'ऋषति-गच्छति संसारपारं इति ऋषि:' मानवमात्राचे इह तसेच पारलौकीक कल्याण बघण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे ते ऋषी. लोकांना एक विशिष्ट जीवनदृष्टी देणारा एक उन्नत जीव म्हणजे ऋषी. भारतीय संस्कृतीरूपी वृक्ष ज्या खतावर वाढला, पोसला, विस्तारला ती संस्था म्हणजे ऋषीमंडळ. हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनाची मशागत या ऋषीमंडळाने केली आहे आणि आजही विविध 'स्मृतींच्या' मार्फत हे मार्गदर्शन चालूच आहे. ऋषी हेही आपल्यासारखेच हाडामासाचे मनुष्य होते पण, आपल्या ज्ञानसाधनेतून, कर्मयोगातून उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. या विकासाची अवस्था इतकी उच्च की स्वतः सृष्टीकर्त्यालाही यांच्या चरणाजवळ बसून ज्ञानार्जन करण्याचा मोह वेळोवेळी व्हावा. या ऋषीपरंपरेतलं एक श्रेष्ठ कुळ म्हणजे 'भार्गव'. भृगु ऋषींपासून याची सुरूवात म्हणून याला भार्गव म्हटले जाते. या भृगुंचे पुत्र ऋचिक. ऋचिकांचे पुत्र जमदग्नी. जमदग्नींचे पुत्र परशुराम. या चार महान तपस्वींच्या जीवनकार्यावर राजीव पुरूषोत्तम पटेल लिखित आणि विहंग प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेली कादंबरी म्हणजे "वैदिक".
वैदिक वाड्मयाचा अभ्यास हा जसा केवळ तर्ककठोर बुद्धीने करता येत नाही तसाच केवळ भावनेच्या भरातही करायचा नसतो. श्रीमद्भगवतगीतेत म्हटल्या प्रमाणे 'बुधा भाव समन्वीता' म्हणजेच बुद्धी आणि भाव(प्रेम,आत्मियता) याच्या समन्वयाने करावा लागतो. भारताची माती ही या महान ऋषींची कर्मभूमी आहे. आठ-दहा हजार वर्षापूर्वीच्या कालखंडाचा विचार जर आपण केलात तर, लक्षात येईल की उत्तर भारतात विंध्य पर्वत आहे. विंध्य पर्वत भारताचे त्यावेळी दोन भाग करायचा. पर्वताच्या वरचा उत्तर भागात जो सुशिक्षित,सुसंस्कृत मानव समुदाय होता ज्याला आर्यावर्त म्हटले जात असे. आर्य आणि वैदिक या मधील एक सुक्ष्म फरक समजून घ्यायला हवा. आर्य हा एक वंशवाचक शब्द आहे. ब्राम्हण आर्य त्याकाळी आश्रमव्यवस्था उभी करण्यात व्यग्र होते. त्यांनी उभं केलेलं कार्य क्षत्रीय आर्यांना आपल्या अहंकाराच्या तृप्तीसाठी वापरायचं होतं. यातूनच या दोन वर्णात संघर्ष होत असे. 'संस्कृती' ही गोष्ट समजून घेण्यात बऱ्याचदा आपली गल्लत होते. म्हणजे,"मनुष्य आपल्या स्वतःसाठी सृष्टीचा वापर करतो, त्या कृतीला तो संस्कृती म्हणून मोकळा होतो". त्याकाळात समाजव्यवस्थेचा मुख्य पाया म्हणजे 'आश्रम व्यवस्था' ही होय. जी व्यक्ती या आश्रम व्यवस्थेत अडकून राहत नाही त्यांना 'वैदिक' म्हणत. जो मनुष्य पशु पक्ष्यासाठी, वृक्ष-जलाशयांसाठी काम करून अनंत जीवसृष्टीच पोषण करू लागेल म्हणजेच जो निस्वार्थ होऊन इतरांसाठी झिजेल अशी कृती करणारे किंवा समजूत असणारे 'वैदिक'!
