साहित्य - सिनेमा २०२३
.jpeg)
वाचन लिखानाच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष काही फार चांगलं गेलं नाही. कारण मागील दोन वर्षात जेव्हढं वाचन लेखन झालं त्या तुलनेत या वर्षी काहीच झालं नाही. आॅक्टोबर मध्ये एक परीक्षा असल्याने आॅगस्ट सप्टेंबर मध्ये त्याचा अभ्यासच सुरु होता. पण काही पुस्तकांनी मात्र खूपच चांगला वाचनानंद दिला. काही पुस्तकांनी अंतर्मुख व्हायलाही भाग पाडलं. उगाच लांबण न लावता वर्ष २०२३ मध्ये वाचलेली पुस्तके, पाहिलेले सिनेमे/डाॅक्युमेंटरी वाचलेले दिवाळी अंक यांची ही यादी. वाचलेली पुस्तके (२०२३) मराठी १) महाराष्ट्राची लोकयात्रा - डाॅ. सदानंद मोरे २) आय ॲम ओके यू आर ओके - थाॅमस हॅरिस - अविनाश ताडफळे ३) कालान्तर - अरूण टिकेकर ४) दृष्टिभ्रम - डाॅ. बाळ फोंडके ५) उद्या काय झालं - डाॅ. बाळ फोंडके ६) माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर ७) जगप्रसिद्ध विज्ञानकथा - निरंजन घाटे ८) चिरंजीव - डाॅ.बाळ फोंडके ९) जनक - शार्दुल सराफ (नाटक) १०) प्रेषित - जयंत नारळीकर ११) गर्नसी वाचक मंडळ - मेरिअॅन शाॅफर १२) चित्रपट प्रवाहांचा इतिहास - गणेश मतकरी १३) सिनेमाची गोष्ट - अनिल झणकर १४) निसर्गकल्लोळ - अतुल देऊळगावकर १५) पश्चिमप्रभा - महेश ...