रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

एकदा का चैत्र महिना सुरु झाला की गावागावात प्रत्येकाला चाहूल लागते ती आपल्या गावातील ग्रामदेवतांच्या यात्रेची. चैत्रात झाडांना जशी नवी पालवी फुटते तसेच मरगळलेल्या मनाला उत्साहाची पालवी फुटते ती या यात्रा उत्सवांमधून. दिवसेंदिवस काबाडकष्ट करून जेरीस आलेल्या शरीराला थोडा विसावा आणि कंटाळलेल्या मनानेही पुन्हा उत्साहाची भरारी घ्यावी हाच तर मूळ उद्देश असतो आपल्या सण उत्सवाच्या मागे. त्याला थोडे धार्मिक अधिष्ठान दिले जाते/गेले आहे इतकचं. पण या गावोगावच्या यात्रा, वेगवेगळे उत्सव हे चैत्र महिन्यानंतरच का येत असावे बरं ? या प्रश्नाचे उत्तर आपल्या कृषि संस्कृतीशी संबंधित आहे. चैत्रापर्यंत रब्बीचे पिकं काढून झालेले असतात. शेतकऱ्यांच्या गाठीशी थोडासा पैसाही आलेला असतो. उन्हाळा सुरु झाल्यामुळे शेतीची कामेही थोडी मंदावलेली असतात. आजकाल या काळात मुलांच्या परीक्षा देखील जवळजवळ संपलेल्या असतात. पण हे परीक्षांचे कारण झालं आजचं. या रिकाम्यावेळेत करायचे काय ? खाली मन शैतानका घर होता है असं जे म्हटलं जातं ते आपलं मन तसं सैतानी होऊ नये त्यासाठी त्या मनाला कुठेतरी चांगल्या कामात गुंतवावे लागेल. आता ते मन गु...