निडर अभिनेत्री - मेरील स्ट्रीप

 वेळ होती गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०१८ ची. मेरील स्ट्रीपला 'गोल्डन ग्लोब लाईफ टाईम अचिव्हमेंट' अवाॅर्ड मिळालं होतं. या पुरस्कारासाठी व्हायोला डेव्हीस ही एक अंत्यत गुणी अभिनेत्री कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असते. (Viola Devis चा The Help हा सुदंर सिनेमा आवर्जुन पहा, त्याही पेक्षा The Help ही कॅथरीन स्टाॅकेटची कादंबरी वाचा) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कराताना व्हायोलाने मेरील बद्दल जो काही आदर व्यक्त केला ना आहे तो फार फार आतून आलेला, निकोप, निस्वार्थ असा होता. पिवळ्या रंगाच्या वन आॅफ शोल्डर ड्रेस घातलेली व्हायोला डेव्हिस म्हणते की, "मेरील तुझ्यामुळे मला अभिनेत्री असल्याचा अभिमान वाटतो, तुझ्यामुळे मला हा आत्मविश्वास आला की माझं शरीर, माझं वय, माझा चेहरा हा जसा आहे तसा पुरेसा आहे." व्हायोलाच्या अशा या बोलण्यामुळे प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येकाला एक असं आनंदाचं भरतं आलेलं आहे हे स्पष्ट दिसतं होतं. गोल्डन ग्लोब पुरस्काराची लिंक 


     पुरस्काराची औपचारिकता आटोपल्यानंतर मेरील आपलं मत व्यासपीठावरून मांडायला सुरुवात करते. घसा बसलेला असतो तरी ती बोलतेच. या कार्यक्रमाच्या काही दिवस आधी एका अपंग पत्रकाराचा डोनाल्ड ट्रंप  एका भर पत्रकार परिषदेत अपमान करतात; व त्याला त्या परिषदेतून अपमानास्पदरीत्या हाकलवून लावतात. तेंव्हा ट्रंप यांचा मेरील स्ट्रीप 'गोल्डन ग्लोब पुरस्कार' स्विकारल्यानंतर चांगलाच समाचार घेते. ती म्हणते, "हाॅलिवूड मध्ये जगभरातून अनेक उत्तम कलाकार येतात, म्हणून हाॅलिवूड हे हाॅलिवूड आहे. हाॅलिवूड हे फाॅरेनर्सने भरलेलं आहे. मी (मेरील) शिकले, वाढले न्यू जर्सीमध्ये, व्हायोला साऊथ कॅरोलिनामध्ये, अॅमी अॅडम्स ही इटलीमधून आली आहे, नताली पोर्टमन ही जेरुसलेममधून, रायन गाॅसलिंग हा कॅनडामधून, देव पटेल इंग्लंड मधून त्यामुळे हाॅलिवूड हे फाॅरेनर्सने भरलेलं आहे. या सर्वाना जर तुम्ही लाथ मारून काढून दिले तर अमेरिकेत फुटबॉल आणि मिक्स मार्शल आर्ट (जी खरतर आर्टच नाहीये) सोडले तर बघण्यासारखं काहीच राहणार नाही. जेंव्हा इतका मोठा अवाॅर्ड घेताना स्ट्रीप कोणताही आडपडदा न राखता आपले मत मांडते तेव्हा आमच्या भारतीय कलाकारांचे खुजंपण फार जाणवतं. प्रत्येक वेळी भूमिका घेणं म्हणजे सरकार विरोधी बोलणे असं नव्हे. आर्थिक, सामाजिक, पर्यावरण याबाबतीतही भारतीय कलाकारांचं मौन हे मला फार खटकतं. वाॅकिंग फिनिक्स, लिओनार्दो डिकाप्रीयो यांनी आॅस्कर स्वीकारताना केलेली भाषणं खूप काही बोलून जातात. आपले कलाकार काहीच करत नाही असं माझं एकांगी मत अजिबात नाहीये. असो.

  ट्रंप यांच्यावर टीका केली म्हणून ट्रंप यांनी 'मेरील ही एक अगदी ओव्हररेटेड अभिनेत्री आहे' असं ट्विट केलं होतं. पण ट्रंप यांना बहुतेक त्यांचे सल्लागार एक गोष्ट सांगायला विसरले होते बहुतेक की मेरीलला तो पर्यंत ३० गोल्डन ग्लोब नाॅमिनेशन, ती ८ वेळा गोल्डन ग्लोब विनर आहे, तिला १८ वेळा अकॅडमी अवाॅर्ड नाॅमिनेशन मिळालं आहे आणि तब्बल ३ वेळा आॅस्कर पटकावलेला होता. ट्रंप व फूटबॉल ची खिल्ली उडवली म्हणून अमेरिकेतील प्रिंट मिडियानेही (अर्थातच सरकार धार्जीण्या) मेरीलवर चांगलेच तोंडसूख घेतले होते. याचं कारण होतं मेरील ने अमेरिकी अध्यक्ष निवडणूकीत हिलरी बाईंच्या बाजूने भूमिका घेतली होती. 

