Posts

निडर अभिनेत्री - मेरील स्ट्रीप

Image
 वेळ होती गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०१८ ची. मेरील स्ट्रीपला 'गोल्डन ग्लोब लाईफ टाईम अचिव्हमेंट' अवाॅर्ड मिळालं होतं. या पुरस्कारासाठी व्हायोला डेव्हीस ही एक अंत्यत गुणी अभिनेत्री कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असते. (Viola Devis चा The Help हा सुदंर सिनेमा आवर्जुन पहा, त्याही पेक्षा The Help ही कॅथरीन स्टाॅकेटची कादंबरी वाचा) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कराताना व्हायोलाने मेरील बद्दल जो काही आदर व्यक्त केला ना आहे तो फार फार आतून आलेला, निकोप, निस्वार्थ असा होता. पिवळ्या रंगाच्या वन आॅफ शोल्डर ड्रेस घातलेली व्हायोला डेव्हिस म्हणते की, "मेरील तुझ्यामुळे मला अभिनेत्री असल्याचा अभिमान वाटतो, तुझ्यामुळे मला हा आत्मविश्वास आला की माझं शरीर, माझं वय, माझा चेहरा हा जसा आहे तसा पुरेसा आहे." व्हायोलाच्या अशा या बोलण्यामुळे प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येकाला एक असं आनंदाचं भरतं आलेलं आहे हे स्पष्ट दिसतं होतं. गोल्डन ग्लोब पुरस्काराची लिंक       पुरस्काराची औपचारिकता आटोपल्यानंतर मेरील आपलं मत व्यासपीठावरून मांडायला सुरुवात करते. घसा बसलेला असतो तरी ती बोलतेच. या कार्यक्रमाच...

कालजयी दिनकर

Image
             सदियों की ठंडी बुझी राख सुगबुगा उठी,               मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है,              दो राह, समय के रथ का घर्घर नाद सुनो,              सिंहासन खाली करो की जनता आती है| सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या दडपशाही आणि संपुर्ण देशावर १९७५ सालानंतर तब्बल २१ महिने लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचे एक देशव्यापी आंदोलन चालू होते. त्या आंदोलनाच्या यज्ञकुंडातून बाहेर पडणारी अग्निशिखा जनमानसात धगधगती ठेवण्याचे काम ज्या कवितेने केले होते ती कविता म्हणजे 'सिंहासन खालि करो की जनता आती है'.आणि या क्रांतिकारी कवितेचे उद्गाते आहे राष्ट्रकवी 'रामधारी सिंग दिनकर' उर्फ 'दिनकर'.       दिनकर हे आजही हिंदी साहित्यातील एक दिग्गज कवी म्हणून ओळखले जातात. ज्यांची ख्याती 'संसद से लेकर सडक तक, और जिल से लेकर जन-जन तक' अशी होती. दिनकरांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ सिमरिया (मुंगेर) जे आता बिहार मधिल बेगुसराय जिल्हात येते तिथे ...

एक बेगम अशीही...

Image
  भारतीय उपखंडाचे रॅडक्लिफ रेषेमुळे जसे स्पष्ट दोन भाग केले गेले, तितक्या स्पष्टपणे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान व त्यांची पत्नी बेगम राणा या दोहोंचा विलगपणे विचार करणे अवघड आहे. बेगम राणांसारख्या निर्भय, महत्त्वाकांक्षी महिलेचे चित्रण करणे हेही तितकेच आव्हानात्मक. एका नव्याने जन्माला घातलेल्या राष्ट्राचे बाळंतपण करण्यासाठी बेगम राणा यांनी पदर खोचला होता. म्हणूनच त्या ‘मदर ऑफ पाकिस्तान’ म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी त्यांनी आपले दिल्लीतील घर- ज्याची नुसती बागच जवळजवळ तीन एकर एवढी होती- ते सोडले. ज्या घरात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना (अशरफ आणि अकबर) यांना जन्म दिला होता, ते सोडून एका नव्याने जन्माला आलेल्या देशात कायमचे राहायला गेल्या होत्या. मुळात हा नवीन देश राष्ट्र म्हणून टिकेल की नाही याचीही खात्री नव्हती. हे दिल्लीतले घर फक्त एवढय़ासाठीच महत्त्वाचे आहे का? तर तसे अजिबात नाही. भारतीय मुस्लीम लीग ही याच घरात- ‘८, होल्डिंग रोड’ - वाढली, पोसली गेली. लीगच्या बैठकांवर बैठका या घरात झाल्या, ते मुस्लीम लीगच्या चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. हे सर्व विस्ताराने चित्रि...

'इति-आदि' - दैनंदिन वस्तूंच्या इतिहासाचा अथ: पासून इतिः पर्यंतचा धांडोळा.

Image
  केवळ सनावळ्यांप्रमाणे घडणाऱ्या घटनांचा तपशील देणे म्हणजेच सांस्कृतिक इतिहास लेखन असं नाहीये. सांस्कृतिक इतिहास हा काही केवळ लढाईच्या मैदानतच घडतो असंही नाही. तर तो प्रत्येक पिढ्यांच्या स्वयंपाक घरातही घडून गेलेला असतो. पण अशा इतिहासाची फारशी नोंद न घेणं, त्याचं दस्तऐवजीकरण न करणे हा आपल्या लोकांना लागलेला पूर्वीपासूनचा शापच आहे  जणू. सांस्कृतिक इतिहास लेखन हे किती वेगवेगळ्या अंगाने होऊ शकतं याचा जणू एक नवा मार्गच अरूण टिकेकर आपल्याला दाखवून देत आहेत. दैनंदिन खान्या-पिण्याच्या वस्तू या आपण कधीपासून वापरू लागलो आहोत? त्या वस्तू, खाद्यपदार्थ जर विदेशी असतील तर त्यांना सर्वप्रथम आपल्याकडे कोण घेऊन आलं? कोणत्या मार्गाने त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या, याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा ही एक मोठा बौद्धिक आनंद देणारा भाग असतो. काही खाद्यपदार्थ हे उच्चभ्रू 'अभिजन' लोकांचेच होते. ते 'जनां'चे कसे झाले? उदा. आईस्क्रीम. तर काही खाद्यपदार्थ हे 'जनां'चे होते ते नंतर 'अभिजनां'त कसे रुळले? उदा. सिताफळ.  भारतीय गंधविद्या ही देखील किती विकसित होती हे ही या पुस्तका...

वैदिक

Image
 ' ऋषति-गच्छति संसारपारं इति ऋषि:' मानवमात्राचे इह तसेच पारलौकीक कल्याण बघण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे ते ऋषी. लोकांना एक विशिष्ट जीवनदृष्टी देणारा एक उन्नत जीव म्हणजे ऋषी. भारतीय संस्कृतीरूपी वृक्ष ज्या खतावर वाढला, पोसला, विस्तारला ती संस्था म्हणजे ऋषीमंडळ. हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनाची मशागत या ऋषीमंडळाने केली आहे आणि आजही विविध 'स्मृतींच्या' मार्फत हे मार्गदर्शन चालूच आहे. ऋषी हेही आपल्यासारखेच हाडामासाचे मनुष्य होते पण, आपल्या ज्ञानसाधनेतून, कर्मयोगातून उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. या विकासाची अवस्था इतकी उच्च की स्वतः सृष्टीकर्त्यालाही यांच्या चरणाजवळ बसून ज्ञानार्जन करण्याचा मोह वेळोवेळी व्हावा. या ऋषीपरंपरेतलं एक श्रेष्ठ कुळ म्हणजे 'भार्गव'. भृगु ऋषींपासून याची सुरूवात म्हणून याला भार्गव म्हटले जाते. या भृगुंचे पुत्र ऋचिक. ऋचिकांचे पुत्र जमदग्नी. जमदग्नींचे पुत्र परशुराम. या चार महान तपस्वींच्या जीवनकार्यावर राजीव पुरूषोत्तम पटेल लिखित आणि विहंग प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेली कादंबरी म्हणजे "वैदिक".       वैदिक वाड्मयाचा अभ्यास हा...

नाही नियम तरीही...

Image
 ' ब्लाॅकबस्टर' हे घरगुती मनोरंजन क्षेत्रातल्या एका दादा कंपनीचं नाव. साल होतं साधारण २०००.  त्यावेळी या कंपनीचे भांडवली बाजारातलं मुल्य होतं तब्बल सहा अब्ज अमेरिकन  डाॅलर. आणि त्यावेळी जगभरात ब्लाॅकबस्टरचे जवळजवळ नऊ हजार दुकाने होती. केवळ दोन वर्षंच आगोदर स्थापन झालेली एक छोटी कंपनी ती डबघईला आलेली होती. ब्लाॅकबस्टरने आपल्याला पदरात घ्यावं म्हणून ती छोटी कंपनी प्रयत्नशीलही होती. पण दुर्दैवाने ब्लाॅकबस्टर सोबत काही तिचा पदर जुळला नाही. हा व्यवहार होऊ शकला नाही म्हणून त्या छोट्या कंपनीने आपल्यात हळूहळू काही बदल केले. ब्लाॅकबस्टर मात्र आपल्यात काहीही बदल करायला तयार नव्हती. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ब्लाॅकबस्टरने २०१० साली आपली दिवाळखोरी जाहीर केली. २०१९ साली ब्लाॅकबस्टरचं फक्त एकच दुकान शिल्लक राहीलं. दरम्यानच्या काळात त्या छोट्या कंपनीने स्वतःतच काही महत्वपूर्ण बदल केले. २०१२ नंतर मोबाईल अॅपच्या माध्यमातून आॅनलाईन चित्रपट, वेबसिरीजचं प्रसारण सुरु केलं. स्वतःचे चित्रपट ,वेबसिरीजची निर्मीती करायला सुरुवात केली. २०१९ हे तेच साल होतं ज्यावेळी या छोट्या कंपनीची निर्मिती अस...

साहित्य संगीत सिनेमा - २०२०

Image
२०२० या सालाने आनंद दिला असं जर कुणी म्हणालं तर,  त्यावर  कुणाचाच  विश्वास बसणार नाही! सक्तीच्या टाळेबंदीमुळे माझं मात्र कचकावून वाचन, सिनेमे, वेबसिरिज पहाने जेव्हढं या वर्षी झालं आहे ते पुन्हा होणे नाही! या वर्षाची सुरूवात दमदार झाली होती. वीणाताईंच्या घरी मुक्कामी असताना झडलेल्या वाद विवादांनी चांगलीच तरतरी आली होती. पण नंतर पुढच्याच महिन्यात टाळेबंदी सुरू झाली आणि आर्थिक बाबतीत माझं चांगलच कंबरडं मोडलं. शेती आहे म्हणून तगलो अन्यथा ... हा 'अन्यथा' फार अस्वस्थ करतो मला आजही. करोना झालेल्या कित्येक मित्रांचे नातेवाईक गेले, माझेही काही नातेवाईक गेले. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवर एकच कोणती आनंदाची गोष्ट घडली असेल तर ती आहे वाचन, सिनेमे आणि वेबसिरिज पाहणे हे होय!  वाचनाच्या, पाहण्याच्या, लिखाणाच्या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. त्याच आनंदाचा हा धावता धांडोळा. टाळेबंदीत असेल किंवा ती शिथिल झाली त्यावेळी मला कित्येक लोकांनी, मित्रांनी पुस्तके पाठवली त्याबद्दल त्यांच्या ऋणातच मला रहायला आवडेल. यावर्षीचा शेवट तर फार गोड झालाय सातआठ महिन्यापासून अमेरिकेच्या इतिहासा...

सजीव निर्जीवांमधील अद्वैत शोधणारा शास्त्रज्ञ - जगदीशचंद्र बसू

Image
    पॅरिस मध्ये भौतिकशास्त्र तज्ज्ञांची एक परिषद भरलेली होती त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ व्याख्यान देण्यासाठी उभा होता. समोर एक प्रसिद्ध शरीरशास्त्रज्ञ (फिजिअाॅलाॅजीस्ट) बसलेले होते. ते या भारतीय शास्त्रज्ञाचे व्याख्यान ऐकून अस्वस्थ होत होते. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण तसेच होते. त्या भारतीय शास्त्रज्ञाची मतं जर मान्य केली तर त्यांना स्वतःला त्यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाला केराची टोपली दाखवावी लागणार होती! पण त्यांना त्या व्याख्यानात आपल्या चुका कदाचित उमगल्या असाव्यात. व्याख्यान संपले आणि ते भारतीय शास्त्रज्ञाला म्हणाले की," सुरवातीला मला तुमचे सर्वच मतं चुकीचे वाटत होते. पण भाषण पूर्ण ऐकल्यावर माझं मत बदललं". तर ते  भारतीय शास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बसू व ते दिग्गज शरिरशास्त्रज्ञ होते डाॅ.वाॅलर.    जगदीशचंद्र बसूंचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ रोजी  मैमनसिंग जवळ राणिखल (अत्ताच्या ढाक्या जवळ) झाला. वडील भगवान चंद्र हे ब्रिटिशांच्या सेवेत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. वडील गेल्यानंतर जगदीशचंद्र बसूंचे आर्थिकदृष्ट्या खूप हाल झाले. वडिलांनी घेतलेले सर्व कर्ज एक एक क...

हायपेशिया!

Image
 लोकसत्ता दिवाळी अंक(२०२०) मध्ये अंजली चिपलकट्टींचा हायपेशियावरचा एक लेख वाचला. लेख छानच आहे तो. त्यानंतर लगेचच आलेहांड्रे मिनाबार दिग्दर्शित आणि राचेल वाईझ अभिनित २००९ सालचा Agora (अगोराचा अर्थ होतो लोकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची जागा) हा सिनेमा पाहीला. चौथ्या शतकातील गणिततज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ज्ञ 'हायपेशिया' जिला रोमन-इजिप्शियन ख्रिस्ती लोकांनी आलेक्झांड्रियात मारून टाकले होते. तिच्या जीवनावर आधारीत आधारित हा सिनेमा आहे. हायपेशियाबद्दल मी अच्युत गोडबोले यांच्या गणिती या पुस्तकात थोडं वाचलं होतं. पण त्या पुस्तकातील तपशील फार विस्तृत स्वरूपात नव्हते. चिपलकट्टींनी मात्र त्यांच्या लेखात हायपेशियावर विस्तृत लिहिलंय.       ग्रीक संस्कृतीचे मानवी जीवनावर असंख्य उपकार आहेत. ख्रिस्तपूर्व चारशे ते इ.स.चारशे या आठशे वर्षांच्या छोट्या कालखंडात या संस्कृतीत काय काय विद्वान लोक जन्माला येऊन गेले आहेत!  प्लेटो, साॅक्रेटीस, ॲरिस्टाॅटल, डेमाॅक्रिटस, अपोलोनिअस, युडोक्झस, युक्लिड, पायथागोरस, टाॅलेमी, अर्किमिडीज, अकॅडमस( अकॅडमी हा शब्द ज्याच्या नावावरून आला तो हाच!), आर्कि...

'इन्शाअल्लाह'- मुस्लिमांच्या ताज्या समस्यांवर योग्य भाष्य करु पाहणारी कादंबरी

Image
    हल्ली हिंदू - मुस्लिम हा धार्मिक संघर्ष फार प्रतिक्रियावादी होत चालला आहे. विशेषकरुन सोशल मिडियावर याचं फारच बटबटीत स्वरूप पहायला मिळतं. आरे ला कारे करणे हे नेहमीचंच झालयं आता. पण प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर काम करण्याची किती लोकांची तयारी असते? सर्जनात्मक (constructive), सकारात्मक (positive) काम करण्यासाठी समाजात स्वतःला किती लोक गाडून घेतात? हे प्रश्न जेव्हा अनुत्तरितच राहतात तेव्हा अशा वेळी कोण मार्ग दाखवणार? राजकारणाने कायमस्वरूपी चिघळवत ठेवलेल्या या प्रश्नाकडे डोळसपणे कोण पाहणार ? महाकवी रामधारी सिंह दिनकर यांच्याच शब्द सांगायचे तर दिनकर म्हणतात, "जब जब राजनीति लडखडाई है तब तब साहित्यनेही उसे संभाला है! " दर्जेदार साहित्य हेच अशा प्रश्नांना थेट भिडण्याची क्षमता ठेवते. सध्याच्या काळात मुस्लिम समाजाच्या समोर असलेले काही प्रश्न की ज्यांना अग्रक्रमाने सोडवलं पाहिजे ते म्हणजे ट्रिपल तलाक, मुस्लिम मुलांची शिक्षणं, बुरखा पद्धत, घटस्फोटानंतरची पोटगी आणि साहित्य निर्मितीत पिछाडीवर असलेल्या मुस्लिमांचा टक्का या आणि अशा ज्वलंत विषयांना थेट हात घालणारी कादंबरी म्हणजे राजहंस ...

ब्रायन ॲडम्स

Image
 अंधाराला भेदत आणि कमरेजवळ एक इलेक्ट्रिक गिटार लटकवत स्टेजवर उभ्या केलेल्या एका स्टँड माईकजवळ तो येतो. अंगात एक साधासा टी शर्ट, चापून चोपून बसवलेला केसांचा भांग आणि नुकतीच दाढी केलेला असा एक गोरापान व्यक्ती त्या माईकचा ताबा घेतो. गिटारच्या तारा छेडत तो फक्त त्याच्या एका गाण्याचा मुखड्याची सुरुवात करत म्हणतो I got my ...! आणि स्टेडिअम जे सळसळत्या तरुणाईने खचाखच भरलयं त्यांच्यात या तीन शब्दाने जणू वीजच संचारते. पब्लिक  first real string म्हणत पुढचं सर्व कडवं पुर्ण करतं. हा त्याला फक्त गिटारने साथ देत असतो. ते गाणं म्हणजे ब्रायन ॲडम्सच्या Reckless या अल्बम मधलं  Summer of 69 होय. ब्रायन ॲडम्सचा आज (५ नोव्हेंबर) वाढदिवस. ब्रायन आज वयाच्या एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. सन १९८४ ला रिलीज झालेल्या Reckless अल्बममधल्या summer of 69 या गाण्यावर तरुणाई आजही थिरकते. चार महिण्यात एखादं गाणं विस्मृतीत जाण्याच्या आजच्या या काळात छत्तीस वर्षापूर्वीच्या एका गाण्याच्या जोरावर  लोकांना खिळवून ठेवणं हे इतकं सोपे नाहीये. ते गाणंही तसंच असावं लागतं!  ब्रायनचा summer of 69...

लेखकाची गोष्ट

Image
    भारतीय तत्वज्ञान हे मुख्यतः तीन प्रश्नाचा शोध घेत असते. मी कोण?, मी कोणाचा? आणि मी कोणासाठी?. यातल्या मी कोण या प्रश्नाचे उत्तर हे व्यक्तीसापेक्ष आहे. याच 'मी कोण?' या प्रश्नाचे माझं स्वतःचे उत्तर काय तर, 'मी एक लेखक आहे.'  हे शोधण्याचा लेखक म्हणून केलेला प्रयत्न म्हणजेच विश्राम गुप्तेंच लेखन आत्मचरित्र 'लेखकाची गोष्ट' हे होय.    आत्मचरित्रात त्या व्यक्तिच्या समकालीन आर्थीक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे चित्रणही यायला हवे. केवळ चरित्रनायकाच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तीबद्दलचंच लिखान नको. गुप्तें आपल्या या गोष्टीत या सामाजिक, राजकीय, साहित्यिक पर्यावरणाचा वेधही घेतात व त्यांना आपल्या परीने डिकोड करण्याचाही प्रयत्नही करतात. मराठी साहित्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, मराठी लेखक हे प्रायः कौटुंबिक लिहितात. तसं लिखान करण्यात वाईट असं काहीच नाही परंतु ते लिखान हे अपूर्ण आहे असं समजावं. साहित्य विश्वात जे जे ग्रेट साहित्य लिहिलं गेलं आहे ते ते माणसाला सतत भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालत असते. सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात साहित्य वर्तुळात तसेच राजकीय वर्तुळातही दोन गट ...