Posts

Showing posts from February, 2022

गती आणि अवगती, संगतीयोगे

Image
  इंग्रजीत एक म्हण आहे ‘मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स’. या म्हणीत ‘मॅन’ हा केवळ पुरुषवाचक शब्द नाहीये, त्यात स्त्रियाही येतात. मुळात येथे ‘मॅन’ हा शब्द समस्त मानवजातीला उद्देशून आलेला आहे. माणसाची संगत ही वरील उक्तीप्रमाणे त्याची ओळख बनत जात असते. त्याच्या संगतीवरून त्याला ‘जज्‌’ केले जात असते. पण मग ही संगत काय फक्त शरीररूपाने लाभली पाहिजे असं आहे का काही? संगत ही अशरीरीसुद्धा असू शकते. बहुतेक वेळा असतेच. तर संगत ही उत्तम साहित्याची, संगीताची, चित्रपटांची, कलाकृतींचीही असू शकते. या संगतीमुळेच आपण जगण्यातील एकेक इयत्ता पुढे सरकत जात असतो. जगण्याच्या या इयत्तेला आता अजून एक आयाम द्यावाच लागणार आहे. त्या आयामाला डावलून आता आपल्याला पुढे जाता येणार नाही. तो आयाम म्हणजे ‘पर्यावरण’ हा होय. पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी वर उल्लेख केलेल्या विविध क्षेत्रांत आपला अमीट ठसा उमटवलेल्या विविध मान्यवरांशी वेगवेगळ्या काळांत केलेली बातचीत, घेतलेल्या मुलाखतींचे संकलन हे आता पुस्तकरूपाने वाचकांसाठी उपलब्ध आहे. हे पुस्तक म्हणजे ‘विवेकीयांची संगती’ हे होय. ‘विवेकीयांची संगती’ हे पुस्तक मनोवि...