कालजयी दिनकर

सदियों की ठंडी बुझी राख सुगबुगा उठी, मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है, दो राह, समय के रथ का घर्घर नाद सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है| सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या दडपशाही आणि संपुर्ण देशावर १९७५ सालानंतर तब्बल २१ महिने लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचे एक देशव्यापी आंदोलन चालू होते. त्या आंदोलनाच्या यज्ञकुंडातून बाहेर पडणारी अग्निशिखा जनमानसात धगधगती ठेवण्याचे काम ज्या कवितेने केले होते ती कविता म्हणजे 'सिंहासन खालि करो की जनता आती है'.आणि या क्रांतिकारी कवितेचे उद्गाते आहे राष्ट्रकवी 'रामधारी सिंग दिनकर' उर्फ 'दिनकर'. दिनकर हे आजही हिंदी साहित्यातील एक दिग्गज कवी म्हणून ओळखले जातात. ज्यांची ख्याती 'संसद से लेकर सडक तक, और जिल से लेकर जन-जन तक' अशी होती. दिनकरांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ सिमरिया (मुंगेर) जे आता बिहार मधिल बेगुसराय जिल्हात येते तिथे ...