Posts

Showing posts from 2022

साहित्य -सिनेमा - २०२२

Image
  वाचन, लेखन आणि सिनेमा पाहणे या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. यावर्षी वर्षभर ॲग्रोवन मध्ये एक 'मशागत' नावाचं साप्ताहिक सदर लिहिलं. मशागतचा अतिशय चांगला अनुभव आला. यावर्षीची सुरुवातच खूप छान झाली होती. पुणे आकाशवाणीवरील 'साहित्य विश्व' या कार्यक्रमात मराठी पुस्तकांची ओळख करवून देता येत होती. सात आठ मराठी पुस्तकांवर लिहायची संधीही मिळाली. पण पुढे हा कार्यक्रमच पुणे आकाशवाणीने बंद केला. तरी साधना, लोकसत्ता बुकमार्क, कर्तव्य साधना इथे चांगल्या पुस्तकांवर लिहिता आलं याचं समाधान आहेच. या वर्षी (२०२२) 'सिद्धार्थ' या हरमन हेस लिखित नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीला प्रकाशित होण्यास १०० वर्ष पूर्ण होत असल्याने दिल्लीच्या गाॅथे इनस्टिट्यूट, मॅक्समुल्लर भवनाच्या वेबसाइटसाठी सिद्धार्थवर एक लेख लिहिला. जयश्री हरी जोशींमुळे ही संधी मिळाली.    शेती, काॅलेज, क्लासेस, या व्यापातून वाचनासाठी वेळ काढणे ही खरंच मोठी कसरत आहे. २३ जुलै रोजी आजीचे निधन झाले. तसेच २० आॅक्टोबरला गावात झालेल्या ढगफुटीने वाचनात मोठाच खंड पडला. मानधनाच्या बाबतीत मला साधना, लोकसत्ता आणि ॲग्रोवन यां...

कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जीवन

Image
आपण दिग्दर्शक व्हावं ही जाणीव स्टिव्हन स्पिलबर्ग यांना अगदी लहानपणीच झाली होती जेव्हा, त्यांच्या वडिलांनी (अरनाॅल्ड) स्टिव्हन यांच्या हातात एक कॅमेरा दिला होता. स्टिव्हन लहानपणापासूनच त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने छोट्या छोट्या फिल्म्स् तयार करु लागले.  रिचर्ड ड्रेफुल (जॉज मधला अभिनेता) म्हणतात की,"जॉजचं शूटिंग सुरू झालं होतं २ मे ला आणि मला ३ मे ला घेतलं. त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणता शार्क होता ना कोणती पटकथा ना कोणताही अभिनेता/अभिनेत्री होती." स्पीलबर्ग म्हणतात की,"जाॅजच्या पटकथेला कधीच पूर्णविराम दिलेला नव्हता. शूटिंगच्या बारा तास आधीही कधी कधी पटकथेत बदल केले जात असे."  दिग्दर्शक म्हणून हे मला खूप घाबरवणारं असायचं की, "माझ्या हातात आत्ता जी पटकथा आहे ती काल रात्री जी होती ती नाहीये, त्यामुळे रात्री जी पटकथा होती ती सकाळी शूटिंगच्या वेळेस असेलच असं नाही." स्टुडिओत एक मोठं कृत्रिम तळं असताना देखील स्पिलबर्ग यांनी जाॅजचं शूटिंग मात्र प्रत्यक्ष महासागरात केलं. जमिनीवर शूटिंग करणे आणि समुद्रावर शूटिंग करणे यात मोठा फरक असतो. समुद्रावरची आव्हाने ही वेगळी अस...

शासन, साहित्यिक आणि बांधिलकी

Image
 आणीबाणीतल्या अनुभवाने दुर्गाबाईंना आतून बाहेरून हालवून टाकले होते. शासन म्हणजे लेखकांचे आश्रयदाते आणि लेखक म्हणजे जणू त्यांचे आश्रित. आणिबाणी नंतर दुर्गाबाई स्वतःशीच विचार करु लागल्या की लेखक नि शासक यांच्यामधला संबंध नेमका कसा असावा? काही लेखकांच्या मते तो सौहार्दाचा असावा. पण असा विचार करणे हे पूर्णपणे एकतर्फी आहे. कारण शासनाचा पक्ष हा केव्हाही इतका सामर्थ्यशाली असतो की तो तुमच्या (म्हणजेच साहित्यिकांच्या) सहकार्यास फारसा उत्सुक नसतो. राज्यकर्त्ये स्वतः मोठेपणा मिरवण्यासाठी, "लेखकांना अनुदाने देणे हे सरकार म्हणून  आमचे कर्तव्यच आहे!" अशी भाषणेही करत असतात. पण यात छुपा अर्थ असा असतो की, "आम्ही तुम्हाला दान देत आहोत". आणि बहुसंख्य लेखकांना ही अनुदाने दान वा उपकार न वाटता ती त्यांची हक्काची देणगी वाटते. लेखकांचा दावा हा असतो की शासनाच्या या अनुदानामध्ये दान किंवा उपकार काहीही नसते तर तो जनतेचा पैसा परत जनतेलाच दिला जात असतो. मग प्रश्न असा पडतो जर जनतेचा पैसा जनतेलाच परत द्यायचा असेल तर तो एका विशिष्ट वर्गालाच(लेखक, गायक, खेळाडू इ) का दिला जातो? सुतार, लोहार, चांभार ...

मन्नू भंडारी

Image
विसाव्या शतकातील हिंदी साहित्याचा अभ्यास करायचा ठरल्यास ज्या लेखिकेचे साहित्य वाचल्याशिवाय, आपल्याला पुढे जाताच येणार नाही अशी प्रतिभावंत लेखिका म्हणजे मन्नू भंडारी! नुकतेच त्यांच १५/११/२०२१ रोजी देहावसान झाले. मन्नूजींनी आपल्या साहित्यातून केवळ स्त्रियांवर होणारा अन्याय चित्रित केला नाही तर, त्यांच्या कादंबऱ्यांतून त्यांनी सशक्त, पुरोगामी स्त्रियांचं चित्रण केलं आहे. जसे आपका बंटी मधील शकुन ही घटस्फोटीत स्त्री. आपका बंटी ही कादंबरी वाचताना वाचक बंटी या आठ नऊ वर्षाच्या मुलाची, आई बापाच्या घटस्फोटामुळे जी मानसिक ओढाताण होते त्यात गुंतून जातो. अर्थात ते महत्त्वाचे आहेच पण आई वडीलांचा घटस्फोट जरी झाला असला तरी शकुन एक स्त्री आहे. स्त्री म्हणण्यापेक्षाही ती एक माणूस आहे. तिलाही पुढे जावंसं वाटतं. पण त्याच बरोबर बंटीसाठी तीचं आई म्हणून आतडंही तुटतं. तिलाही स्वतःचं एक आयुष्य आहे. पण समाज त्याकडे कधी लक्ष देणार नाही. त्या लहान मुलाचं काय होईल? त्याचं भवितव्याचं काय? याचाच विचार समाज करत असेल. पण त्याच्या आईचं काय? शकुन जेव्हा दुसरं लग्न करते तेव्हा असंही वाटू शकतं की ही स्वार्थी आहे की काय? प...

बदलत्या साहित्याचा नकाशा

Image
 स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी स्वीकारलेल्या समाजवादी धोरणांमुळे भारतात औद्योगिक क्रांती होण्यास तसा उशीरच झाला. आता नेहरूंनी समाजवादी धोरण स्वीकारल्यामुळे भारतात डाव्या विचारसरणीने चांगलेच हातपाय पसरले. याचा परिणाम असा झाला की जे साहित्य गरिबी, कामगार, उपेक्षितांचे प्रश्न मांडतील ते सर्वच नैतीक आणि जे आधुनिक, श्रीमंत, औद्योगिकरणाच्या बाजूने बोलणारे असेल ते सर्वच अनैतिक अशी नाही म्हटली तरी साहित्याची सरळ सरळ विभागणी झाली. पुढे १९९१ साली भारताने आर्थिक उदारीकरण स्वीकारले आणि मध्यमवर्गीय लोकांकडे पैसा खेळू लागला. या आर्थिक सुबत्तेतून मध्यमवर्ग हा उपभोक्तावादाचा सर्वात मोठा बळी ठरला. या झपाट्याने बदलत्या काळात या वर्गाच्या साहित्यिक जाणिवा देखील झपाट्याने बदलत गेल्या. साठोत्तरी समाज ज्यांचा बदल स्वीकारण्याचा वेग मंद होता त्यांनी या उदारीकरणामुळे थेट टाॅप गिअर टाकला. या पंचवीस वर्षातील बदललेलं मराठी साहित्य, साहित्यिक जाणिवा, साहित्या समोरची महत्त्वाची आव्हाने, बदलत्या काळातील साहित्यासमोरची प्रलोभने, प्रादेशिकता, देशीयता, आधुनिकता उत्तर आधुनिकता, इलेक्ट्रॉनिक मीडियाची मानवी मनावर असलेली स...

कॅप्टन फॅन्टॅस्टिक

Image
मी नुकताच कॅप्टन फॅन्टॅस्टिक हा सिनेमा पाहिला. ॲमेझाॅन प्राईमवर तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या सिनेमाची मध्यवर्ती गोष्ट अशी की यातला मुख्य नायक बेन (व्हिगो माॅर्टेसन) हा विधुर आहे. त्याची प्रिय पत्नी ही एका मनोविकाराशी झुंज देत असताना या जगाचा लवकरच निरोप घेते. बेन हा म्हटला तर जरा जास्तच आडमूठा आहे. त्याच्यावर थोरो या अमेरिकन विचारवंताचा प्रभाव दिसतो. म्हणजे बेन असा विचार करतो की माणसांना शाळा, काॅलेजांची गरजच काय? जे काही शिकायचं असेल ते आपण निसर्गाकडूनच शिकावं. स्वतःला चार भिंतीत कोंडून शिकण्यापेक्षा हिंडावं फिरावं त्यातून जे शिकता येईल ते शिकवं यावर तो ठाम असतो. आपल्या पत्नीवर वैद्यकीय इलाज काम करत नाहीये; तेव्हा बेन एक मोठा निर्णय घेतो की, आपण दोघांनी मुलांसह जंगलात जाऊन रहावं. तेही कायमचं. तस ते दोघे करतात पण. त्याची सहा मुलं घेऊन ते जंगलात राहतात पण. बेन एका मोठ्या बस मध्ये सर्व सोयी करवून घेतो आणि जातो मुलाबाळांसह जंगलात रहायला. सोबत चिक्कार पुस्तक घेऊन जातो ज्यात जेरेड डायमंड च्या गन्स,जर्म्स ॲन्ड स्टिल पासून ते नाॅम चोम्स्कीच्या सर्व पुस्तकांपर्यंत अशी सगळ्यांची पुस्तके असतात....

वह कौन रोता है वहाँ!

Image
  गेली दोन-तीन महिने महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ म्हणू नका असा कोणताच भाग नाहीये की ज्याला या अतिवृष्टीचा तडाखा बसला नाहीये. यात सर्वात कहर झाला तो गेल्या दोन आठवड्यात. परतीच्या पावसामुळे तब्बल ३६ लाख हेक्‍टरवरील पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत.  दिवाळीला केवळ दोन दिवस राहिलेले असताना निसर्ग हा असा सर्वत्र कोपला आहे/होता.  खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेला घास या अतिपावसाने शेतकऱ्यांकडून असा हिरावून घेतला. ऑक्टोबर मधील केवळ दोन आठवड्यांत तब्बल १६ जिल्ह्यांना या पावसाने तडाखा दिला. यात तब्बल सव्वा लाख हेक्‍टरवरील सोयाबीनचे पीक नष्ट झाले. शहरांमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे जसे हाल झाले त्याहूनही वाईट परिस्थिती आज खेडोपाडी आहे. पण आज खेड्यापाड्यातही मोठ्याप्रमाणात पाणी तुंबून राहणे ही समस्या का भेडसावते आहे? या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन जरा विचार करावा लागेल. या समस्येला काही एक असं उत्तर नाहीये. अनेक कोणातून या प्रश्नाकडे आपल्याला पाहता येईल. अतिवृष्टी याला जागतिक तापमान वाढ होणं हे एक कारण आहेच पण, त्याच...

मनुष्य गौरव दिन!

Image
  सृष्टीतील श्रेष्ठ निर्मिती ही मनुष्य आहे. पण मनुष्य सृष्टीचालकासोबत असलेला आपला संबंध विसरून स्वतःचीच पीछेहाट करवून घेतो. अशावेळी तो स्वतःला बलहीन समजायला लागतो. भावनिक आद्रतेचे बाष्पीभवन झाल्यासारखं, जीवनात गरीमा गमावून बसल्यासारखं स्थिती तो अनुभवतो. अशावेळी निस्वार्थ प्रेमाची ऊब व उत्साह त्याला मिळाला तर, जीवनाला काही अर्थ प्राप्त होतो. असे केल्याने त्या व्यक्तीमधील आत्मगौरव, अस्मिता, तेजस्विता अशा विविध गुणांना पंख फुटतात. असाच प्रभूस्पर्श 'हट टू हट आणि हार्ट टू हार्ट' घेऊन गेले स्वाध्याय परिवाराचे प्रणेते प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले. ज्यांना संपूर्ण स्वाध्याय परिवार प्रेमाने 'दादाजी' म्हणतो. त्यांचा जन्मदिन (19 ऑक्टोंबर) स्वाध्याय परिवार हा  'मनुष्य गौरव दिन' म्हणून साजरा करतो. भारतातील कृतिशील तत्वज्ञांमध्ये ज्यांचा क्रमांक फार वरचा लागतो. स्वाभिमान गमावलेल्या, हीन-दीन तसेच केवळ लाचारी करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता समजणार्‍या लोकांना स्वाभिमानाचं महत्व कधी समजेल का ? त्यांना स्वतःबद्दल कधी गौरव वाटेल का ? ही दादांची व्यथा होती. स्वाभिमानानं परिपूर्ण अ...

स्मार्ट फोनचं स्मार्ट जाळं

Image
पत्र आणि लॅन्डलाईनच्या काळात एखाद्याशी संपर्क साधणे हे खूप वेळखाऊ प्रकरण होते. अविश्वसनीय होतं. कारण पत्र ज्याला पाठवलं आहे त्याच्याच हातात ते पडेल ना? ज्याच्यासाठी लॅन्डलाईनवर फोन केला आहे तोच फोन उचलेल की नाही याची खात्री नव्हती. थोडक्यात पत्र आणि लॅन्डलाईन मध्ये आपला खाजगीपणा (प्राईव्हसी) जपला जाईलच असं नाही. मोबाईल मुळे खाजगीपणा जपणे ही गोष्ट जास्त शक्य झाली त्यामुळेच त्याला प्रचंड लोकाश्रय मिळाला. त्याच बरोबर सहज संपर्क करता येणं, त्यात असलेल्या सुविधांचाही त्याला मिळणाऱ्या लोकाश्रयात मोठा वाटा आहेच. पण या स्मार्ट फोनने आज आपल्याला विळखा घातला आहे असं नाही का वाटत? व्हाट्सप आणि मेसेंजरच्या युगात तर ते अगदी स्वस्त आणि झटपट झाले आहे. स्मार्टफोनच्या या सहज उपलब्ध सोईंमुळे सोशल मिडियावर आपण लिहिलेल्या मजकुरावर आपण परत परत जातो. शक्य असेल तर उत्तर देतो. वेळोवेळी सोशल मिडिया स्टेटस अपडेट करत बसतो. त्यावर आलेले लाईक्स, लव्ह, शेअर्स वगैरे गोष्टी मोजत बसतो. पण यासगळ्या गोष्टीत अडकून पडणे गरजेचे आहे का? आपल्याला यावरचं बंधन नको वाटणे हे आपण निवडू शकतो. आपण या सर्व गोष्टींना थोडी वाट पहायला...

अभिनयातून आत्मशोधाकडे...

Image
 आठ वर्षांची एक गरीब मुलगी. घरी अठरा विसे दारिद्रय़ त्यात जगण्यास अभिशाप ठरावा असा तिचा वर्ण. ती कृष्णवर्णीय आहे. वडील अट्टल दारुडे. पिऊन आल्यावर ते तिच्या आईला इतकं बेदम मारायचे की त्या मारामारीत प्रत्येक वेळी तिच्या आईला जबरी दुखापत व्हायची. या भयंकर गृहकलहाचा त्या कोवळय़ा जीवावर व्हायचा तोच परिणाम झाला. ती दिवस-रात्र त्या भीतीच्या मानसिक दडपणाखाली जगू लागली. तिचं ते वयही असं नव्हतं की तिला नक्की काय झालंय हे कुणाला सांगता यावं. अर्थात कुणाला त्याच्याशी काही देणंघेणंदेखील नव्हतं. हा गृहकलह एकदा तर इतका विकोपाला गेला होता की तिच्या वडिलांनी एका अणकुचीदार काचेनं तिच्या आईवर हल्ला केला व तिच्या आईच्या डोळय़ाच्या खाली जेव्हा ती काच घुसली तेव्हा रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि ती या मुलीच्या अंगावर पडली. आई-वडिलांच्या या भांडणात पडण्याची तिची हिंमत होत नसे. भीतीच इतकी वाटायची तिला की बास. पण चिळकांडी अंगावर उडाली तेव्हा मात्र तिच्यातील भीतीने परमोच्च बिंदू गाठला होता आणि त्यात ती मोठय़ांदा किंचाळत एकच शब्द बोलू शकली, ‘‘थांबा! बास झालं..’’ हे झालं फक्त घरातलं. घराबाहेर शाळेत तरी ती सुरक्...

युद्धखोर अमेरिका ते युद्धखोर इस्राईल व्हाया युद्धखोर युरोप

Image
  जगात 'आपण' आणि 'ते',ते म्हणजे अमेरिका आणि आपण म्हणजे इतर देश या व्यतिरिक्त तिसरे जग म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे आखाती देश होय.  विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा वाळवंटी प्रदेशातल्या या अरबी वाळूखाली खनिज तेलाचे साठे आहेत याचा शोध लागला तेव्हापासून ही वाळू भयंकर तापू लागली. टोळ्यांमध्ये राहणाऱ्या या अरबांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपल्या जमिनीत सापडणारे हेच तेल आपल्याच माणसांना जाळणाऱ्या आगीत तेल ओतण्याची भूमिका पार पाडेल म्हणून? आपण नेहमी नव्वदोत्तर आर्थिक उदारीकरणाच्या गप्पा मारत असतो. पण सन २००० नंतर तेलासाठी, शस्त्रास्त्रे विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देशांनी केलेल्या नृशंस हत्याकांडा मुळे हीच अरबी वाळू अक्षरशः रक्ताने लाल झाली आहे. याला कोणताही आखाती देश अपवाद नाही. आखाती देशात पाश्चात्य देशांच्या भूराजकारणाने माजवलेला हा युद्धकहर नेमक्या शब्दात टिपला आहेत सुप्रसिद्ध जर्मन लेखक डॉ. मिशाएल ल्यूडर्स यांनी. डॉ. ल्यूडर्स हे जर्मनीतील ख्यातनाम राजनीतिज्ञ, जर्मन सरकारचे राजकीय आणि आर्थिक सल्लागार, अरब आणि इस्लाम विषयाचे ...

उषा प्रियंवदा यांच्या कादंबऱ्यांमधील स्त्री

Image
 पंचायत सिझन -२ पाहिली असेल तर त्यात रघुवीर यादव म्हणजेच पंचायत चे प्रधानजी यांच्यावर चित्रित केलेल्या एका दृष्यामधला हा खालील फोटो सर्वांनी पाहिला असेलच. तर, प्रधानजींच्या हातात आहे हिन्दी मधील जेष्ठ लेखिका उषा प्रियंवदा यांची "पचपन खंबे लाल दीवारें" ही कादंबरी. गेल्या वर्षी उषा प्रियंवदा यांच्या बऱ्याच कथा ऐकल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्याही वाचायला सुरुवात करायची होती पण, नोव्हेंबर २०२१च्या शेवटी मन्नू भंडांरींचे निधन झाले. मन्नूजींची पुस्तके पुन्हा वाचण्यात गर्क झाल्याने उषाजींना वाचायचं राहून गेलं होतं. 'पंचायत' मुळे ते पुन्हा उफाळून आलं.  उषाजींच्या "पचपन खंबे लाल दीवारे" आणि "रुकोगी नहीं राधीका?" या दोन्ही कादंबऱ्या ऐकल्या. त्यातली 'पचपन खंबे...' ही खूपच आवडली. "रुकोगी नहीं राधीका?" या कादंबरीचा मला शेंडा बुडूख असं काहीच हाती लागलं नाही. 'रुकोगी नही..' मधीली राधीका असेल किंवा 'पचपन खंबे...' मधली सुषमा, ही जी या दोन्ही कादंबऱ्यांमधली मुख्य स्त्री पात्र आहेत ती उत्तम शिकलेली आहेत. या दोघी स्वतःची मतं स्वत...

एक अप्रतिम शालेय विज्ञान पुस्तक.

Image
मार्च-२०१९ माझ्या मोठ्या बंधूंचे सासरे श्री अनंत शास्त्री लावर हे त्यांच्या एका मठाच्या पौरोहित्याच्या कामासाठी मेलबर्न ला गेले होते. त्यांना आम्ही सगळे अण्णाच्या म्हणतो. अण्णा तिकडून निघण्याच्या काही दिवस आधी मी त्यांना म्हणालो की येताना माझ्यासाठी  मेलबर्न मधले इयत्ता नववी व दहावीचे विज्ञान व गणितची क्रमिक पुस्तके घेऊन याल का? त्यांनी स्वतःचे काही सामान सोडून माझी ही तीन चार पुस्तके आणली ज्याचे वजन जवळजवळ ४-५ किलो तर सहज असेल. एकूण किंमतही साधारण ४५ आॅस्ट्रेलिअन डाॅलर इतकी झाली होती. ही पुस्तके माझ्यासाठी  घेऊन आल्याबद्दल अण्णांचे आभार मानतो.      तर सांगायचा मुद्दा हा की गेल्या दोन एक महिन्यापासून मी वेगवेगळ्या देशातील इयत्ता दहावीच्या गणित, विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहेत. वेगवेगळ्या देशात या वयोगटातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान हे विषय कसे शिकवले जातात? मला या गोष्टीचे खूप कुतूहल आहे. हे मेलबर्नचे इयत्ता दहावीचे विज्ञानाचे पुस्तक वाचताना मी विशेष आनंद झाला. आनंद यासाठी की या किशोरवयात असाही डिझाईन केलेला अभ्यासक्रम शिकवता येऊ शकतो. पहिल्या प्रकरण...

बदलाचा प्रवास

Image
 अमेरिकन जमिनीला वर्णसंघर्ष काही नवा नाहीये. सिव्हिल वॉरच्याही अगोदर पासून ते काल परवाच्या ब्लॅक लिव्ह्ज मॅटर वाल्या जॉर्ज फ्लाॅईड पर्यंतचा या चळवळीचा हा असा मोठा इतिहास आहे. या अमानवीय गोष्टींमध्ये झालेल्या मोठ्या बदलाची सुद्धा अमेरिकन माती साक्षीदार आहे. कित्येक गावे, शहरं या बदलाचे साक्षीदार म्हणून तो इतिहास आजही आपल्याला सांगू पाहत आहे. गेल्या चाळीस पन्नास वर्षांपूर्वीही हा वर्णसंघर्ष तितकाच टोकदार होता. हा वर्णसंघर्ष विज्ञानाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नासा सारख्या संस्थेलाही चुकला नाही. अमेरिकेचा जॅकसन भाग असो वा दूरहॅम (नाॅर्थ कॅरोलीना) असो सगळीकडे कृष्णवर्णीय लोकांनी उपेक्षा, अवहेलना सहन केली आहे. श्वेतवर्णीय लोक आपल्याला माणसं म्हणून सुद्धा मोजत नाही. तिरस्काराची वागणूक तर पदोपदी देतात. कॅथरीन स्टॉकेट या लेखिकेची 'द हेल्प' नावाची कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं की, अमेरिकेतील जॅकसन भागात घरकाम करणाऱ्या कृष्णवर्णीय मोलकरणीं साठी श्वेतवर्णीय लोक वेगळा संडास बांधत असत. 'रेस' नावाचा सिनेमा पाहिल्यावर लक्षात येतं की, एखाद्या खेळाडूने देशासाठी ऑलिम्पिक पदक जरी जिंकलं असल...

टोकदार तत्वज्ञ!

Image
 आज (१८ मे २०२२) थोर ब्रिटिश तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांची शतकोत्तर सुवर्ण (१५० वी) जयंती. त्यांच्या कार्याचा धावता आढावा घ्यावा म्हणून हा लेख. बर्ट्रांड रसेलचे रसेल हे घराणे इंग्लंडमधील एक सुप्रसिद्ध असे खानदानी घराण्यांपैकी एक आहे. या रसेल घराण्याने इंग्लंडला कित्येक मुत्सद्दी पुरवले. बर्ट्रांड रसेल यांचे आजोबा लॉर्ड रसेल हे लिबरल पक्षातर्फे इंग्लंडचे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. बर्ट्रांड रसेल यांचे वडील एक मुक्त चिंतक होते. त्यांनी आपल्या मुलांवर पाश्चिमात्य वंशपरंपरेने आलेल्या ईश्वरशास्त्राचा बोजा लादला नाही. बर्ट्रांड रसेल वंशपरंपरा नाकारतो. म्हणूनच रसेल यांनी आपल्या नावामागे कधीही 'लाॅर्ड' हे नामाभिधान लावले नाही. महायुद्धाच्या विरोधात स्पष्ट, रोखठोक भूमिका घेतल्यामुळे त्यांची केंब्रिज मधून हकालपट्टी करण्यात आली. युद्ध विरोधामुळे रसेलला आपल्याच मायदेशी इंग्लंडात सामान्यांपासून ते राजकारणी, विचारवंतांपर्यंत सर्वांच्याच रोषाला सामोरे जावे लागले होते. तर्कशास्त्राच्या गुणांवर त्यांनी फार जोर दिला होता. गणिताला त्यांनी आपला देव मानलं होतं. 'माझ्याविषयी विचाराल तर गणिता शिव...