साहित्य संगीत सिनेमा - २०२०

२०२० या सालाने आनंद दिला असं जर कुणी म्हणालं तर, त्यावर कुणाचाच  विश्वास बसणार नाही! सक्तीच्या टाळेबंदीमुळे माझं मात्र कचकावून वाचन, सिनेमे, वेबसिरिज पहाने जेव्हढं या वर्षी झालं आहे ते पुन्हा होणे नाही! या वर्षाची सुरूवात दमदार झाली होती. वीणाताईंच्या घरी मुक्कामी असताना झडलेल्या वाद विवादांनी चांगलीच तरतरी आली होती. पण नंतर पुढच्याच महिन्यात टाळेबंदी सुरू झाली आणि आर्थिक बाबतीत माझं चांगलच कंबरडं मोडलं. शेती आहे म्हणून तगलो अन्यथा ... हा 'अन्यथा' फार अस्वस्थ करतो मला आजही. करोना झालेल्या कित्येक मित्रांचे नातेवाईक गेले, माझेही काही नातेवाईक गेले. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवर एकच कोणती आनंदाची गोष्ट घडली असेल तर ती आहे वाचन, सिनेमे आणि वेबसिरिज पाहणे हे होय!  वाचनाच्या, पाहण्याच्या, लिखाणाच्या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. त्याच आनंदाचा हा धावता धांडोळा. टाळेबंदीत असेल किंवा ती शिथिल झाली त्यावेळी मला कित्येक लोकांनी, मित्रांनी पुस्तके पाठवली त्याबद्दल त्यांच्या ऋणातच मला रहायला आवडेल. यावर्षीचा शेवट तर फार गोड झालाय सातआठ महिन्यापासून अमेरिकेच्या इतिहासावर एक पुस्तक शोधत होतो. ॲमेझाॅन डाॅट काॅम हे ते पुस्तक भारतात पाठवायला नकार देत होतं. पण षण्मुखानंद भाऊंनी ते अमेरिकेतून पाठवल्यामुळे ते एक काम हातावेगळं झालं. गेल्या आठवड्यात माझी एक मैत्रीण मनीषा हिने जे कविता संग्रह आणि इतर पुस्तकांचे घबाड दिलं आहे ते येत्या वर्षात वाचून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. फार लांबण न लावता सरत्या वर्षात वाचलेली पुस्तके, पाहिलेले सिनेमे, वेबसिरीज आणि आवडलेले काही लेख याची यादी देतोय. 

A) आवडलेली पुस्तके

मराठी 

१) डाॅ. झिवागो (अनुवाद - आशा कर्दळे)

२) अंताजीची बखर - नंदा खरे

३) अभयारण्य - नरहर कुरुंदकर

४) राजधानीतून - अशोक जैन

५) कासवांचे बेट - संदीप श्रोत्री

६) वैदिक - राजीव पुरूषोत्तम पटेल

७) मंच - डॅनिअल मस्करणीस

८) विवेकियांची संगती - अतुल देऊळगांवकर

९) भगतसिंग - प्रा.चमनलाल(अनुवादित)

१०) रेडिओ दुर्बिण - सुधीर फाकटकर

११) अर्थाच्या शोधात - विक्टर फ्रँकल (अनुवादित)

१२) बाराला दहा कमी - पद्मजा फाटक

१३) आलोक - आसाराम लोमटे

१४) कहाणी मानवप्राण्याची - नंदा खरे

१५) व्यासपर्व - दुर्गा भागवत

१६) पैस - दुर्गा भागवत

१७) इंडिका - प्रणय लाल (अनुवाद - नंदा खरे)

१८) द फर्स्ट फिरंगीज - जोनाथन गील हॅरीस (अनुवाद-रेखा देशपांडे)

१९) तोल - महावीर जोंधळे

२०) किरणपाणी - महावीर जोंधळे

२१) इन्शाअल्लाह - अभिराम भडकमकर

२२) फाळणी ते फाळणी - प्रतिभा रानडे

२३) पाकिस्तान, अस्मितेच्या शोधात - प्रतिभा रानडे

२४) वाचत सुटलो त्याची गोष्ट - निरंजन घाटे

२५) अशक्य भौतिकी - मिशिओ काकू ( अनुवाद- लिना दामले)

२६) इवलं माझं हस्ताक्षर - संजय चौधरी (कविता संग्रह)

२७) वही - ना. धो. महानोर (कविता संग्रह)

हिन्दी

१) दिवार में एक खिड़की रहती थी - विनोद कुमार शुक्ल

२) उर्वशी - रामधारी सिंग दिनकर

३) संस्कृती के चार अध्याय - रामधारी सिंग दिनकर

४) अनंत में फैलते बिंब - इंदुप्रकाश कानुनगो

५) महाभारत - अमर चित्र कथा प्रकाशित

६) बस्ती - इंतिजार हुसैन

७) अदालत - अमृता प्रितम

८) कनुप्रिया - धर्मवीर भारती 

इंग्रजी

1) Music of Chameleon - Truman Capote

2) Anarchy - William Dalrymple

3) Call of the Wild - Jack london

4) Fahrenheit 451- Ray Bradbury

5) Deep work - Carl Newport

6) The secret Network of Nature - Peter whollebean 

7) Celestial bodies - Jokha-al-Harthy 

8) The kite runner - Khalid Hussein

9) No rules rules - Reed Hastings, Erin Mayer

10) Bananas - Peter Champbel

11) Red batch of Courage - Stephen Crane


दिवाळी अंक

लोकसत्ता दिवाळी अंकात प्रताप भानू मेहता यांचा, तसेच हायपेशिया वरचा लेख आवडला. लोकप्रभा चा दिवाळी अंक तर संग्रह करावा असाच असतो नेहमी. नेहमी आवर्जुन घेतो तो 'उत्तम अनुवाद' या अंकातल्याही अनुवादित कथा,लेखांनी दिवाळी मजेत गेली. Online अंकांमध्ये ज्ञानभाषा दिवाळी २०२०, मुक्त शब्द, इतिहासाच्या पाउलखूणा, शब्द रुची या अंकांमधलेही बरेच लेख आवडले.



