लिखाणाचं मुलद्रव्य सांगणारा संवाद...

भारतात 1980 नंतर समाजात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक स्थित्यंतरे दिसू लागली. या काळात धनशक्तीने विवेकापासून फारकत घ्यायला सुरुवात केली. समाजाला मूल्यांची चाडही वाटेनाशी झाली. केवळ वित्ताचे आकर्षण वाटू लागले. यातून मग मोठ्या प्रमाणात व्यक्तिवाद बोकाळायला सुरुवात झाली. पण या सगळ्यांचं योग्य असं अर्थघटन करून ते इतरांना समजावून सांगणार कोण? उत्तम साहित्याची जबाबदारी जी सुरू होते ती इथूनच! साहित्य म्हणताच त्यात नाटक, कथा, कादंबरी निबंध हे सर्वच रस येतात. या सर्व माध्यमांतून समाज म्हणून आपण नक्की कुठून कुठे चाललो आहोत किंवा कुठून कुठे पोहोचलो आहोत? हा आरसा आपल्याला सकस साहित्य दाखवत असतं. आपल्या आजूबाजूला बदलणाऱ्या गोष्टींना टिपणारं कसदार असं साहित्य हे वाचकांना विचार करायला प्रवृत्त करत असतं. या साहित्याच्या वाचनातून वाचकाची संवेदनशीलता वाढत असते. प्रश्नांना कोणत्या पद्धतीने भिडायचं याचं दिग्दर्शन आपल्याला या साहित्यातून होत असतं. हे अंगी बाणवण्यासाठी काय करावं लागतं, हा बदल समजून घ्यायला आपण कमी पडत असू तर काय करावं? याचं उत्तर आहे त्यातलं ज्यांना कळतं, ज्यांना यातला दांडगा...