'बंदसम्राटाची' सुसाट गोष्ट...

जुन्या राजकीय वर्तुळात संघ भाजपचे कार्यकर्ते असो वा समाजवादी, एकमेकांसमोर कायमच दंड थोपटून उभी असणाऱ्या या दोन्ही गटांचे लोक मात्र एका व्यक्तीसाठी प्रचंड हळवे होतात, ती व्यक्ती म्हणजे जॉर्ज फर्नांडिस! या दोन्ही गटांचा जॉर्ज हा हळवा कोपरा होता. जॉर्ज सारखा इमानदार माणूस आपण पाहिला नाही यावर या दोन्ही गटांचे एकमत असे. समाजवादी चळवळीत आयुष्य घालवलेल्या जॉर्ज एका क्षणी भाजपच्या गोतावळ्यात जावे लागले ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होती हे स्वतः जॉर्ज यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. निळू दामले यांनी 'सुसाट जॉर्ज' नावाने जॉर्ज यांची १९४० ते २०१० यादरम्यानची कारकीर्द पुस्तक रुपाने मांडली आहे. या पुस्तकाला चरित्र म्हणण्यापेक्षा जॉर्ज यांच्या राजकीय जीवनाचे 'प्रोफाइल' म्हणणे जास्त उचित होईल. मंगळूर मध्ये जन्मलेल्या जॉर्ज यांची सर्व राजकीय कारकीर्द मात्र बिहार मधल्या मुजफ्फरपुर या मतदार संघात गेली. जात-पात, धर्माच्या अस्मिता प्रचंड टोकदार असणाऱ्या बिहार मध्ये तसा जन्माने ख्रिश्चन, पण स्वतःच्या आयुष्यात निधर्मी असणारे जॉर्ज हे बिहार मध्ये इतकी वर्षे टिकले कसे हा मोठा प्रश्न आहे? त्य...