सनातन्यांविरुद्ध बंड करणाऱ्या एका मुलीची गोष्ट

न्यूयॉर्क हे प्रचंड गजबजलेलं, आधुनिक, फॅशन चा झगमगाट असलेलं एक शहर. न्यूयाॅर्क मधील ब्रुकलीन या भागात तसेच युरोपमधल्या काही मोठ्या शहरात 'हासीदी' म्हणून एक कट्टर, कर्मठ, सनातनी ज्यू समुदाय आहे. हासीदी ही ज्यूंची एक उपशाखा आहे. या समुदायाच्या लोकांची दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हाॅलोकाॅस्ट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात कत्तल केली गेली. म्हणून हे लोक जर्मनीतून न्यूयॉर्क मध्ये स्थलांतरित झाले. तिथे स्वतःच्या समुदायाची वेगळी ओळख रहावी म्हणून या लोकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेला, केशभूषेला अतोनात महत्त्व दिलेलं दिसतं. आजही देतात. पुरूष एक भलामोठा काळा झगा व डोक्यावर मोठ्या आकाराचं पागोटं परिधान करतात. मुली व स्त्रीयांनी घराबाहेर पडताना केसांभवती स्कार्फ गुंडाळलेलाच हवा ही सक्ती असते. पुरुष कानाभोवती कल्यांच्या जवळ आपले केस वेणीसारखे मोठे वाढवतात व ते चेहऱ्यावर रुळू देतात. या समुदायातल्या लोकांना इतराशी बोलायला मनाई असते. त्यांनी आपला समुदाय सोडून इतरांनी बोलणे टाळावे कारण यांना भिती असते की आपल्यातला कुणी बिघडला तर, वाटला तर...? यांच्या मुलांना घरा...