Totalitarianism ची भाष्यकार हॅना अॅरेंट

 ज्यूंचा खातमा करण्याच्या मोहिमेत जवळजवळ साठ लाख लोक प्राणाला मुकले. त्यातल्या पन्नास लाख ज्यू एकट्या अॅडाॅल्फ आइकमन (चित्रपटात उच्चार आहे 'आइशमान') याने मारले होते. हिटलरनेच आइकमनला गेस्टोपोंच्या ज्यू विभागाचा प्रमुख केलं होतं. जर्मनी, झेकोस्लोव्हाकिया, नेदरलँड, हंगेरी, ग्रीस, फ्रान्स, प.रशिया या ठिकठिकाणाहून ज्यूंना पकड्यात आले होते. आॅस्ट्रीयाच्या आॅश्वित्समध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका छावणीत विषारी वायूने एका वेळी पंधरा हजार लोक मारले जात असे. पुढे दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. इस्रायली गुप्तहेर संघटना 'मोसाद' चा प्रमुख इसर हॅरल यांना  आइकमनचा सुगावा लागला. हॅरल ने खात्री करुन घेतली की तो आइकमनच आहे का म्हणून. हॅरल यांनी ही माहिती इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियाॅन यांना कळवली. गुरियाॅन यांनी आइकमनला पकडायला सांगितले. आइकमन पकडला गेला खरा पण ते अर्जेटिना मध्ये. आइकमनला अर्जेटिना मधून गुपचूप इस्रायल मध्ये आणलं गेलं आणि त्याच्यावर जेरुसलेम मध्ये खटला भरला गेला. या खटल्याच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी 'द न्यू याॅर्कर' या अमेरिकन वृत्तपत्रातर्फे एक जर्मन ज्यूइश तत्त्वज्ञ हजर होती तीचं नाव 'हॅना अॅरेंट'.


      या खटल्यावर आधारीत Eichmann in Jerusalem हे नंतर प्रचंड प्रसिद्ध पावलेलं पुस्तकात Banality of Evil हा एक नवा सिद्धांत मांडला. स्वतः होलोकाॅस्टमध्ये भरती होता होता ती वाचली होती. स्वतः ज्यू असूनही उलट तिने या पुस्तकात 'दुष्कृत्यांचे सामान्यीकरण' सिद्ध करताना त्यात जर्मनीतील ज्यू नेत्वालाही दोषी ठरवले. तिच्या या नात्झींच्या उलट प्रतिपादनामुळे तिच्यावर ज्यू जबरदस्त नाराज झाले. हॅना ही पहिली व्यक्ती आहे जिणे तिसऱ्या आलिया लाटेवर(Third Reich) भाष्य केलं पण पाश्चात्त्यांच्या धाटणीत. 

       हॅना आइकमनचं विष्लेषण करताना म्हणते की, त्याने कित्येक लोकांना मृत्यूच्या दरीत पोहोच केलं पण तो स्वतःला या कृष्णकृत्याला जबाबदार समजत नसे. एकदा का रेल्वेच्या रेल्वे ज्यूंनी भरलेल्या बोगी जेव्हा रूळावरून धावायला सुरुवात झाली का मग आइकमन चे काम संपते. हिटरलच्या काॅन्सनट्रेशन कँप उभारण्यामागे काय विचारसरणी होती याचा उहापोह करताना हॅना म्हणते की,"मारण्याच्या आगोदर कैद्यांना हे पटवून दिलं जायचं की,या जगात तुमची काहीच आवश्यकता नाहीये. कँम्पातल्या कैद्यांना हे ही पटवून दिलं जायचं की तुम्हाला दिली जाणारी शिक्षा ही तुम्ही काही गुन्हा केला आहे म्हणून नव्हे तर तुमच्या जगण्याने जगाला काहीच फायदा नाहीये". हा असा जबरदस्त ब्रेन वाॅश केला जात असेल अशी हॅनाची मांडणी होती. आणि हे सर्व जर खरं असेल तर यालाच तिने नाव दिले Totalitarianism. 

    या चित्रपटात एका प्रसंगी हॅना आणि तिच्या शिक्षकात 'विचार करणे म्हणजे काय?'  यावरचा संवाद फार सुरेख जमलाय. ते मुळ संवाद चित्रपटातच ऐकायला वाचायला मजा आहे. या चित्रपटात कॅमेरा वर्क फार अप्रतिम झालेलं आहे. हॅनाची भूमिका करणारी बार्बरा सुकोवा ही पडद्यावर पुरून उरली आहे. चित्रपटात कोर्टात खटला चालू असताना ती आइकमनच जे निरीक्षण करताना, विद्यापीठात शिकवत असताना व चित्रपटाच्या शेवटी विद्यार्थ्यांना संबोधताना जे काही तिचे क्लोजप दाखवले आहे ते निव्वळ कमाल आहे. चित्रपटात डिटेलिंग वर चांगलं लक्ष दिले गेलं आहे. एक विशेष सुचना हा चित्रपट पहायची इच्छा झाल्यास कंपल्सरी इंग्रजी सबटायटल सहितच पहा. यात ३०% संवाद हे जर्मन/हिब्रू भाषेत आहेत आणि तेच समजणे सर्वात जास्त महत्वाचे आहे. 

अजिंक्य कुलकर्णी.

Comments

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा