निडर अभिनेत्री - मेरील स्ट्रीप
वेळ होती गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०१८ ची. मेरील स्ट्रीपला 'गोल्डन ग्लोब लाईफ टाईम अचिव्हमेंट' अवाॅर्ड मिळालं होतं. या पुरस्कारासाठी व्हायोला डेव्हीस ही एक अंत्यत गुणी अभिनेत्री कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असते. (Viola Devis चा The Help हा सुदंर सिनेमा आवर्जुन पहा, त्याही पेक्षा The Help ही कॅथरीन स्टाॅकेटची कादंबरी वाचा) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कराताना व्हायोलाने मेरील बद्दल जो काही आदर व्यक्त केला ना आहे तो फार फार आतून आलेला, निकोप, निस्वार्थ असा होता. पिवळ्या रंगाच्या वन आॅफ शोल्डर ड्रेस घातलेली व्हायोला डेव्हिस म्हणते की, "मेरील तुझ्यामुळे मला अभिनेत्री असल्याचा अभिमान वाटतो, तुझ्यामुळे मला हा आत्मविश्वास आला की माझं शरीर, माझं वय, माझा चेहरा हा जसा आहे तसा पुरेसा आहे." व्हायोलाच्या अशा या बोलण्यामुळे प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येकाला एक असं आनंदाचं भरतं आलेलं आहे हे स्पष्ट दिसतं होतं. गोल्डन ग्लोब पुरस्काराची लिंक पुरस्काराची औपचारिकता आटोपल्यानंतर मेरील आपलं मत व्यासपीठावरून मांडायला सुरुवात करते. घसा बसलेला असतो तरी ती बोलतेच. या कार्यक्रमाच...