साहित्य - सिनेमा २०२१
साहित्य - सिनेमा २०२१
वाचन, लिखानाच्या दृष्टिकोनातून हे सरतं वर्ष कमालीचं सुखद गेलंय. लोकसत्तामध्ये 'बुकमार्क' सदराची या वर्षाची सुरूवातच माझ्या नेटफ्लिक्स वरील पुस्तकाच्या परीक्षणाने झाली. तो आनंद अजून द्विगुणीत झाला जेव्हा हातात पेपर घेतला आणि लक्षात आलं की शेजारी नंदा खरेंचा लेख आहे म्हणून. नोव्हेंबर मध्ये अतुल देऊळगावकर सरांच्या लेखा शेजारी दाणी शापीरो च्या पुस्तकावरील माझा लेख आला होता. याचा अर्थ असा नाही की मी या दोघांशी माझी बरोबरी करत आहे. पण माझ्यासारख्या लिहिण्याच्या क्षेत्रात नवख्या असलेल्याला हे सुख खूप आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने क्लासेस, काॅलेज पुन्हा बंद झाले आणि गेल्या वर्षाप्रमाणे हे वर्षही आर्थिक कंबरडे मोडते की काय असं वाटायला लागलं. पण जुलै नंतर परिस्थितीमध्ये खूप फरक पडला. पाऊस चांगला झाल्याने शेतीने आर्थिक बाजू चांगलीच लावून धरली. आॅगस्ट महिन्यात जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा जेष्ठ लेखिका प्रतिभा रानडेंची त्यांच्याच निवासस्थानी झालेली भेट ही फार ऊर्जा देणारी ठरली. त्याच पुणे ट्रिपमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने त्यांच्या पायावर डोके ठेवता आले याबद्दल मी मित्र ओंकार जोशी यांचा कायमच ऋणी राहील.
यावर्षीही कोरोनामुळे मधल्या कळात हक्काची सुट्टी असल्याने खूप वाचता आलं. खूप वेगवेगळ्या संगीतकारांना यु ट्यूबवर ऐकता आलं. कित्येक उत्तोमोत्तम सिनेमे पाहता आले यावर्षी. दीड वर्षांच्या कोरोना काळानंतर थिएटरमध्ये जाऊन 'पुष्पा' पाहीला. लोकसत्तामध्ये यावर्षी बरेच लेख लिहिण्याची तसेच साधनामध्येही लिहिण्याची संधी मिळाली. यावर्षीच्या 'शब्दालय' च्या दिवाळी अंकात सरहद्द गांधी 'खान अब्दुल गफारखान' यांच्यावर एक लेख लिहिला. त्यानिमित्ताने भरपूर वाचन झालं. वाचनामुळे नवनवीन संगीत, सिनेमे, पुस्तकं समजत गेले. कित्येक मित्रांनी/मैत्रिणींनी पाठवलेले लेख यांनीही मनाची चांगली मशागत केली. सप्टेंबर -आॅक्टोबर या दोन महिन्यात सगळ्या आनंदाची गोष्ट जर काय घडली असेल तर ती ही कि फेसबुकच्या पलीकडे फार ओळख नसतानाही छतोला (उत्तराखंड) स्थित असलेल्या श्रीमती अरुंधती देवस्थळे यांनी तब्बल दोन मोठी खोकी भरून इंग्रजी पुस्तके पाठवली. कमालीचा आनंद झाला होता त्यावेळी. या पुस्तक देवाणघेवाणीतून त्यांच्याशी एक छान स्नेहबंध जुळला. माझी एक चांगली मैत्रिण मनीषा उगले हिचे सुद्धा ॲग्रोवन मध्ये 'मशागत' या सदरातील काही लेख खूप आवडले. माझा एक जिवलग मित्र कैलास याच्याकडूनही खुप पुस्तके वाचायला मिळाली. प्रसाद कुमठेकर या मित्राने काही हिंदी पुस्तके पाठवली होती. यावर्षाचा शेवट फार सुखद धक्याने झाला जेव्हा माझी एक मैत्रीण प्राची हिने मला 'धरणसुक्त' ही कादंबरी गिफ्ट पाठवली.
यावर्षी वाचलेली पुस्तके.
मराठी
१) सागरी परिक्रमेचा पराक्रम - कॅ. दिलीप दोंदे
२) पाकिस्तान अस्मितेच्या शोधात- प्रतिभा रानडे
३) काबुलनामा - फिरोज रानडे
४) अतित कोण ...मीच? - प्रसाद कुमठेकर
५) इति-आदि - अरुण टिकेकर
६) तत्वमसी - ध्रुव भट
७) आनंद ओवरी- दि.बा.मोकाशी
८) झुंजार क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो - अतुल कहाते
९) अरण्याहत - दा. गो काळे (कविता संग्रह)
१०) झुम्कुळा - वसीमबारी मनेर
११) निर्वासितांच्या समस्या आणि सुधारित नागरिकत्व कायदा- विभावरी बिडवे
१२) छ. शिवाजी महाराज जीवन रहस्य - नरहर कुरुंदकर
१३) अनफर्गेटेबल जगजित सिंग- सत्या सरन -अनुवाद उल्का राऊत
१४) यांनी घडवला इतिहास - सुनील खिलनानी -अनुवाद - सविता दामले
१५) औषधभान - मंजिरी घरत
१६) बोलू कवतिकें - अविनाश बिनीवाले
१७) वावटळ पेराल तर वावटळच उगवेल - वैशाली करमरकर
१८) बखर संस्थानांची - सुनीत पोतनीस
१९) सागरतीरी - ध्रुव भट
२०) कृष्ण सखा- उषा गिंडे
२१) बॅरिस्टरचं कार्ट - हिम्मतराव बावस्कर
२२) अशीही एक झुंज - मृदुला बेळे
२३) विवेकियांची संगती - अतुल देऊळगावकर
२४) कल्चर शाॅक -जर्मनी - वैशाली करमरकर
२५) बोलिले जे - अतुल देऊळगावकर
२६) सुसाट जाॅर्ज - निळू दामले
२७) ऐकता दाट - अतुल देऊळगावकर
२८) ऋतूचक्र - दुर्गा भागवत
२९) अनुबंध -धर्मसंस्कृतीचे - प्रतिभा रानडे
३०) स्मरणवेळा - प्रतिभा रानडे
३१) तुकोबाचे वैकुंठगमन - दि.पु.चित्रे
३२) धर्म - इरावती कर्वे
३३) भाषा घडताना - अविनाश बिनीवाले
३४) भाषा आपली सर्वांचीच - अविनाश बिनीवाले
३५) शेअर बाजार - रवींद्र देसाई
३६) माफिया क्विन आॅफ मुंबई - झैदी - अनुवाद - उल्का राऊत
३७) ह्युमनकाइंड- रुटगर ब्रेगमन - अनुवाद - सविता दामले
३८) वाचत सुटलो त्याची गोष्ट- निरंजन घाटे
३९) शासन साहित्यिक आणि बांधिलकी - दुर्गा भागवत
४०) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
४१) शर्मिष्ठा - मंगेश पाडगावकर (नाट्य काव्य)
४२) नीलमोहोर -जयश्री वाघ (कविता संग्रह)
४३) आपलं घर - मुनि क्षमासागर अनुवाद- बलवंत जेऊरकर (कविता संग्रह)
४४) बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
४५) काॅन टिकी -थाॅर हेअरवाॅल - अनुवाद -रवींद्र गुर्जर
४६) शासन, साहित्यिक आणि बांधिलकी - दुर्गा भागवत
हिन्दी
१) कुली लाईन्स - प्रवीण कुमार झा
२) एक साहित्यिक की डायरी - गजानन माधव मुक्तिबोध
३) एक देश बारह दुनिया - शिरीष खरे
४) आपका बंटी - मन्नू भंडारी
English
1) The Begum - Deepa Agarwal Tahmina aman
2) Creativity - John Cleese
3) Lahore - Haroon Khalid
4) The Fever - Sonia Shah
5) Masala Lab - Krish Ashok
6) The Perfect Nine - Ngũgĩ wa Thiong'o
7) The Hills we Climb - Amanda Gorman (poetry)
8) Story- ish - Peter H Raynold
9) Securing Democracy - Glenn Greenwald
10) The Inheritance - Dani Shapiro
11) The mutiny on HMS bounty - William Bligh
12) Sex and Lies - Leila Slimani
13) The Frontier Gandhi -My life my struggle - Khan Abdul Gafarkhan
14) The road of lost innocence - Somali Ma'am
15) Brain Wash - Ben Shapiro
16) Brain rule for work - John Medina
17) The Comfort Book - Matt Haig
18) Louis Braille - Beverly Birch
19) Notes on the nervous planet - Matt Haig
याव्यतिरिक्त
१) शब्द रुची -शास्त्रीय संगीत विशेषांक
२) सी.डी देशमुख विशेषांक
३) लोकसत्ता, साधना, माझा, शब्दालय, लोकप्रभा हे दिवाळी अंक वाचले
४) साधना वाचन विशेषांक
या वर्षभरात आवडलेले लेख
१) दिशा उजळताना - अतुल देऊळगावकर
२) राखेतून फुलला वटवृक्ष - डाॅ हिम्मतराव बावस्कर
३) विज्ञानाच्या बाजूने बोलणारे राजकारणी कमीच- जयंत नारळीकर
४) सह्यगीरी सागर आणि संगणक - डाॅ माधव गाडगीळ
५) माझं नातं सार्वभौम जीवनाशी - महेश एलकुंचवार मुलाखत
६) अनुवादकाचे वाचन - जेरी पिंटो
७) मोकाशींच्या कथेसोबत वाढत जाताना - पंकज भोसले
८) एक दर्शन - अफगाणिस्तानचे - मिलिंद बोकील (मौज दिवाळी अंक २०२०)
९) बिन्दूनादकलातीत - महेश एलकुंचवार
१०) उत्सव बहू थोर होत - गिरिश कुबेर
लोकसत्ता मधील आवडलेली सदरे
१) स्मृती आख्यान - मंगला जोगळेकर
२) थांग वर्तमानाचा - अंजली चिपलकट्टी
३) विदाव्यवधान - अमृतांशू नेरुरकर
४) गोष्ट रिझर्व्ह बँकेची - विद्याधर अनासकर
या वर्षी पाहिलेले आणि आवडलेले सिनेमे
1) Klaus (animated - Netflix)
2) Maidentrip (Documentary)
3) Is love enough Sir? - Netflix
4) A Billion colour story -Netflix
5) Master
6) Haveltica (Documentary)
7) Sawan (Pakistani cinema)
8) Maara (प्रचंड आवडलेला)
9) Ustad Hotel
10) June
11) Soorai Pottru
12) Lion of Desert
13) Kashmir (Times Now Documentary)
14) Taegukgi
15) The Mission
16) Portrait of girl on the fire
17) Love -What does science know about it (Documentary)
18) The last taboo ( अपंग व्यक्तींच्या सेक्स लाइफ बद्दल डाॅक्युमेंटरी)
19) Michael Collins
20) Bawandar
21) Picasso (marathi)
22) Koode
23) Kaas (शेती समस्येवरील शाॅर्ट फिल्म)
24) Pimpal (marathi)
25) What's eating Gilbert Grapes
26) Badha (marathi)
27) Dithi (marathi)
28) The Favorite
29) The secret of our DNA (Documentary)
30) The Monotonian (प्रचंड आवडला)
31) The Food Choice (Documentary)
32) Sarpatta
33) Doubt मेरिल स्ट्रिप चा
34) The Goat Horn
35) Spring Summer ..fall, winter and spring
36) The straight story
37) Gone Girl
38) Vincent van gogh painted with words
39) Never cry wolf
40) Aguirre, the Wrath of God
41) Greyhound
42) Oslo
43) kon Tiki
या व्यतिरिक्त ग्रंथाली वाॅच या युट्युब चॅनल वर 'ग्लोबल साहित्य सफर' ही राजीव श्रीखंडे यांची इंग्रजीतील अभिजात पुस्तकांची ओळख करुन देणाऱ्या मालिकेचे १६-१७ भाग पाहीले.
लोभ असावा
अजिंक्य कुलकर्णी
छान !
ReplyDeleteGreat
ReplyDeleteआम्हाला द्या कि काही पुस्तके , वाचुन परत करु
ReplyDeleteतुम्हाला खूप ज्ञान प्राप्त होतो हीच सरस्वती मातेकडे मागणी
Deleteछान. स्वतंत्र विचाराच्या लिखाणाची अपेक्षा. शुभेच्छा.
Delete"ना जाने जिंदगी का
ReplyDeleteये कैसा दौर है,
इंसान खामोश है
और ऑनलाईन कितना शोर है.."
अशा काहीशा वातावरणात आजची पिढी जगते आहे आणि अशा वेळी सर आपण प्रचंड ज्ञानाचा साठा प्राशन करता हे माझ्यासारख्या पामराला अविश्वसनीय आहे.आपले काही लेख मी वाचले होते.आपली शब्दप्रतिभा अफाट आहे.आपल्या या प्रयत्नांनी मोठमोठ्या लेखकांच्या भेटी झाल्या,ऋणानुबंध तयार झाले.
आपली चिकाटी, जिद्द, आवड, प्रयत्न यांना मानाचा मुजरा..👍👍
2022 वर्षातही आपणाकडून आम्हाला असेच आनंदी क्षण अनुभवता यावे ही सदिच्छा.