भृगु, ऋचिक, जमदग्नी, परशुराम हे वैदिक होत. संस्कृती विस्तारण्याच्या कार्यार्थ भृगु कुलोत्पन्न जमदग्नी हे आपल्या क्षत्रीय पत्नीला म्हणजेच 'रेणुकेला' (रेणुका म्हणजेच माहूरची रेणुका देवी) सोबत घेऊन विंध्य पर्वत ओलांडून दंडकारण्यात (नर्मदा नदी व नर्मदेच्या खालील दक्षिण भारत) आले. बुद्धी आणि शक्ती असामान्य असताना सामान्यातील सामान्य भौतिक जीवन त्यांनी स्वीकारले. या जंबूद्वीपात, दंडकारण्यात, नर्मदेच्या किनाऱ्यावर त्यांनी आपला 'नर्मदेश्वर' नावाचा एक आश्रम स्थापन केला. हा परिसर पूर्णपणे आसुर, राक्षसांचा होता. या दोन्ही जमाती असंस्कृत, नरभक्षक होत्या. आता प्रश्न असा आहे आसुर म्हणजे कोण? तर, "असुषु रमन्ते ते असुरा:" जे स्वतःच्या स्वार्थातच, भोगातच रममाण असतात ते असुर. ही माणसेच होती फक्त स्वार्थाने, लालसेणे बरबटलेली, असंस्कृत अशी. मिळेल ते फक्त लुबाडून खाण्यात रस असलेली. मग या लोकांमध्ये संस्कृतीचे काम करायचं, त्यांच्यापर्यंत संस्कृती पोहचवण्याचे काम गतिमान करायचे तर साधनं, धन, पशूवैभव लागणार! मग ब्राम्हणांनी वेदविचारांचं काम करायचं की, या साधनांच्या मागे धावत रहायचं? अर्थात, वेदविचारांचे काम करायचे तर या आसुरी लोकांपासून रक्षण कोण करणार? शेती, संपत्ती, धान्य, पशुवैभव याचे रक्षण कोण करणार? म्हणून मग रक्षणासाठी क्षत्रीय हा एक वर्ण तयार झाला. मग प्रश्न असा आहे की क्षत्रीय राजा ब्राम्हणाच्या कार्यास आपले धन का देईल? म्हणून मग क्षत्रीयांच्या मुलींशी लग्न करायचे जेणेकरून मुलगी व जावयासाठी का होईना राजा संस्कृतीच्या कार्यास धन देईल. ती गतिमान होईल. या विवाहांमागे असा व्यवहारी दृष्टिकोनही असू शकतो.

जंबूद्विपात नर्मदाकाठी संस्कृती विस्तारायची होती. तर प्रत्येक जण हा सर्व विषयात काही ज्ञानी असणार नाही. मग कृषीतज्ज्ञ, घरे बांधणारी, नदी नाल्यावर पूलबांधणारे, चामडी कमावणारे, या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आर्यावर्तातून आणले गेले. रेणुका ही एक तेजस्वी क्षत्राणी होती. जमदग्नी आणि रेणुकेने अरण्यात यज्ञ करवले. यज्ञ हे एक लोकांना एकत्र करण्याचे केवळ निमित्त होते. मानव हा मुळात उत्सव प्राणी आहे. आणि यज्ञ हा एकट्याने केला जात नाही किंवा करायचा नसतो. यातून त्या लोकांत समूह भावना उभी राहिली. माझ्याबरोबर दुसऱ्यांचाही विचार करायचा असतो ही भावना त्यांच्यात उभी राहिली. एकट्याने केले जातो त्याला 'होम', 'हवन' म्हणतात.
विचार करून थक्क व्हायला होतं की, या लोकांनी कसं असुरी लोकांना मांसाहारापासून वनस्पत्याहारापर्यंत आणलं असेल? बरं, त्यांचा मांसाहार जर तोडायचा तर त्यांचे शरीर क्षीण होईल म्हणून त्या ऐवजी गाईचे तूप अधिक उडीद डाळ यांचे मिश्रण हा आहार द्यायचा. आज आपल्याला हे सर्व माहीत आहे म्हणून ठीक आहे, पण त्यांना हे संशोधन कसं सुचलं असे? म्हटलं तर किती मोठे संशोधन होतं हे! सहकार, सहवास, समर्पण, समन्वय, सामीप्य म्हणजे संस्कृती होय. संस्कृती हा एक गती वाचक प्रवाही शब्द आहे. मग या लोकांना यज्ञाच्या निमित्ताने फक्त जर खाऊपिऊ घातले तर त्यांच्यात लाचारी निर्माण होईल. त्यांच्यात 'किंकर्तव्यमुढता' वाढेल. त्यांची भाकरी त्यांनी स्वतःची स्वतःच कमवली पाहिजे. नुसती कमावून नाही चालणार तर ती वाटूनही खाल्ली पाहिजे. म्हणून वैदिकांनी स्थानिकांच्या जोडीने कृषी संस्कृतीचा विकास केला. मारून खाण्याऐवजी पेरून खा. मानवाची शेती मुळे अन्नाची भटकंती बंद होऊन तो जीवनात स्थिर होईल. कीती उन्नत होती ही लोकं! शेती करताना, झाडे तोडताना किती जीवांचे प्राण गेले असतील. त्या जीवांच्या जाण्यामुळे मला अन्न मिळाले म्हणून त्याबद्दलची कृतज्ञता जीवनात उतरवण्यासाठी काय काय सोसलं असेल या वैदिकांनी! कीती संयम ठेवावा लागला असेल स्वतःवर!
विचार करा 'बहूपत्नी' असणे किंवा स्रियां या फक्त उपभोग्य वस्तूच आहे अशीच समजूत असणाऱ्या लोकांमध्ये 'एकपत्नीत्व' कसं उभं केलं असेल? किती कष्ट सोसले असतील? हे काम काही एका पिढीत झालेलं नाही. पिढ्यान््पिढ्या खर्च झाल्या असतील. मानवास विचारांनी बदलणे हे काही एका रात्रीचे काम नाही. अशा या भृगू, ऋचिक, जमदग्नी, परशुराम या भार्गवांच्या कार्याचा सुंदर आढावा या कादंबरीत अतिशय प्रवाही भाषेत मांडला आहे. पौराणिक कादंबरी असल्याने काही प्रसंग हे थोडे चमत्कारिक वाटतात पण ती गोष्ट जर सोडली तर कादंबरी मनाची चांगली पकड घेते. ज्यांना दोन ओळींमधील अर्थ (बिटवीन द लाईन) काढता येतो त्याला एक ही कादंबरी म्हणजे एक 'फिस्ट' आहे.
पुस्तक - वैदिक
लेखक - राजीव पुरूषोत्तम पटेल
प्रकाशक- विहंग
अजिंक्य कुलकर्णी
अप्रतिम आणि योग्य शब्दांत
ReplyDeleteThanks Bhai
DeleteThanks Bhai
DeleteThanks Bhai
Deleteखुपच मस्त
ReplyDeleteThanks
Deleteमस्त आढावा घेतलाय अजिंक्य तू कादंबरीचा, उत्सुकता वाढली वाचण्याची.
ReplyDeleteThanks
Deleteछान लिहलय दादा. लवकरच वाचेन कादंबरी. 😊
ReplyDeleteThanks
Deleteमनापासून वाचन केल्याशिवाय इतका सुंदर review लिहिताच येत नाही. कादंबरी तुमच्यापर्यंत किती चांगली पोहोचली आहे, ते या लिखाणातून समजतंय. खूप मुद्देसूद लिहिलं आहे.
ReplyDeleteThanks Neha
Deleteसुंदर ..अती सुंदर..
ReplyDeleteThanks
DeleteKhup khup abhinandan..!!! Khup chaan lihilas ha blog..
ReplyDeleteAshram Vyavastha, Sanskriti, Hom..Havan.. ya magachi khari bhavana...Niswarthipana ani ya saglya gostincha rakshan karnare"Vaidik" ha vishay..khup chaan samajla tuzya blog madhun.. aplya aaushyatla yancha sthan kiti motha aahe he hi samajla.. Vishayachi mandani khup chaan keliyes.. Thanks for sharing this blog.!!!
Thanks Pritam
Delete