एक अप्रतिम शालेय विज्ञान पुस्तक.

मार्च-२०१९ माझ्या मोठ्या बंधूंचे सासरे श्री अनंत शास्त्री लावर हे त्यांच्या एका मठाच्या पौरोहित्याच्या कामासाठी मेलबर्न ला गेले होते. त्यांना आम्ही सगळे अण्णाच्या म्हणतो. अण्णा तिकडून निघण्याच्या काही दिवस आधी मी त्यांना म्हणालो की येताना माझ्यासाठी मेलबर्न मधले इयत्ता नववी व दहावीचे विज्ञान व गणितची क्रमिक पुस्तके घेऊन याल का? त्यांनी स्वतःचे काही सामान सोडून माझी ही तीन चार पुस्तके आणली ज्याचे वजन जवळजवळ ४-५ किलो तर सहज असेल. एकूण किंमतही साधारण ४५ आॅस्ट्रेलिअन डाॅलर इतकी झाली होती. ही पुस्तके माझ्यासाठी घेऊन आल्याबद्दल अण्णांचे आभार मानतो. तर सांगायचा मुद्दा हा की गेल्या दोन एक महिन्यापासून मी वेगवेगळ्या देशातील इयत्ता दहावीच्या गणित, विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहेत. वेगवेगळ्या देशात या वयोगटातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान हे विषय कसे शिकवले जातात? मला या गोष्टीचे खूप कुतूहल आहे. हे मेलबर्नचे इयत्ता दहावीचे विज्ञानाचे पुस्तक वाचताना मी विशेष आनंद झाला. आनंद यासाठी की या किशोरवयात असाही डिझाईन केलेला अभ्यासक्रम शिकवता येऊ शकतो. पहिल्या प्रकरण...