समाजवादाचा एक निरलस सात्विक चेहरा.

स्थळ पुणे,साने गुरुजी नुकत्याच मॅट्रिकला आलेल्या काही मुलांना घेऊन फर्ग्युसन काॅलेजच्या मागच्या टेकडीवर घेऊन जातात आणि मुलांना शपथ घ्यायचे आवाहन करतात, गुरुजी म्हणाले,"गोखल्यांनी इथेच देशसेवेची शपथ घेतली व जीवनभर पाळली. तुम्हीही शपथ घ्या की आपली मायभूमी स्वतंत्र होण्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण कराल.या पुढच्या स्वातंत्र्य लढ्यात आपण तुरूंगातच भेटू!". याच किशोरवयीन मुलांच्या समुहात एक साधा मुलगा होता नाव होते गणेश प्रभाकर प्रधान (ग.प्र.प्रधान) उर्फ प्रधान मास्तर. आज २६ आॅगस्ट प्रधान सरांचा जन्मदिवस. आजपासून (२६/०८/२०२१) त्यांची जन्मशताब्दी सुरु होते आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा ब्लाॅग. पुढे १९४२ च्या गांधींच्या चलेजाव आंदोलनात सहभागी झाल्यामुळे येरवडयाच्या तुरूंगात साने गुरूजींच्या सोबत राहण्याचा योगही आला. फर्ग्युसन मध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून २० वर्षे नोकरी केली. सक्रिय राजकारणात यायचे तर नोकरी सोडावी लागेल अशी सक्त ताकित फर्ग्युसन चे प्राचार्य भाटे सरांनी त्यांना नोकरीवर रूजू करून घेताना दिली होती. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी ती म...