डिजिटल किमानतावाद

डीप वर्क या दणदणीत खपाच्या पुस्तकानंतर लेखक कॅल न्यूपोर्ट यांचं ताजं पुस्तक म्हणजे 'डिजिटल मिनिमलिझम' हे होय. डिजिटल क्रांतीनंतर आणि समाज माध्यमांच्या विस्फोटानंतर मानवी एकाग्रतेची कधी नव्हे ती इतकी शकले उडाली आहेत. समाज माध्यमांचे व्यावसायिक प्रारूप हेच मुळात 'दिखावे की दुनिया' यावर आधारित आहे. अशा या काळात उपभोक्तावाद या वादाने जगातील सर्व वादांवर मात केली आहे. समाज माध्यमांवर सतत क्रियाशील असल्याने मी त्यावर नियमितपणे काही ना काही कृती (activity) केलीच पाहिजे हे एक मोठं अनामिक दडपण आपल्यावर पडत असतं. या क्रियाशीलतेचा सेलेब्रिटी वर्ग सोडल्यास इतरांना तसा आर्थिक फायदा काहीच नसतो. मात्र समाज माध्यमांवर वेळ घालवल्यामुळे त्यांचा मात्र चांगलाच आर्थिक फायदा होतो. आता प्रश्न आहे आपला की आपण त्यांच्या जाळ्यात किती अडकायचं? किती वाहत जायचं? फेसबुक मित्रयादीतलं कुणीतरी हाॅटेल मध्ये जेवायला गेल्याचे, फिरायला गेल्याचे, ट्रेकिंगला गेल्याचे फोटो टाकतं त्यामुळे आपणही अशा आनंदापासून वंचित रहायला नको म्हणून आपल्यालाही तसं करावं वाटतं. हा जो दबाव समाज माध्यमं आपल्यावर सतत टाकत आहेत य...