Posts

Showing posts from 2021

साहित्य - सिनेमा २०२१

Image
 साहित्य - सिनेमा २०२१ वाचन, लिखानाच्या दृष्टिकोनातून हे सरतं वर्ष कमालीचं सुखद गेलंय. लोकसत्तामध्ये 'बुकमार्क' सदराची या वर्षाची सुरूवातच माझ्या नेटफ्लिक्स वरील पुस्तकाच्या परीक्षणाने झाली. तो आनंद अजून द्विगुणीत झाला जेव्हा हातात पेपर घेतला आणि लक्षात आलं की शेजारी नंदा खरेंचा लेख आहे म्हणून. नोव्हेंबर मध्ये अतुल देऊळगावकर सरांच्या लेखा शेजारी दाणी शापीरो च्या पुस्तकावरील माझा लेख आला होता. याचा अर्थ असा नाही की मी या दोघांशी माझी बरोबरी करत आहे. पण माझ्यासारख्या लिहिण्याच्या क्षेत्रात नवख्या असलेल्याला हे सुख खूप आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने क्लासेस, काॅलेज पुन्हा बंद झाले आणि गेल्या वर्षाप्रमाणे हे वर्षही आर्थिक कंबरडे मोडते की काय असं वाटायला लागलं. पण जुलै नंतर परिस्थितीमध्ये खूप फरक पडला. पाऊस चांगला झाल्याने शेतीने आर्थिक बाजू चांगलीच लावून धरली. आॅगस्ट महिन्यात जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा जेष्ठ लेखिका प्रतिभा रानडेंची त्यांच्याच निवासस्थानी झालेली भेट ही फार ऊर्जा देणारी ठरली. त्याच पुणे ट्रिपमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने त्यांच्या ...

जैविक ओळख शोधताना…

Image
  दानी शापिरो या अमेरिकेतील एक सुप्रसिद्ध चरित्र/ संस्मरण लेखिका. पती मायकल आणि मुलगा जेकब यांसोबत सुखाने आयुष्य कंठत होत्या. आयुष्यात कोणत्याच बाबतीत काहीही कमतरता नव्हती. पैसा होता, यशस्वी लेखिका म्हणून जगभर नाव झालेलं होतं. पण या सर्व सुखात आयुष्याची मध्यान्ह उलटून गेल्यावर अचानक अशी घटना घडली की तिचे व्रण दानींच्या मन, बुद्धी आणि शरीरावर कायमचेच कोरले गेले आहेत. दानींना निवृत्तीचे वेध लागलेले, चारएक वर्षांत मुलगा लग्न करून स्वतंत्र होईल. पण वयाच्या या टप्प्यावर अचानक दानींचे पती मायकल हे दानींच्या पुढ्यात एक वैद्यकीय अहवाल ठेवतात. तो वैद्यकीय अहवाल वाचून दानींच्या पायाखालची जमीन सरकते. या अहवालाचा अर्थ काय?  दानी स्वत:शीच विचार करू लागतात, ‘म्हणजे सुझी ही माझी कोणतीच बहीण नाही?… सावत्र बहीणसुद्धा नाही?’ दानींच्या पतीने- मायकलने सहज मौज म्हणून केलेली जनुकीय चाचणी (डीएनए टेस्ट); तिचा तो अहवाल ‘हे तुमचे जैविक वडील नाहीत!’ असे दानींच्या दिवंगत वडिलांबद्दल सांगत होता. अमेरिकेत आजकाल डीएनए टेस्ट किट हे वाढदिवसानिमित्त भेट म्हणून देण्याच्या प्रथेने चांगलाच जोर धरला आहे. म्हणजे, ५...

लिखाणाचं मुलद्रव्य सांगणारा संवाद...

Image
  भारतात 1980 नंतर समाजात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक स्थित्यंतरे दिसू लागली. या काळात धनशक्तीने विवेकापासून फारकत घ्यायला सुरुवात केली. समाजाला मूल्यांची चाडही वाटेनाशी झाली. केवळ वित्ताचे आकर्षण वाटू लागले. यातून मग मोठ्या प्रमाणात व्यक्तिवाद बोकाळायला सुरुवात झाली. पण या सगळ्यांचं योग्य असं अर्थघटन करून ते इतरांना समजावून सांगणार कोण? उत्तम साहित्याची जबाबदारी जी सुरू होते ती इथूनच! साहित्य म्हणताच त्यात नाटक, कथा, कादंबरी निबंध हे सर्वच रस येतात. या सर्व माध्यमांतून समाज म्हणून आपण नक्की कुठून कुठे चाललो आहोत किंवा कुठून कुठे पोहोचलो आहोत? हा आरसा आपल्याला सकस साहित्य दाखवत असतं. आपल्या आजूबाजूला बदलणाऱ्या गोष्टींना टिपणारं कसदार असं साहित्य हे वाचकांना विचार करायला प्रवृत्त करत असतं. या साहित्याच्या वाचनातून वाचकाची संवेदनशीलता वाढत असते. प्रश्नांना कोणत्या पद्धतीने भिडायचं याचं दिग्दर्शन आपल्याला या साहित्यातून होत असतं. हे अंगी बाणवण्यासाठी काय करावं लागतं, हा बदल समजून घ्यायला आपण कमी पडत असू तर काय करावं? याचं उत्तर आहे त्यातलं ज्यांना कळतं, ज्यांना यातला दांडगा...

तुका झालासी कळस!

Image
तुकोबांच्या वैकुंठगमनाला साडेतीनशे वर्ष झाल्या निमित्ताने दिलिप पुरूषोत्तम चित्रे यांनी लिहिलेलं आणि शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित छोटेखानी पुस्तक म्हणजे 'तुकोबाचे वैकुंठगमन' हे होय.  एकाच वेळी संतत्व आणि कवित्व यांचा सुरेख संगम आपल्याला महाराष्ट्रातील कित्येक संत चरित्रात पहायला मिळतो. माऊली ज्ञानेश्वरांपासून ही परंपरा सुरू होऊन तुकोबारायांनी त्यावर कळस चढवला. सर्वसामान्य माणसाचे जीवन हे स्वार्थाच्या कसोटीवर चालणारे असते. संतांना वैयक्तिक स्वार्थ नसतो. माणसे स्वार्थी असतात हे संतांना ठाऊक असते. माणसे लुच्ची, लफंगी, इच्छा, वासना, विकार, महत्वाकांक्षा, अहंकार यत गुरफटलेली असतात याची संतांना जाणीव असते. तरी माणसांच्या सर्व चुका, त्यांचे सर्व अपराध, त्यांची सर्व वैगुण्ये सहन करण्याची शक्ती संतांमध्ये असते. आईवडीलांपेक्षाही संतांची माणसांवरची माया जास्त वत्सल असते असे तुकोबांनी सांगितलेले आहे.आपल्या सभोवारच्या माणसांच्या जीवनव्यवहाराची कठोर चिकित्सा तुकोबांनी आपल्या काव्यात केली आहे. १९ व्या शतकातील आपल्या मराठी समिक्षकांना एक वेडाने पछाडलेले आहे ते म्हणजे 'सामाजिक जाणीव'....

ए भाऊ! 'शिक्षक' नको होऊ...

Image
  सकाळी सकाळीच रविच्या व्हाट्सप वर विनयचा एक मेसेज आला 'शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!' म्हणून. तो मेसेज वाचून रविच्या समोर मागील सहा सात वर्षाचा काळ असा झरझर सरकत गेला. तेव्हढ्यात रविला विनयचा फोनच आला. हाय हॅलो झाल्यावर काय चाललंय सध्या वगैरे विनय ने विचारपूस केली. गेली दोन तीन वर्ष या दोघा मित्रांचा एकमेकांशी तसा संपर्कच राहीला नव्हता. विनय एका आयटी कंपनीच्या प्रोजेक्ट साठी बंगलोरला गेला होता. तेव्हढ्यात रविला आलेला हुंदका त्याला आवरता येईना.  विनय:- रव्या अरे काय झालंय?  रवि:- काही नाही रे असंच जरा भरून आलं होतं.  विनय:- हो, पण कशामुळे? नेमकं काय झालंय ते सांगशील तर खरं. मला कसं कळणार? रवि :- विन्या! अरे माझं ग्रँटेबल ला काम झालंय. (हे सांगताना  रविच्या डोळ्यात पाणी आलं) "विन्या! अरे शिक्षकांच्या ग्रँटेबल- नाॅन ग्रँटेबल नावाची काही पदं असतात हे माहीत तरी आहे का तुला? गेल्या चार वर्षात आपला मित्र काय करतोय, काय भोगतोय याची काडीचीही कल्पना आहे का तुला ?" गहिवरून आल्याचा आवाजात रवि बोलत होता.   दोघेही लहानपणापासून मित्र एका शाळेत शिकले. पुढे अकरावी...

समाजवादाचा एक निरलस सात्विक चेहरा.

Image
स्थळ पुणे,साने गुरुजी नुकत्याच मॅट्रिकला आलेल्या काही मुलांना घेऊन फर्ग्युसन काॅलेजच्या मागच्या टेकडीवर घेऊन जातात आणि मुलांना शपथ घ्यायचे आवाहन करतात, गुरुजी म्हणाले,"गोखल्यांनी इथेच देशसेवेची शपथ घेतली व जीवनभर पाळली. तुम्हीही शपथ घ्या की आपली मायभूमी स्वतंत्र होण्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण कराल.या पुढच्या स्वातंत्र्य लढ्यात आपण तुरूंगातच भेटू!". याच किशोरवयीन मुलांच्या समुहात एक साधा मुलगा होता नाव होते गणेश प्रभाकर प्रधान (ग.प्र.प्रधान) उर्फ प्रधान मास्तर. आज २६ आॅगस्ट प्रधान सरांचा जन्मदिवस. आजपासून (२६/०८/२०२१) त्यांची जन्मशताब्दी सुरु होते आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा ब्लाॅग.             पुढे १९४२ च्या गांधींच्या चलेजाव आंदोलनात सहभागी झाल्यामुळे येरवडयाच्या तुरूंगात साने गुरूजींच्या सोबत राहण्याचा योगही आला. फर्ग्युसन मध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून २० वर्षे नोकरी केली. सक्रिय राजकारणात यायचे तर नोकरी सोडावी लागेल अशी सक्त ताकित फर्ग्युसन चे प्राचार्य भाटे सरांनी त्यांना नोकरीवर रूजू करून घेताना दिली होती. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी ती म...

झाडांनाही बुद्धी असते...

Image
 झाडं ही जंगलाचा पाया आहेत. मुळात जंगल म्हणून आपण जे पाहतो किंवा जंगल म्हणून जे काय आपल्याला माहित आहे, असं जे आपण समजतो त्यापेक्षा ते कित्येक पटीने आपल्याला माहीत नसतं! जंगल हे समजून घ्यायचं असेल तर पीटर व्होलेबिन किंवा सुझान शिमार्ड यासारख्या जंगल तज्ञांकडून ते समजून घ्यावं लागतं. जंगल हे जितकं जमिनीच्या वर असतं त्यापेक्षा कित्येक पटीने ते अदृश्य स्वरूपात जमिनीच्या खाली असतं. जंगलामध्ये झाडांच्या खाली मातीत अगणित असे जैविक मार्ग असतात. हे मार्ग झाडांचा एकमेकांशी संवाद घडवून आणतात. एकमेकांशी जोडतात. संपूर्ण जंगलाला एकजीव करण्याच्या मार्गात हे भूमिगत मार्ग मोठी भूमिका बजावतात. हे भूमिगत जैविक मार्ग म्हणजे एका झाडाची मुळांनी दुसऱ्या झाडाच्या मुळांशी संवाद साधने हे होय. जगदीश चंद्र हे 'झाडांना देखील संवेदना असतात' या शोधाचे जनक म्हणून ओळखले जातात. तर सुझान या 'झाडांना देखील बुद्धिमत्ता असते' या शोधासाठी म्हणून ओळखल्या जातात.      सुझान लहान असताना त्यांच्या घराजवळ एक मोठे पाईनचे झाड कोसळले. त्या झाडाखाली त्यांचा पाळीव कुत्रा अडकला. सुझान यांच्या आजोबांनी त्या कुत्र्या...

'बंदसम्राटाची' सुसाट गोष्ट...

Image
 जुन्या राजकीय वर्तुळात संघ भाजपचे कार्यकर्ते असो वा समाजवादी, एकमेकांसमोर कायमच दंड थोपटून उभी असणाऱ्या या दोन्ही गटांचे लोक मात्र एका व्यक्तीसाठी प्रचंड हळवे होतात, ती व्यक्ती म्हणजे जॉर्ज फर्नांडिस! या दोन्ही गटांचा जॉर्ज हा हळवा कोपरा होता. जॉर्ज सारखा इमानदार माणूस आपण पाहिला नाही यावर या दोन्ही गटांचे एकमत असे. समाजवादी चळवळीत आयुष्य घालवलेल्या जॉर्ज एका क्षणी भाजपच्या गोतावळ्यात जावे लागले ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होती हे स्वतः जॉर्ज यांनी जाहीरपणे कबूल केले आहे. निळू दामले यांनी 'सुसाट जॉर्ज' नावाने जॉर्ज यांची १९४० ते २०१० यादरम्यानची कारकीर्द पुस्तक रुपाने मांडली आहे. या पुस्तकाला चरित्र म्हणण्यापेक्षा जॉर्ज यांच्या राजकीय जीवनाचे 'प्रोफाइल' म्हणणे जास्त उचित होईल. मंगळूर मध्ये जन्मलेल्या जॉर्ज यांची सर्व राजकीय कारकीर्द मात्र बिहार मधल्या मुजफ्फरपुर या मतदार संघात गेली. जात-पात, धर्माच्या अस्मिता प्रचंड टोकदार असणाऱ्या बिहार मध्ये तसा जन्माने ख्रिश्चन, पण स्वतःच्या आयुष्यात निधर्मी असणारे जॉर्ज हे बिहार मध्ये इतकी वर्षे टिकले कसे हा मोठा प्रश्न आहे? त्य...

Loving Vincent

Image
   व्हिन्सेंट व्हॅन गाॅग साधारण २१ वर्षाचा असताना उर्सुला नावाच्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. परंतु ते व्हॅन गाॅगचे एकतर्फीच प्रेम होते. उर्सुलाने नकार कळवल्यामुळे हा बराच काळ नैराश्यात गेला होता. पुढे वडिलांच्या इच्छेप्रमाणे हा पाद्री झाला. व्हॅन गाॅग ज्या भागात प्रवचनं द्यायला जायचा ती सर्व वस्ती कामगारांची होती. तिथे एकदा एका काळोख्या खोलीत काही कामगारांचा मृत्यू झाला त्यानंतर याची परमेश्वरावरची श्रद्धा डळमळीत झाली व त्यानंतर याने प्रवचनं देणे अाणि पाद्री चे काम करणं बंद केलं. व्हॅन गाॅग च्या आयुष्यात त्याचा धाकटा भाऊ थिओडोर याचा मोठा हातभार आहे. व्हॅन गाॅग जास्त मनमोकळेपणाने बोलायचा ते फक्त थिओडोर सोबतच. जरी थिओडोर हा व्हॅन गाॅग पेक्षा लहान असला तरीही तो व्हॅन गाॅगचे सर्व करत असे. गाॅगला पेंटिंगसाठी लागत असलेला पैसा,कागद.इ. वेळपडल्यास व स्वतःची जरी नड असली तरी सुद्धा व्हॅन गाॅगला त्याने पेंटिंगसाठी काहीच कमी पडू दिले नाही. व्हॅन गाॅग ला लागणाऱ्या सर्व वस्तू थिओडोर खरेदी करून देत असे.कदाचित थिओडोर हा एकमेव व्यक्ती असावा त्या काळातला की ज्याला व्हॅन गाॅग हा किती मोठा ...

दांभिक लैंगिकतेची दमनरुपे...

Image
 सन २०१९ मध्ये एका प्रसिद्ध मोरोक्कन अभिनेत्रीला अटक होते, कारण काय तर तिच्याच नवऱ्याने तिच्याविरुद्ध व्यभिचाराची तक्रार केली होती म्हणून!… एक सामाजिक कार्यकर्ता स्वत:च्याच बायकोसोबत मोरोक्कोमधील मराकेश या शहरातील एका हॉटेलच्या बेडरूममध्ये होता; तर तिथे पोलिसांनी धाड टाकली. त्या सामाजिक कार्यकत्र्याच्या पत्नीने सरळ हॉटेलच्या खिडकीतून स्वत:ला फेकून देत आत्महत्या केली. पकडलो गेलो म्हटल्यावर पुढे होणाऱ्या तथाकथित ‘बदनामी’पेक्षा त्या स्त्रीला मृत्यू जवळ करावासा वाटला… या सगळ्या घटनांमधला कळस म्हणजे, सप्टेंबर २०१९ मध्ये पत्रकार हजेर रायसोनी यांना एक डॉक्टरसमवेत अटक झाली. रायसोनींचे एका महिलेशी विवाहबाह््य संबंध होते आणि त्या दोघांना या संबंधातून मूल नको होते, म्हणून त्यांनी दवाखान्यात जाऊन गर्भपात करण्याचा ‘गुन्हा’ केला होता. रायसोनी हे मोरोक्कोच्या पत्रकारितेतले एक मोठे प्रस्थ. राजकीय मंडळींमध्ये त्यांची ऊठबस असे. राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी सरकारी धोरणांवर वेळोवेळी ताशेरेही ओढले आहेत. त्यांच्यावरील याच खटल्यामुळे मोरोक्कोत इतकी वर्षे दमन केले जात असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या चळ...

भारतीय संस्थानांच्या इतिहासाचा धांडोळा

Image
  पेशवाई ची सुरुवात हा जर मध्य मानला तर पेशवाईच्या अगोदर आणि पेशवाईच्या नंतरच्या इतिहासात भारतामध्ये लहान-मोठी जवळपास 565 संस्थाने होती. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली ही संस्थाने मग दुर्लक्षिली का गेली? याचे कारण या संस्थानिकांचे संस्थानिक हे जन्मानेच संस्थानिक होते आपल्या कर्माने नव्हे. या 565 संस्थानांपैकी महत्वाच्या ३९ संस्थानांचा आढावा घेतला आहे सुनीत पोतनीस यांनी आपल्या 'बखर संस्थानांची' या राजहंस प्रकाशन प्रकाशीत पुस्तकामध्ये.      ब्रिटिशांच्या काळात दोन प्रकारचे शासकीय प्रदेश होते. एक प्रदेश जो ब्रिटिशांनी स्वतः जिंकलेला आहे किंवा ब्रिटिशांच्या राज्यामध्ये विलीन झालेला आहे. दुसरा प्रदेश जो असेल भारतीयांचा पण अंकित असेल मात्र ब्रिटिशांना, त्याला आपण 'रियासत' किंवा 'संस्थान' असे म्हणतो. या संस्थानांचा इतिहास हा रंजकतेने भरलेला आहे. काही संस्थानांनी केलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक प्रगतीचा आहे तर काही संस्थानिक जे विलासी वृत्तीचे होते. विलासी वृत्ती इतकी की इतके की 801 कुत्रे पाळणारे आणि पाळीव कुत्रीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करणारे तसेच पेपरवे...

Food choices

Image
कोणतं अन्न हे आपल्यासाठी योग्य आहे हा प्रश्न कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नेहमीच ज्वलंत मुद्दा असतो हा. या संदर्भात गेल्या दोन तीन दिवसात काही टेड टाॅक्स ऐकले, काही लेख वाचले तर काही डाॅक्युमेंटरीज पाहील्या. त्यातली आवडलेली आणि पटलेली डाॅक्युमेंटरी म्हणजे Food Choices ही होय. अमेरिकी आहारतज्ज्ञ डाॅ.पामेला पाॅपर या म्हणतात की माणसांसाठीच्या वनस्पती अन्नाचे साधारण चार गट केले जातात. किंवा आपले अन्न या चार गटांकडून यायला हवे. फळं, भाज्या, डाळी/धान्य आणि शेंगा. हे वनस्पती अन्न असल्याने त्याच्यावर फार प्रक्रिया झालेल्या नसतात. काॅर्नेल विद्यापीठातील बायोकेमिस्ट थाॅमस कॅम्पबेल ज्यांची पोषणद्रव्य (न्यूट्रिशन) या विषयात पीएचडी झालेली आहे व या विषयावर त्यांचे बरेच प्रबंधही प्रकाशित आहे. 'द चायना स्टडी' हे त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक. त्यांच्या पोषणद्रव्य अभ्यासावर आधारित आत्तापर्यंत १८ हून अधिक डाॅक्युमेंटरी फिल्म येऊन गेल्या आहेत. डाॅ. कॅम्पबेल म्हणतात की काॅर्पोरेट सेक्टरर्सना त्यांच्या पॅकेज्ड अन्नपदार्थांची भरमसाठ विक्री करायची आहे. त्यासाठी आपली पारंपारिक अन्नसाखळी तोडल्याशि...