साहित्य -सिनेमा - २०२२
वाचन, लेखन आणि सिनेमा पाहणे या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. यावर्षी वर्षभर ॲग्रोवन मध्ये एक 'मशागत' नावाचं साप्ताहिक सदर लिहिलं. मशागतचा अतिशय चांगला अनुभव आला. यावर्षीची सुरुवातच खूप छान झाली होती. पुणे आकाशवाणीवरील 'साहित्य विश्व' या कार्यक्रमात मराठी पुस्तकांची ओळख करवून देता येत होती. सात आठ मराठी पुस्तकांवर लिहायची संधीही मिळाली. पण पुढे हा कार्यक्रमच पुणे आकाशवाणीने बंद केला. तरी साधना, लोकसत्ता बुकमार्क, कर्तव्य साधना इथे चांगल्या पुस्तकांवर लिहिता आलं याचं समाधान आहेच. या वर्षी (२०२२) 'सिद्धार्थ' या हरमन हेस लिखित नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीला प्रकाशित होण्यास १०० वर्ष पूर्ण होत असल्याने दिल्लीच्या गाॅथे इनस्टिट्यूट, मॅक्समुल्लर भवनाच्या वेबसाइटसाठी सिद्धार्थवर एक लेख लिहिला. जयश्री हरी जोशींमुळे ही संधी मिळाली.
शेती, काॅलेज, क्लासेस, या व्यापातून वाचनासाठी वेळ काढणे ही खरंच मोठी कसरत आहे. २३ जुलै रोजी आजीचे निधन झाले. तसेच २० आॅक्टोबरला गावात झालेल्या ढगफुटीने वाचनात मोठाच खंड पडला. मानधनाच्या बाबतीत मला साधना, लोकसत्ता आणि ॲग्रोवन यांचा फारच चांगला अनुभव आलाय. मे महिन्यात हिन्दी साहित्य विश्वात रजनी मोरवाल यांच्या 'कोका किंग' या हंस मासिकातील लिहिलेल्या कथेमुळे साहित्यातील श्लील-अश्लीलते बद्दल वाद झाला होता. ही कथा जिगलो म्हणजेच पुरुष वेश्या यांच्या शोषणावर आधारित होती. फार चांगली कथा वाचनात आली होती. यावर्षी चतुरंग पुरवणीत वीणा गवाणकर, मंगला आठलेकर, अरूणा ढेरे यांनी ज्या ज्या पुस्तकावर लेख लिहिले तेही फार आवडले. लोकरंग पुरवणीत अरुंधती देवस्थळे यांचं 'अभिजात' ह्या सदरामुळे चित्र, शिल्प संग्राहलयांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. विशेष उल्लेख करावा लागेल तो ग्रंथालीच्या यू ट्यूब चॅनलाचा. या चॅनलवर 'ग्लोबल साहित्यसफर' या कार्यक्रमात राजीव श्रीखंडे यांच्यामुळे कित्येक चांगले परदेशी लेखक तसेच त्यांच्या अभिजात साहित्यकृतीबद्दल ऐकायला मिळालं. कित्येक नव्या जुन्या मित्र मंडळींनी लिहिलेली पुस्तके भेट म्हणून मिळाली त्यातली जी आवडतील त्यावर वेळोवेळी लिहिनच.
वैयक्तिक माझ्यासाठी तरी वाचन ही आता फार मिरवण्यासाठीची गोष्ट राहिलेली नाही. फेसबुक वर काही काळ ही शायनिंग मारून झाली की पुढे सरकता यायला हवं. अरुण टिकेकर म्हणतात तसं वाचन हे हळूहळू कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्र असं करत करत तत्वज्ञानाकडे वळायला हवं. म्हणजेच गंभीर वाचनाकडे आपला मोर्चा वळायला हवा. मला वाटतं वाचनाने माणूस अंतर्मुख व्हायला हवा. आपल्यातली संवेदनशीलता वाढायला हवी. वाचनाने आपल्या मनावर आघात व्हायला हवे ज्यामुळे आपण एखाद्या विषयावर विचार करण्यास प्रवृत्त झालो पाहिजे. तर खाली यावर्षी वाचलेली पुस्तके तसेच पाहिलेले सिनेमे यांची यादी.
