कॅप्टन फॅन्टॅस्टिक

मी नुकताच कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा सिनेमा पाहिला. ॲमेझाॅन प्राईमवर तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिनेमाची मध्यवर्ती गोष्ट अशी की यातला मुख्य नायक बेन (व्हिगो माॅर्टेसन) हा विधुर आहे. त्याची प्रिय पत्नी ही एका मनोविकाराशी झुंज देत असताना या जगाचा लवकरच निरोप घेते. बेन हा म्हटला तर जरा जास्तच आडमूठा आहे. त्याच्यावर थोरो या अमेरिकन विचारवंताचा प्रभाव दिसतो. म्हणजे बेन असा विचार करतो की माणसांना शाळा, काॅलेजांची गरजच काय? जे काही शिकायचं असेल ते आपण निसर्गाकडूनच शिकावं. स्वतःला चार भिंतीत कोंडून शिकण्यापेक्षा हिंडावं फिरावं त्यातून जे शिकता येईल ते शिकवं यावर तो ठाम असतो. आपल्या पत्नीवर वैद्यकीय इलाज काम करत नाहीये; तेव्हा बेन एक मोठा निर्णय घेतो की, आपण दोघांनी मुलांसह जंगलात जाऊन रहावं. तेही कायमचं. तस ते दोघे करतात पण. त्याची सहा मुलं घेऊन ते जंगलात राहतात पण. बेन एका मोठ्या बस मध्ये सर्व सोयी करवून घेतो आणि जातो मुलाबाळांसह जंगलात रहायला. सोबत चिक्कार पुस्तक घेऊन जातो ज्यात जेरेड डायमंड च्या गन्स,जर्म्स ॲन्ड स्टिल पासून ते नाॅम चोम्स्कीच्या सर्व पुस्तकांपर्यंत अशी सगळ्यांची पुस्तके असतात....