'इति-आदि' - दैनंदिन वस्तूंच्या इतिहासाचा अथ: पासून इतिः पर्यंतचा धांडोळा.

केवळ सनावळ्यांप्रमाणे घडणाऱ्या घटनांचा तपशील देणे म्हणजेच सांस्कृतिक इतिहास लेखन असं नाहीये. सांस्कृतिक इतिहास हा काही केवळ लढाईच्या मैदानतच घडतो असंही नाही. तर तो प्रत्येक पिढ्यांच्या स्वयंपाक घरातही घडून गेलेला असतो. पण अशा इतिहासाची फारशी नोंद न घेणं, त्याचं दस्तऐवजीकरण न करणे हा आपल्या लोकांना लागलेला पूर्वीपासूनचा शापच आहे जणू. सांस्कृतिक इतिहास लेखन हे किती वेगवेगळ्या अंगाने होऊ शकतं याचा जणू एक नवा मार्गच अरूण टिकेकर आपल्याला दाखवून देत आहेत. दैनंदिन खान्या-पिण्याच्या वस्तू या आपण कधीपासून वापरू लागलो आहोत? त्या वस्तू, खाद्यपदार्थ जर विदेशी असतील तर त्यांना सर्वप्रथम आपल्याकडे कोण घेऊन आलं? कोणत्या मार्गाने त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या, याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा ही एक मोठा बौद्धिक आनंद देणारा भाग असतो. काही खाद्यपदार्थ हे उच्चभ्रू 'अभिजन' लोकांचेच होते. ते 'जनां'चे कसे झाले? उदा. आईस्क्रीम. तर काही खाद्यपदार्थ हे 'जनां'चे होते ते नंतर 'अभिजनां'त कसे रुळले? उदा. सिताफळ. भारतीय गंधविद्या ही देखील किती विकसित होती हे ही या पुस्तका...