स्मार्ट फोनचं स्मार्ट जाळं

पत्र आणि लॅन्डलाईनच्या काळात एखाद्याशी संपर्क साधणे हे खूप वेळखाऊ प्रकरण होते. अविश्वसनीय होतं. कारण पत्र ज्याला पाठवलं आहे त्याच्याच हातात ते पडेल ना? ज्याच्यासाठी लॅन्डलाईनवर फोन केला आहे तोच फोन उचलेल की नाही याची खात्री नव्हती. थोडक्यात पत्र आणि लॅन्डलाईन मध्ये आपला खाजगीपणा (प्राईव्हसी) जपला जाईलच असं नाही. मोबाईल मुळे खाजगीपणा जपणे ही गोष्ट जास्त शक्य झाली त्यामुळेच त्याला प्रचंड लोकाश्रय मिळाला. त्याच बरोबर सहज संपर्क करता येणं, त्यात असलेल्या सुविधांचाही त्याला मिळणाऱ्या लोकाश्रयात मोठा वाटा आहेच. पण या स्मार्ट फोनने आज आपल्याला विळखा घातला आहे असं नाही का वाटत? व्हाट्सप आणि मेसेंजरच्या युगात तर ते अगदी स्वस्त आणि झटपट झाले आहे. स्मार्टफोनच्या या सहज उपलब्ध सोईंमुळे सोशल मिडियावर आपण लिहिलेल्या मजकुरावर आपण परत परत जातो. शक्य असेल तर उत्तर देतो. वेळोवेळी सोशल मिडिया स्टेटस अपडेट करत बसतो. त्यावर आलेले लाईक्स, लव्ह, शेअर्स वगैरे गोष्टी मोजत बसतो. पण यासगळ्या गोष्टीत अडकून पडणे गरजेचे आहे का? आपल्याला यावरचं बंधन नको वाटणे हे आपण निवडू शकतो. आपण या सर्व गोष्टींना थोडी वाट पहायला नाही लावू शकत का ? त्यांच्यासाठी आपण आहोत की आपल्यासाठी ते आहेत? यावर विचार करायला हवा. आपण आपला सोशल मिडिया शिळा होण्याचा धोका पत्करल्याने आपलं काहीही (हो! का ही ही) अडत नाही. आणि जर आपले मित्र हे खरेच आपले मित्र असतील तर त्यांना ही गोष्ट नक्कीच मान्य असेल की आपल्याला वेळ देण्याची गरज आहे. आणि समजा जर ते आपले मित्र नसतील तर या सो कोल्ड मित्रांच्या साठी सोशल मिडियावर परत येण्याचा अट्टाहास का  का उगाचच त्रागा करुन घ्यायचा, समजा नाही आलो आपण सोशल मिडियावर वेळोवेळी तर हे लोक आपल्याला विसरून जातील याचा? गेले तर गेले! काय अडलय त्याच्या वाचून?

  या  स्मार्ट जाळ्यामध्ये अडकायचं नसेल किंवा अडकलो असेल तर त्यातून बाहेर कसं पडायचं, हा प्रश्न पडत असेल तर आपण खालील काही उपाय करू शकतो. सर्वप्रथम विविध सोशल मीडियाच्या ॲप्सचे नोटिफिकेशन बंद करावे लागेल. ज्यांचा व्यवसायच सोशल मीडियाच्या माध्यमातून चालत असेल तर त्यांनी जरा सवलत घेतली तरी चालेल. कोणत्याही सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनची आपल्याला तशी काही एक आवश्यकता नसते. दिवसाची अशी कोणती वेळ आहे ज्यावेळी तुमच्या हातात फोन नसतो? हातात फोन नसला तर कासावीस व्हायला होतं का, हा प्रश्न स्वतःला विचारा. जर होत असेल तर फोनचं व्यसन लागत आहे असं समजायला हरकत नाही. फोन शिवायही मला राहता येतं अशी वेळ वाढवत न्यावी. झोपताना फोन उशाजवळ ठेवून नका. बहुतेक लोक फोन उशाशी ठेवून झोपतात. त्याचं समर्थन करताना ते म्हणतात की सकाळी उठण्यासाठी फोन मध्ये आलार्म लावलेला असतो. मुळात अलार्म लावून उठावं लागत असेल तर याचाच अर्थ तुमची झोप पूर्ण होत नाहीये. झोपताना फोन आपल्यापासून बाजूला ठेवा. त्यांने खूप फरक पडतो.

   फोन शेजारी असेल तर सकाळी झोपेतून उठल्या उठल्या आपण फोन चेक करतो. कुणाचा व्हाट्सअप मेसेज आला आहे का ? फेसबुकवर कुणी कुणी काय काय लिहिलय हे पहायला जाण्याची उत्सुकता असणं ? हे पाहण्यात सकाळचा अर्धा ते पाऊण तास कसा निघून याचा पत्ताही लागत नाही आपल्याला. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पाच मिनिटांनी फोनची स्क्रीन चेक करत जाऊ नका. स्वतःला असं समजवा की," दर पाच दहा मिनिटांनी असं विशेष काहीही घडणार नाहीये माझ्या आयुष्यात!" यामुळे मनावरचा ताण कमी होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनच्या बॅटरीची लेवल. मोबाईल फोनची बॅटरी लेवल दहा टक्क्यांच्या खाली आली म्हणजे आपल्यावर काही फार मोठं आभाळ कोसळणार नाहीये! का आपल्याला आपला फोन प्रत्येक वेळी शंभर टक्केच चार्ज हवा असतो ? फोनची चार्जिंग कमी होत असेल आणि आपण घराबाहेर असू तर आपण कासावीस होतो. अरे आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीच्या फोन वरून फोन करू शकतो की घरी! चार्जिंगचं इतकं दडपण घ्यायची गरजच काय? घरी असताना फोन बेडवर फेकत जाऊ नका.  फोनला रेंज नसेल तर फोनवर चिडू नका. हे कायम लक्षात ठेवा कि,"फोन ही निर्जीव वस्तू आहे"  वरील सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावर नकळत परिणाम होत असतो. आणि आपल्याला ताणा खाली नाही तर आनंदाने जगायचं आहे, हे मनाला सांगत जा. चांगली पुस्तके वाचा. चांगले सिनेमे पहा. नेटफ्लिक्स, प्राईम, हाॅटस्टार वर जर एखादा सिनेमा पहात असाल तर सिनेमाच पहा. सिनेमा पहात असताना व्हाटसप, फेसबुकचं नोटिफिकेशन पहात बसू नका. यामुळे त्या सिनेमाचा धड आनंदही घेता येत नाही.

Comments

  1. मी वर्षातून 2,3 महिने फेसबुक इंस्टा पूर्णपणे बंद करत असतो.
    भारी वाटत त्याने.

    ReplyDelete
  2. Dear Comrade अगदी खरं आहे. तुमचं नाव समजू शकेल का? म्हणजे आपण ओळखत असूच एकमेकांना पण इथे तुमचं नाव नाही येत आहे. तर Dear comrade असं येतंय म्हणून विचारतो आहे

    ReplyDelete
  3. Blog chaan hota.. !! Agree with you. Aaj saglyanchya life subject aahe .. Mobile.. health disturb hote..jast use kelyane... Garje purta use karayala hava...ani life chya baki gosti madhun aanand ghayal hava.
    ---Pritam Kulkarni

    ReplyDelete
  4. Digital detox is need of the hour. While connecting with others, we have forgotten that connection with your self matters more than anything else!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा