साहित्य संगीत सिनेमा - २०२०

२०२० या सालाने आनंद दिला असं जर कुणी म्हणालं तर, त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही! सक्तीच्या टाळेबंदीमुळे माझं मात्र कचकावून वाचन, सिनेमे, वेबसिरिज पहाने जेव्हढं या वर्षी झालं आहे ते पुन्हा होणे नाही! या वर्षाची सुरूवात दमदार झाली होती. वीणाताईंच्या घरी मुक्कामी असताना झडलेल्या वाद विवादांनी चांगलीच तरतरी आली होती. पण नंतर पुढच्याच महिन्यात टाळेबंदी सुरू झाली आणि आर्थिक बाबतीत माझं चांगलच कंबरडं मोडलं. शेती आहे म्हणून तगलो अन्यथा ... हा 'अन्यथा' फार अस्वस्थ करतो मला आजही. करोना झालेल्या कित्येक मित्रांचे नातेवाईक गेले, माझेही काही नातेवाईक गेले. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवर एकच कोणती आनंदाची गोष्ट घडली असेल तर ती आहे वाचन, सिनेमे आणि वेबसिरिज पाहणे हे होय! वाचनाच्या, पाहण्याच्या, लिखाणाच्या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. त्याच आनंदाचा हा धावता धांडोळा. टाळेबंदीत असेल किंवा ती शिथिल झाली त्यावेळी मला कित्येक लोकांनी, मित्रांनी पुस्तके पाठवली त्याबद्दल त्यांच्या ऋणातच मला रहायला आवडेल. यावर्षीचा शेवट तर फार गोड झालाय सातआठ महिन्यापासून अमेरिकेच्या इतिहासा...