Totalitarianism ची भाष्यकार हॅना अॅरेंट

ज्यूंचा खातमा करण्याच्या मोहिमेत जवळजवळ साठ लाख लोक प्राणाला मुकले. त्यातल्या पन्नास लाख ज्यू एकट्या अॅडाॅल्फ आइकमन (चित्रपटात उच्चार आहे 'आइशमान') याने मारले होते. हिटलरनेच आइकमनला गेस्टोपोंच्या ज्यू विभागाचा प्रमुख केलं होतं. जर्मनी, झेकोस्लोव्हाकिया, नेदरलँड, हंगेरी, ग्रीस, फ्रान्स, प.रशिया या ठिकठिकाणाहून ज्यूंना पकड्यात आले होते. आॅस्ट्रीयाच्या आॅश्वित्समध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका छावणीत विषारी वायूने एका वेळी पंधरा हजार लोक मारले जात असे. पुढे दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. इस्रायली गुप्तहेर संघटना 'मोसाद' चा प्रमुख इसर हॅरल यांना आइकमनचा सुगावा लागला. हॅरल ने खात्री करुन घेतली की तो आइकमनच आहे का म्हणून. हॅरल यांनी ही माहिती इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियाॅन यांना कळवली. गुरियाॅन यांनी आइकमनला पकडायला सांगितले. आइकमन पकडला गेला खरा पण ते अर्जेटिना मध्ये. आइकमनला अर्जेटिना मधून गुपचूप इस्रायल मध्ये आणलं गेलं आणि त्याच्यावर जेरुसलेम मध्ये खटला भरला गेला. या खटल्याच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी 'द न्यू याॅर्कर' या अमेरिकन वृत्तपत्रातर्फे एक जर्मन ...