मातीगारी

आफ्रिकी साहित्य विश्वातील एक मोठं प्रस्थ म्हणजे गुगी वा थियांगो. थियांगो हे मूळचे केनिया या देशातील. थियांगो यांचे आपली मातृभाषा गिकुयू आणि इंग्रजीवरही प्रचंड प्रभुत्व आहे. सुरुवातीच्या चार कादंबऱ्या त्यांनी इंग्रजीत लिहिल्या. 'नागहिका दिंदा' हे नाटक लिहिल्यामुळे थियांगो यांना कैदेत ठेवले गेले होते. कैदेत असताना त्यांनी निर्णय घेतला की आपण कादंबरी ही आपल्या मातृभाषा गिकुयूतच लिहायला हवी. कैदेत लिहिण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करुन देत नसल्यामुळे त्यांनी आपली कादंबरी ही अक्षरशः टाॅयलेट पेपरवर लिहिली. पुढे त्यांनी आपल्या साहित्यिक अभिव्यक्ती साठी गिकुयूच कायम ठेवली. थियांगो यांची 'मातीगारी' ही कादंबरी सर्वप्रथम गिकुयू भाषेत १९८६ साली प्रकाशित झाली. माराठीत त्याचा नुकताच अनुवाद प्रसिद्ध केला आहे मैत्री प्रकाशनाने. तर अनुवाद केला आहे नितिन साळुंखे यांनी. या कादंबरीच्या कथानकाला केनियातील तत्कालीन राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी आहे. केनियात सत्तर ऐंशीच्या दशकात प्रचंड राजकीय अनागोंदी होती. नावाला लोकशाही पण प्रत्यक्षात हुकूमशाहीच तिथे राज्य करत होती. अशा राजकीय...