शासन, साहित्यिक आणि बांधिलकी

आणीबाणीतल्या अनुभवाने दुर्गाबाईंना आतून बाहेरून हालवून टाकले होते. शासन म्हणजे लेखकांचे आश्रयदाते आणि लेखक म्हणजे जणू त्यांचे आश्रित. आणिबाणी नंतर दुर्गाबाई स्वतःशीच विचार करु लागल्या की लेखक नि शासक यांच्यामधला संबंध नेमका कसा असावा? काही लेखकांच्या मते तो सौहार्दाचा असावा. पण असा विचार करणे हे पूर्णपणे एकतर्फी आहे. कारण शासनाचा पक्ष हा केव्हाही इतका सामर्थ्यशाली असतो की तो तुमच्या (म्हणजेच साहित्यिकांच्या) सहकार्यास फारसा उत्सुक नसतो. राज्यकर्त्ये स्वतः मोठेपणा मिरवण्यासाठी, "लेखकांना अनुदाने देणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्यच आहे!" अशी भाषणेही करत असतात. पण यात छुपा अर्थ असा असतो की, "आम्ही तुम्हाला दान देत आहोत". आणि बहुसंख्य लेखकांना ही अनुदाने दान वा उपकार न वाटता ती त्यांची हक्काची देणगी वाटते. लेखकांचा दावा हा असतो की शासनाच्या या अनुदानामध्ये दान किंवा उपकार काहीही नसते तर तो जनतेचा पैसा परत जनतेलाच दिला जात असतो. मग प्रश्न असा पडतो जर जनतेचा पैसा जनतेलाच परत द्यायचा असेल तर तो एका विशिष्ट वर्गालाच(लेखक, गायक, खेळाडू इ) का दिला जातो? सुतार, लोहार, चांभार ...