लेखकाची गोष्ट

भारतीय तत्वज्ञान हे मुख्यतः तीन प्रश्नाचा शोध घेत असते. मी कोण?, मी कोणाचा? आणि मी कोणासाठी?. यातल्या मी कोण या प्रश्नाचे उत्तर हे व्यक्तीसापेक्ष आहे. याच 'मी कोण?' या प्रश्नाचे माझं स्वतःचे उत्तर काय तर, 'मी एक लेखक आहे.' हे शोधण्याचा लेखक म्हणून केलेला प्रयत्न म्हणजेच विश्राम गुप्तेंच लेखन आत्मचरित्र 'लेखकाची गोष्ट' हे होय. आत्मचरित्रात त्या व्यक्तिच्या समकालीन आर्थीक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे चित्रणही यायला हवे. केवळ चरित्रनायकाच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तीबद्दलचंच लिखान नको. गुप्तें आपल्या या गोष्टीत या सामाजिक, राजकीय, साहित्यिक पर्यावरणाचा वेधही घेतात व त्यांना आपल्या परीने डिकोड करण्याचाही प्रयत्नही करतात. मराठी साहित्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, मराठी लेखक हे प्रायः कौटुंबिक लिहितात. तसं लिखान करण्यात वाईट असं काहीच नाही परंतु ते लिखान हे अपूर्ण आहे असं समजावं. साहित्य विश्वात जे जे ग्रेट साहित्य लिहिलं गेलं आहे ते ते माणसाला सतत भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालत असते. सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात साहित्य वर्तुळात तसेच राजकीय वर्तुळातही दोन गट ...