Posts

Showing posts from March, 2023

Spelling Bee

Image
    अमेरिकेत दहा ते पंधरा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना एका स्पर्धेचं प्रचंड आकर्षक असतं अन् ती स्पर्धा म्हणजे 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी.' ही फक्त 'स्पेलिंग बी' म्हणूनही ओळखली जाते. अमेरिकेत सध्या या स्पर्धेत भारतीय वंशाची मुलं, मुली हे प्रचंड यश मिळवत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांना असं वाटत होतं की, "आपल्या कामाला इथे भारतात प्रतिष्ठा नाही किंवा म्हणावा असा वाव मिळत नाही किंवा पैसा मिळत नाही" त्या मंडळींनी भारत सोडून अमेरिकेत स्थाईक होण्याचा धोका पत्करला होता. ह्या पहिल्या पिढीचा काळ हा अमेरिकेत पाय रोवण्यातच गेला. दुसऱ्या पिढीलाही स्थिरस्थावर होण्यात बराच काळ गेला. पण गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून येत असलेल्या तिसऱ्या पिढीला मात्र चांगलेच सुगीचे दिवस आहेत. ह्या पिढीची म्हणजेच नव्वोद्दोत्तर पिढीची मुलं हे मात्र या स्पर्धेत कमालीचं यश मिळवत आहेत. लिंडन जाॅन्सन अमेरिकेचे अध्यक्ष असताना ३ आॅक्टो १९६५ साली त्यांनी एक बील पास केलं ज्याला 'नागरिकत्व कायदा १९६५' असे म्हणतात. या कायद्यात असं म्हटलं होतं की, "ज्यांना अमेरिकेत स्थाईक होण्याची...

फक्र-ए-अफगाण…

Image
अफगाणिस्तान या देशाचा इतिहास पाहता असे दिसते की, हा देश कायमच एक धगधगता अंगार राहीला आहे. आजही अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवला तेव्हा असे लक्षात वाटते की टोळी युगातून हा देश आजही बाहेर पडला आहे की नाही? पण याच पठाणांच्या देशात एक असा पठाण जन्माला आला होता ज्याने कधीही आपल्या हातात शस्त्र धरले नाही. मुळात ही कल्पनाच डोक्यात उतरत नाही की, एक पठाण गेल्या शतकात ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठं संघटन उभं करतो आणि त्याचा लढण्याचा मार्ग हा मात्र अहिंसा! पण हे खरं आहे की असा एक 'वीर' या मरूभूमीत जन्मला होता. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश म्हणजेच अवाढव्य अशा भारतीय उपखंडाचा इतिहास लिहिताना ज्यांना टाळून पुढे जाणे शक्यच नाही ते नाव म्हणजे खान अब्दुल गफारखान हे होय. बऱ्याच जणांना तर हे नावही ओळखीचं नसेल. स्वातंत्र्याच्या आगोदरची पिढी यांना 'खानसाहेब' किंवा 'बादशहाखान' म्हणत. इंग्रजीत 'फ्रंटिअर गांधी', हिन्दीत 'सीमान्त गांधी', मराठीत 'सरहद्द गांधी' तर अफगाणी लोक त्यांना 'बच्चा खान' म्हणत. पश्तू भाषेत 'बच्चा' शब्दाचा ...

निसर्गविनाश थांबवण्यासाठीची शेवटची हाक!

Image
     आपल्याकडे सर्वसामान्य व्यक्तिंची पर्यावरणाबद्दलची जी समज आहे ती फक्त 'झाडे लावा झाडे जगवा', 'पाणी आडवा पाणी जिरवा' आणि गेला बाजार 'गप्पी मासे पाळा हिवताप टाळा' इथपर्यंतच मर्यादित असते. पर्यावरणाची व्यापकता ही अशा चटकदार घोषवाक्यांपुरती तर अजिबात मर्यादित नाही. तसेच ती व्यापकता केवळ हवा, पाणी, झाडे इथपर्यंत ही मर्यादित नाही. उलट असं म्हणता येईल की, पर्यावरणाच्या अभ्यासाची, संवर्धनाची जी सुरुवात आहे ती मात्र ह्या गोष्टींपासून होते. हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणून आपण वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड ला जबाबदार धरतो. पण शास्त्रीय अभ्यास मात्र असं सांगतो की हवेच्या प्रदूषणास वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचा आठवा क्रमांक लागतो आहे. प्रदूषकांमध्ये प्रथम क्रमांकावर जर कोण असेल तर ती म्हणजे सर्व शहरांमध्ये सगळीकडे सुरू असलेली विविध प्रकारची बांधकामे, त्यातून पसरणारी धूळ. हवामान बदलामुळे मानव जातीचे व जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. निसर्ग विनाशामुळे तरुणाई कधी नव्हे ते आज सर्वात जास्त मानसिक तणा...