B) यावर्षी पाहिलेले आणि आवडलेले सिनेमे

१) अंबिली (मल्याळम)

२) असुरन (तमीळ)

३) जलिकट्टू (तेलगू)

४) व्हाईट फँग

५) गुलाल

६) गगन दमामा बाज्यो (भगतसिंग यांच्यावर नाटक)

७) ज्युली & ज्युलिया

८) फँटम थ्रेड

९) द हेल्प

१०) हिडन फिगर

११) क्रेझी स्टुपीड लव्ह

१२) शेप आॅफ वाॅटर

१३) आय टोन्या

१४) गॅटिसबर्ग

१५) ग्लोरी

१६) द प्रोफेसर अँड मॅडमॅन

१७) द इंटर्न

१८) इट प्रे अँड लव

१९) शिप आॅफ थिसस

२०) अगोरा

२१) १९१७

२२) द ग्रेट डिबेटर

२३) द बाॅय हू हार्नेस द विंड

२४) महानटी (तमीळ)

२५) पेरान्बू (मल्याळम)

२६) बेंगलोर डायरी (मल्याळम)

२७) कुंबलंगी नाईट्स (मल्याळम)

२८) अटोनमेंट

२९) द विंड रायझेस (ॲनिमेटेड)

३०) व्हेन मार्नी वाॅज देअर (ॲनिमेटेड)

३१) रोमा

३२) वंडर

३३) फ्रिदा

३४) आफ्रिकन डाॅक्टर

३५) रॅम्स

३६) हर(Her)

C) यावर्षी पाहिलेल्या आवडलेल्या वेब सिरिज

१)जॅक रायान S1

२) द क्वीन्स गँबीट

३)क्राउन s4

४) स्पाय

५) सेल्फ मेड

६) अन आॅर्थोडाॅक्स

७) माॅडर्न लव्ह

८) व्हर्जीन रिव्हर s1

९) ब्रीद s1

याव्यतिरिक्त you tube वर केट हंबल हिने BBC सोबत केलेल्या Wild shefherdess with Kate Humble ही अफगाणिस्तानात, पेरू, आॅस्ट्रेलिया इथल्या अती दुर्गम भागातल्या मेंढपाळांच्या जीवनावरील डाॅक्युमेंटरीज पाहिल्या.  त्यांचं जीवन समजून घेताना आपल्याही ज्ञानात भर पडते की किती प्रतिकूल परिस्थितीत लोक राहतात तरी जगणं सोडत नाही. तिचीच अजुन एक मस्त सिरिज आहे ती म्हणजे Living with Nomads नावाची. तिचेही सर्व भाग पाहीले मी.

या व्यतिरिक्त वर्षभर वर्तमानपत्रातून जे लेख वाचले त्यांनीही कमालीचा आनंद दिला, अस्वस्थही केलं. गिरीश कुबेरांचे अन्यथा सदरातील 'हस्तप्रक्षालनार्थ' आणि 'त्या ध्वजाला वंदन' हे खास कुबेरी शैलीतले लेख फार आवडले. लोकरंग मधले प्रशांत कुलकर्णी यांचे 'हास्य आणि भाष्य' हे सदर तर इतकं आवडलं की वर्षभर त्या सदराची कात्रणे काढून ठेवलेली आहेत. अतुल देऊळगांवकरांचे 'विश्वाचे अंतरंग' मधले काही लेख आवडले. प्रज्ञा शिदोरे यांच्या 'यत्र तत्र सर्वत्र ' या सदरातील सुरुवातीचे लेख छान होते नंतर फार नाही आवडलं हे सदर. चतुरंग मध्ये नव्याने मित्र झालेला योगेश शेजवलकर याचे 'अपयशाला भिडताना' या सदरातल्या बऱ्याच कथा आवडल्या. प्रसाद कुमठेकर या मित्राने सुरूवातीला 'मी काय म्हणतो' हे दीव्य मराठीतल्या सदरात लिहिलेले लेख आवडले. लाॅकडाउन सुरु झालं अन् तो हे सदर लिहू शकला नाही. माझा मित्र हेरंब ओक याचा जॅक रिचर वर लिहिलेला फेसबुकवरचा लेख तर फारच सुंदर होता. कित्येक मित्रांनी whats app च्या माध्यमातून विविध लेख पाठवले त्याची गिनतीही केलेली नाही.

अजिंक्य कुलकर्णी

Comments

  1. भारी सर पण कसं जमतं हे एव्हढं सगळं

    ReplyDelete
  2. कुल्या तुझ्याकडून ही गोष्ट उचलतोय
    मीपण नववर्षात तुझ्या 1 टक्का वाचनाचा निर्धार करतो.
    बाकी
    26 नंबर च्या कवितेचं नाव चुकीचं वाचलं होतं 😂

    ReplyDelete
  3. फारच समृद्धीचा काळ ठरला हा तुला.छान

    ReplyDelete
  4. सर मी पण 2021 मध्ये दररोज थोड तरी वाचन करतोच आता

    ReplyDelete
  5. Perfect utilisation of lockdown. Well done Bhau. Keep up the good work.

    ReplyDelete
  6. I can only say one word - "Inspirational"

    ReplyDelete
  7. अमीरी और क्या होती है दोस्त. लाल हरे पीले नीले कागज़ी तुकडे तो आते जाते रहते हैं 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा