उषा प्रियंवदा यांच्या कादंबऱ्यांमधील स्त्री

पंचायत सिझन -२ पाहिली असेल तर त्यात रघुवीर यादव म्हणजेच पंचायत चे प्रधानजी यांच्यावर चित्रित केलेल्या एका दृष्यामधला हा खालील फोटो सर्वांनी पाहिला असेलच. तर, प्रधानजींच्या हातात आहे हिन्दी मधील जेष्ठ लेखिका उषा प्रियंवदा यांची "पचपन खंबे लाल दीवारें" ही कादंबरी. गेल्या वर्षी उषा प्रियंवदा यांच्या बऱ्याच कथा ऐकल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्याही वाचायला सुरुवात करायची होती पण, नोव्हेंबर २०२१च्या शेवटी मन्नू भंडांरींचे निधन झाले. मन्नूजींची पुस्तके पुन्हा वाचण्यात गर्क झाल्याने उषाजींना वाचायचं राहून गेलं होतं. 'पंचायत' मुळे ते पुन्हा उफाळून आलं. उषाजींच्या "पचपन खंबे लाल दीवारे" आणि "रुकोगी नहीं राधीका?" या दोन्ही कादंबऱ्या ऐकल्या. त्यातली 'पचपन खंबे...' ही खूपच आवडली. "रुकोगी नहीं राधीका?" या कादंबरीचा मला शेंडा बुडूख असं काहीच हाती लागलं नाही. 'रुकोगी नही..' मधीली राधीका असेल किंवा 'पचपन खंबे...' मधली सुषमा, ही जी या दोन्ही कादंबऱ्यांमधली मुख्य स्त्री पात्र आहेत ती उत्तम शिकलेली आहेत. या दोघी स्वतःची मतं स्वत...