साहित्य - सिनेमा २०२१
साहित्य - सिनेमा २०२१ वाचन, लिखानाच्या दृष्टिकोनातून हे सरतं वर्ष कमालीचं सुखद गेलंय. लोकसत्तामध्ये 'बुकमार्क' सदराची या वर्षाची सुरूवातच माझ्या नेटफ्लिक्स वरील पुस्तकाच्या परीक्षणाने झाली. तो आनंद अजून द्विगुणीत झाला जेव्हा हातात पेपर घेतला आणि लक्षात आलं की शेजारी नंदा खरेंचा लेख आहे म्हणून. नोव्हेंबर मध्ये अतुल देऊळगावकर सरांच्या लेखा शेजारी दाणी शापीरो च्या पुस्तकावरील माझा लेख आला होता. याचा अर्थ असा नाही की मी या दोघांशी माझी बरोबरी करत आहे. पण माझ्यासारख्या लिहिण्याच्या क्षेत्रात नवख्या असलेल्याला हे सुख खूप आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने क्लासेस, काॅलेज पुन्हा बंद झाले आणि गेल्या वर्षाप्रमाणे हे वर्षही आर्थिक कंबरडे मोडते की काय असं वाटायला लागलं. पण जुलै नंतर परिस्थितीमध्ये खूप फरक पडला. पाऊस चांगला झाल्याने शेतीने आर्थिक बाजू चांगलीच लावून धरली. आॅगस्ट महिन्यात जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा जेष्ठ लेखिका प्रतिभा रानडेंची त्यांच्याच निवासस्थानी झालेली भेट ही फार ऊर्जा देणारी ठरली. त्याच पुणे ट्रिपमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने त्यांच्या ...