 गोल्डन ग्लोब नंतर काही दिवसांनी 'नॅशनल बोर्ड आॅफ रिव्हू अवाॅर्ड' गाला इथे पार पडला होता. त्या समारंभात मेरीलने पुन्हा ट्रंप यांच्यावर तोंडसूख घेतलं. या कार्यक्रमात तिने गोल्डन ग्लोबच्या वेळेचे मुद्दे पुन्हा नव्याने मांडले. हे अवाॅर्ड तीला 'द पोस्ट' या स्टीव्हन स्पिलबर्ग च्या सिनेमात Washington post या वृत्तपत्र समूहाची प्रकाशक 'कॅथरीन ग्रॅहम' ची भूमिका साकारल्याबद्दल मिळालं होतं. पोस्ट मध्ये व्हियतनाम युद्धाची जी गोपनीय कागदपत्रे WP च्या हाती पडतात. ती कागदपत्रे WP आपल्या वृत्तपत्रात  छापण्याचे धाडसही दाखवते. यामुळे अमेरिकचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. यावेळी मात्र मेरील स्ट्रीपचा बाजूने उभा होता तिचा अजून एक मित्र जो त्या कार्यक्रमालाही उपस्थित होता. तो म्हणजे  राॅबर्ट-डी- निरो.  निरो जेव्हा बोलायला लागला तर त्याने मागेपुढे काही न पाहता ट्रंप यांची "fool" आणि "Idiot" म्हणून संभावना केली. हा कार्यक्रम दोन तासांचा होता. पण अमेरिकन सरकाने हा टीव्हीवर प्रदर्शित होऊ दिला नाही. त्याचं वर्तमानपत्रातून जेव्हढं वृत्तांकन झालं तेव्हढंच बाहेर आलं. 

'द पोस्ट' मधील एका वर्तमानपत्राच्या प्रकाशकाची  भूमिका असो, 'डेव्हिल्स वेअर प्राडा' मधली फॅशन अायकाॅन असो,  ब्रिजेस आॅफ मेडिसन काउँटी किंवा डिअर हंटर मध्ये निरो ला अभिनयात तू दिलेली टक्कर असो, 'आयर्न लेडी' मध्ये साकारलेली कणखर मार्गारेट थॅचर असो, नुकताच येऊन गेलेला लाॅन्ड्रोमॅट हा शेल कंपन्यांनी कशाप्रकारे लोकांची आर्थिक लुबाडणूक केली होती याचे उघडकीस आलेले पनामा पेपर्स वर आधारीत होता. मेरीलचा हा सर्वच सिनेप्रवास विलक्षण आहे. इतकच नाही तर बेड टाईम्स स्टोरीज म्हणून अमेरिकन मुलांमध्ये प्रसिद्ध असलेल्या E.B.White चे Charlotte's web ही कादंबरी तिने स्वतःच्या आवाजात रेकाॅर्ड केली ते केवळ लहान मुलांवरच्या प्रेमाखातर. Natural Resource Defense Council ( NRDC) ची मेरील स्ट्रीप कित्येक वर्षांपासून ब्रँड अॅम्बॅसिटर आहे. पर्यावरण, स्रियांवर होणारे अत्याचार याबद्दल ती नेहमीच आवाज उठवतं आली आहेस. पण तरीही तिने स्वतः मात्र कधी पर्यावरणवादी, स्त्रिवादी म्हणवून घेतले नाही. अशी ही मेरील स्ट्रीप (२२ जून २०२०) ला वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.


अजिंक्य कुलकर्णी.

Comments

  1. माझी अतिशय आवडती अभिनेत्री. The Iron Lady किंवा Crammer v/s Crammer मधील भूमिका निव्वळ अजोड स्वरूपाच्या होत्या. अत्यंत देखणा तरीही कमालीचा लवचिक चेहरा तसेच अत्यंत प्रभावी अशी संवादफेक इत्यादी अनेक गुणांनी युक्त अशी ही अभिनेत्री, आजच्या काळात सर्वोच्च पदावर विराजमान झाली, हा काही योगायोग नव्हे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! अगदी सहमत आहे तुमच्याशी.

      Delete
  2. Krammer vs. Krammer, Out of Africa आणि The Hours या (केवळ) तीनच चित्रपटांतून एक उत्तम अभिनेत्री म्हणूनच परिचीत झालेल्या मेरील स्ट्रीपच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू केवळ तुमच्यामुळे कळली. धन्न्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा