त्या किर्रर्रर्र उसात अक्षरशः धाय मोकलून रडायचो मी. अशावेळी मदतीला असायचं Here I am. 

    ब्रायन ॲडम्स हा केवळ एक राॅकस्टार नाहीये तर तो एक उत्तम फोटोग्राफर देखील आहे. ब्रिटनचे सैनिक जे इराक-अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात होते त्यांचे फोटो काढताना हा जखमी झाला होता. त्याला युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या जीवनावर एक दस्तऐवज तयार करायचा होता. सैनिकांबद्दल त्याला जिव्हाळा वाटण्याचे कारण त्याचे वडील हे कॅनडाच्या सैन्यात होते. आजोबा ब्रिटिश सैन्यात होते तसेच त्याची चुलत भावंडेही सैन्यात होती. त्याच्या लहानपणी त्याच्या आईवडीलांचे फार भांडणं होत असत म्हणून त्या त्रासापासून बाजूला जाण्यासाठी हा संगीताची मदत घेऊ लागला आणि जन्मभर संगीताचाच होऊन गेला. 


   ब्रायन गिटारिस्ट पासून गायक कसा बनला त्याचाही एक छान छोटा किस्सा आहे. एका संगीतकाराकडे हा गिटारिस्ट म्हणून काम करत असे. एका गाण्याच्या रेकाॅर्डींगच्या नेमक्या वेळेस त्या गायकाने या संगितकाराला टांग दिली. इतर गायकंही चांगले मिळेना म्हणून ब्रायनकडूनच गाऊन घेण्याचा प्रयत्न करुया म्हणून त्याने ब्रायनला तसं विचारलं तर हा आनंदने तयार झाला. आज संगीतातील कित्येक रेकाॅर्ड्स ब्रायन ॲडम्सच्या नावे जमा आहेत तरी ब्रायन म्हणतो, "मला आजही स्टेजवर गायची भिती वाटते". कारण विचारलं असता तो म्हणतो की,"काय सांगावं स्टेजवर अचानक माईक बंद पडेल, कधी गिटार काम करणार नाही, काहीही होऊ शकतं". आपल्या वडिलांवर त्याचं खूप प्रेम होतं. ज्या वडिलांनी लहानपणी त्याला गिटार घेऊन दिली त्यामुळेच आपलं संगितावर प्रेम जडलं असं तो मानत असे. संगितासोबत आपली नाळ जोडण्यात वडिलांचा मोठा वाटा आहे अशीही त्याची समजूत होती.

   त्याच्या लहानपणीच त्याच्या आईवडीलांच्या संसाराची फारकत झाली. कोर्टाने याची कस्टडी आईकडे दिली होती त्यामुळे वडिलांचं छत्र काही याला मिळू शकलं नाही. मोठा झाल्यावर म्हणजेच चांगला पैसा पाणी, नाव कमावल्यावर याने आपल्या वडिलांचा शोध घ्यायचं ठरवलं तेव्हा याला समजलं की त्याचे वडिल हे जपान मध्ये आहेत म्हणून, तर हा तडक जपानला गेला. वडिलांना भेटून त्याला फार फार आनंद झाला. वडिलांनाही आपल्या राॅकस्टार मुलाला भेटून फार बरं वाटलं. ब्रायनचं everything I do हे गाणं रिलीज झाल्यावर ते रेकाॅर्डब्रेकींग सोळा आठवडे टाॅपर राहिलेलं होतं. मग मात्र ब्रायन Everything I do च्या यशात अडकत गेला. एकदा त्याला कुणीतरी विचारलं की," या गाण्याने त्याला कंटाळवाणा ब्रायन बनवलं काय?" तो म्हणतो "कदाचित होय!". "मी हे असं स्वतःला कधीच पाहत नाही". तो पत्रकार म्हणतो मी त्याला विचारलं की," अजूनही संगीतात रस आहे का? " तो विचार करतो आणि "नाही" म्हणतो.

Summer of 69 ची लिंक 


Happy birthday Bryan Adams


अजिंक्य कुलकर्णी

Comments

  1. Very nice & new information for

    Happy Birthday Dear Bryan Adams

    Dippak

    ReplyDelete
  2. This is Pritam Kulkarni.
    Nice blog, eka musician-singer chi journey kalali..ani...tya veli aaj sarkha fame milayala media paan evadha strong navhta.
    Tarihi hardworking ani passionate asatanach asa success pahayala milata.... thanks Ajinkya...!! Nice blog.!!

    ReplyDelete
  3. Siddhartha Kulkarni6 November 2020 at 10:11

    For many years my english songs playlist was limited to Bryan Adams and linkin park.

    ReplyDelete
    Replies
    1. मी हे काँप्लिमेंट म्हणून घेतो. पण भाई इतरांची गाणी सुद्धा फार फार सुंदर आहेत. तो आनंद घेण्यापासून का वंचित राहतोस?

      Delete
  4. लेख नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण आहे दादा. माहित नसलेल्या कलावंताबद्दल नविन माहिती समजली.

    ReplyDelete
  5. लेख नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण आहे दादा. माहित नसलेल्या कलावंताबद्दल नविन माहिती समजली.

    ReplyDelete
  6. हाय अजिंक्य मामा तुझा हा लेख खुप चान वाटला माला ब्रायन अ‍ॅडम्स बदल अजुन महिती मिलाली आनी हो तुझी लिहिण्‍याची पद्धत मुळात त मी पहिल्‍यांदाच बघितली आनी खरच कमाल आहे ती!😃

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you dear Sanika. काही वर्षांनी तू पण खूप छान लिहू शकशील. मला खात्री आहे.

      Delete
  7. She knows me पण छान आहे गाणं

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा