Posts

Showing posts from January, 2022

Band of Brothers

Image
जागतिक महायुद्धांमुळे मानवी जीवन अक्षरशः पुरतं ढवळून निघालेलं आहे. महायुद्धांचा अभ्यास करत असताना तो फक्त राजकीय अंगाने करणे इतकेच पुरेसं नसते. बऱ्याचदा आपल्या समोर तो राजकीय अंगानेच मांडला जात आहे. तर मानवी जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टींच्या अनुषंगानेही या युद्धांचा अभ्यास करावा लागतो. जसे महायुद्धापूर्वी व महायुद्धानंतर विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, माणसाची विचार करण्याची पद्धत, साहित्य, संगीत, सिनेमा असं एकही क्षेत्र नसेल ज्यावर या महायुद्धांचा परिणाम झाला नसेल. आज शंभर वर्षांनंतरही ही महायुद्धे साहित्य आणि सिनेमांना खाद्य पुरवत आहेत. त्यांचा मानवी जीवनावर काय व कसा परिणाम होतो याचे जवळजवळ तंतोतंत चित्रण करण्यात स्टीवन स्पिलबर्ग आणि टॉम हँग्स ही जोडी यशस्वी झाली आहे. या जोडीचा 'सेविंग प्रायवेट रायान' हा सिनेमा आणि 'बँड ऑफ ब्रदर्स' ही वेब सिरीज ही याची उत्तम उदाहरणं आहेत. दोन्ही महायुद्धाच्या दरम्यान समष्टीवाद आणि मनोमापन या विषयातील अभ्यासांनी शैक्षणिक मानसशास्त्र समृद्ध केलं आहे. प्रायोगिक मानसशास्त्राच्या अनेक अचूक पद्धतीही या महायुद्धांनंतरच तयार झाल्य...