मराठी पुस्तके
१) एका रानवेड्याची शोधयात्रा - कृष्णमेघ कुंटे
२) व्हिन्सेंट व्हॅन गाॅ च्या आठवणी - जोहान्ना व्हॅन गाॅ , अनुवाद
- अनिल कुसुरकर
३) पृथ्वीचे आख्यान - अतुल देऊळगावकर
४) सिद्धार्थ - हरमन हेस, अनुवाद - उल्का राऊत
५) मातीगारी - गुगी वा थिओंगो, अनुवाद - नितीन साळुंखे
६) अवघा देहचि वृक्ष जाहला - वीणा गवाणकर
७) एका दिशेचा शोध - संदीप वासलेकर
८) हटके भटके- निरंजन घाटे
९) उद्या काय झालं- (विज्ञान कथा) संपादन - बाळ फोंडके
१०) अर्थाच्या शोधात - व्हिक्टर फ्रँकल, अनुवाद- विजया बापट
११) लढे आणि तिढे - मेधा कुलकर्णी
१२) जावे किंगफिशरच्या गावा - डाॅ.पराग नलावडे
१३) तिरकस आणि चौकस - दी.पू.चित्रे
१४) तेल नावाचं वर्तमान - गिरिश कुबेर
१५) रसेलचे निवडक लेख- भा.ज.कविमंडन
१६) हसऱ्या रेषा बोलक्या रेषा (व्यंगचित्रांवरील लेखसंग्रह)
१७) ग्रंथांचिया द्वारी - अतुल देऊळगावकर
१८) नाही लोकप्रिय तरीही - बर्ट्रांड रसेलच्या Unpopular
Essay या पुस्तकाचा अनुवाद - करुणा गोखले
१९) सुखन - तन्वी अमित
२०) निकोबारची नवलाई - राजेश्वरी किशोर
२१) महाश्वेता - सुधा मूर्ती, अनुवाद - उमा कुलकर्णी
२२) आईन्स्टाईनचे मनोविश्व -मो.रा.गुण्ये
२३) कहानी वर्तमानपत्रांची - चंचल सरकार, अनुवाद - दिनकर
गांगल
२४) सागर सफर तुष्णाची - टी.पी.एस.चौधरी
२५) नवं जग नवं साहित्य - विश्राम गुप्ते
२६) गाॅडीचा महासागर - ताजीमा शिंजी, अनुवाद- अमित
महाजन
२७) जाॅर्ज आॅर्वेल निवडक लेख आणि निबंध - मनोज
पाथरकर
२८) मनाच्या राज्यात - अंजली पेंडसे
२९) सखा नागझीरा - किरण पुरंदरे
३०) महर्षी ते गौरी - मंगला आठलेकर
३१) अशक्य भौतिकी - मिचिओ काकू, अनुवाद - लिना दामले
३२) मी मराठीत बांग देतो - नारायण कुलकर्णी कवठेकर
(कवितासंग्रह)
३३) रिपोर्टींगचे दिवस - अनिल अवचट
३४) भूरा - शरद बाविस्कर
३५) मंदिर कसे पहावे - गो.बा. देगलुरकर
३६) गणित आणि विज्ञान - युगानुयुगाची जुगलबंदी - जयंत.
नारळीकर
३७) शिकता शिकविता - निलेश निमकर
३८) मार्क आॅफ विष्णू - खुशवंत सिंग, अनुवाद- श्याम पाठक
३९) जिणं अमुचं - बेबी कांबळे
४०) विनाशवेळा - महेश एलकुंचवार
हिन्दी पुस्तके
१) पचपन खंबे लाल दिवारें - उषा प्रियंवदा
२) रुकोगी नहीं राधीका - उषा प्रियंवदा
३) कितने पाकिस्तान - कमलेश्वर
४) महाविद्यालय - विनोद कुमार शुक्ला
५) महाभोज - मन्नू भंडारी
६) तमस - भीष्म सहानी
७) मैकलुस्कीगंज - विकास कुमार झा
८) प्रतिनिधी कहानियाँ - चित्रा मुदगल
English Books
1) Tiger hunting stories - K.Pradeep Chandra
2) Backstage - Monteksingh Ahluwalia
3) Letters to young Novelist - Mario Vargas
Llosa
4) The Brief History of Equality - Thomas piketty
5) Finding me - Viola Davis
6) The Impact of science on society - Bertrand
Russell
7) Time is mother - Ocean Vuong (poetry)
8) How to be a writer - Ruskin Bond
9) Depression and other magic tricks - Sabrina
Benaim (poetry)
10) Small things like this - Claire Keegan
11) Three escape of Hannah Arendt - Ken
Krimstein
12) Watering the soul - Courtney Peppernell
13) Heart - Sandeep Jauhar
14) The Emperor of Indus - Alis Albania
15) The psychology of money - Morgan Hausen
16) Translating myself and others - Jhumpa lahiri
सध्या वाचत असलेली
1) The man who fed the world
2) The existential physics
याव्यतिरिक्त संजीव कुलकर्णी यांच्या लोकप्रभा साप्ताहिकातील विज्ञान कथा आवडल्या होत्या पण पुढे हे मासिकच बंद झालं.
आवडलेले लेख
१) 'इरॅझिस्ट्रेटस आणि मनोशारिरीक आजार' - जयदेव पंचवाघ
२) कविता खोटं बोलत नाही - राजन गवस
३) विज्ञानयुग आणि विज्ञान साहित्य - डाॅ. जयंत नारळीकरांचं
९४व्या अ.भा.म.सा.सं. भाषण
४) दुष्यंत कुमारांची 'साये में धूप' - लक्ष्मीकांत देशमुख
५) ओप्रा विन्फ्री - मीना कर्णिक
६) कष्ट करणारे लोक गेले कुठे - महारुद्र मंगनाळे
७) मास्तरकिचा सौदा - नागनाथ कोत्तापल्ले यांनी 'शोभा
पुंडलिक' या टोपणनावाने लिहिलेला लेख.
साधना, बालकुमार दिवाळी अंक, शब्दालय, युवा दिवाळी अंक, अक्षरदान, लोकसत्ता, ॲग्रोवन हे दिवाळी अंक वाचले.
Cinema/Documentaries
1) Healing from addiction through dreaming (D)
2) Tarini (D)
3) Nomadland
4) Band of Brothers (series)
4) Eddie the Eagle
5) Postman in mountain
6) John Adams (series)
7) Last king of Scotland
8) Alia - Short
9) Freedom writers
10) Ring of Bright water
11) The last Valley
12) Encanto
13) Dropout (series)
14) Spirit of Scotland (series)
15) The Immortals life of Henrietta lacks
16) Can you forgive me ever?
17) The last Tepui
18) Lunana - Yak in the classroom
19) King Richards
20) My Father's Violin
21) Spring Thunder
22) The last Duel
23) The eminent cartoonist of India (series)
24) भारतरत्न पा.वा. काणे (D)
25) Ballard of Buster Scruggs
26) Harriet (series)
27) The best of enemy
28) Disciples
29) The Guernsey literary and potato Peel pie
society
30) जन गण मन
31) The sea beast
32) Captain Fantastic
33) Minamata
34) Virat Parvam
35) Ranna Silence
36) Bekas
37) Eating our way to extinction (D)
38) Our universe (D - series)
39) How to Change your mind (D- series)
40) Fantastic Fungi (D)
अजिंक्य कुलकर्णी
Great…वर्ष कारणी लागलेलं आहे.
ReplyDeleteहो 😊
DeleteBabooo...…...
ReplyDeleteकाय बाबोव? 😄
Deleteबापरे ! दंडवत 🙏
ReplyDeleteबास का?
Delete👍
ReplyDeleteअत्यंत प्रेरणादायी वाचन प्रवास💐💐
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअजिंक्य फार फार कौतुक अन आश्चर्य वाटत अगदी नाव वाचताना थकायला होतं तिथं तुम्ही सर्व वाचलेल्या पुस्तकातील आशयाच्या देखील अचूक नोंदी घेता ,दंडवत !
ReplyDeleteखूप खूप आभार
Delete👍
ReplyDeleteअप्रतिम गुरुवर्य 😇🙏
ReplyDeleteThanks re
Deleteखूपच कौतुकास्पद!! Great 👍 Keep it up 👏👏
ReplyDeleteThanks
Deleteव्वा! यादी वाचूनच कळतंय, की वर्ष खूपच छान गेलं असणार!
ReplyDeleteThank you Neha
DeleteBapre sir 🙏
ReplyDeleteThanks
Deleteतुमची 2022 ची यादी वाचून निदान आता 2023 मध्ये तरी, आपण असं वाचलं पाहिजे याची प्रेरणा मिळाली...
ReplyDeleteThank you 😊
Deleteजबरी रे!!
ReplyDeleteकमाल रेंज आहे तुझी..
धन्यवाद गुर्जी
DeleteGreat
ReplyDeleteतुमच्यामुळे पुस्तकांची नावे तरी कळली.
बघू वाचण्याचा योग केव्हा येतोय.
धन्यवाद
Delete