भारतीय संस्थानांच्या इतिहासाचा धांडोळा

पेशवाई ची सुरुवात हा जर मध्य मानला तर पेशवाईच्या अगोदर आणि पेशवाईच्या नंतरच्या इतिहासात भारतामध्ये लहान-मोठी जवळपास 565 संस्थाने होती. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली ही संस्थाने मग दुर्लक्षिली का गेली? याचे कारण या संस्थानिकांचे संस्थानिक हे जन्मानेच संस्थानिक होते आपल्या कर्माने नव्हे. या 565 संस्थानांपैकी महत्वाच्या ३९ संस्थानांचा आढावा घेतला आहे सुनीत पोतनीस यांनी आपल्या 'बखर संस्थानांची' या राजहंस प्रकाशन प्रकाशीत पुस्तकामध्ये. ब्रिटिशांच्या काळात दोन प्रकारचे शासकीय प्रदेश होते. एक प्रदेश जो ब्रिटिशांनी स्वतः जिंकलेला आहे किंवा ब्रिटिशांच्या राज्यामध्ये विलीन झालेला आहे. दुसरा प्रदेश जो असेल भारतीयांचा पण अंकित असेल मात्र ब्रिटिशांना, त्याला आपण 'रियासत' किंवा 'संस्थान' असे म्हणतो. या संस्थानांचा इतिहास हा रंजकतेने भरलेला आहे. काही संस्थानांनी केलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक प्रगतीचा आहे तर काही संस्थानिक जे विलासी वृत्तीचे होते. विलासी वृत्ती इतकी की इतके की 801 कुत्रे पाळणारे आणि पाळीव कुत्रीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करणारे तसेच पेपरवे...