Posts

अभिनयातून आत्मशोधाकडे...

Image
 आठ वर्षांची एक गरीब मुलगी. घरी अठरा विसे दारिद्रय़ त्यात जगण्यास अभिशाप ठरावा असा तिचा वर्ण. ती कृष्णवर्णीय आहे. वडील अट्टल दारुडे. पिऊन आल्यावर ते तिच्या आईला इतकं बेदम मारायचे की त्या मारामारीत प्रत्येक वेळी तिच्या आईला जबरी दुखापत व्हायची. या भयंकर गृहकलहाचा त्या कोवळय़ा जीवावर व्हायचा तोच परिणाम झाला. ती दिवस-रात्र त्या भीतीच्या मानसिक दडपणाखाली जगू लागली. तिचं ते वयही असं नव्हतं की तिला नक्की काय झालंय हे कुणाला सांगता यावं. अर्थात कुणाला त्याच्याशी काही देणंघेणंदेखील नव्हतं. हा गृहकलह एकदा तर इतका विकोपाला गेला होता की तिच्या वडिलांनी एका अणकुचीदार काचेनं तिच्या आईवर हल्ला केला व तिच्या आईच्या डोळय़ाच्या खाली जेव्हा ती काच घुसली तेव्हा रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि ती या मुलीच्या अंगावर पडली. आई-वडिलांच्या या भांडणात पडण्याची तिची हिंमत होत नसे. भीतीच इतकी वाटायची तिला की बास. पण चिळकांडी अंगावर उडाली तेव्हा मात्र तिच्यातील भीतीने परमोच्च बिंदू गाठला होता आणि त्यात ती मोठय़ांदा किंचाळत एकच शब्द बोलू शकली, ‘‘थांबा! बास झालं..’’ हे झालं फक्त घरातलं. घराबाहेर शाळेत तरी ती सुरक्...

युद्धखोर अमेरिका ते युद्धखोर इस्राईल व्हाया युद्धखोर युरोप

Image
  जगात 'आपण' आणि 'ते',ते म्हणजे अमेरिका आणि आपण म्हणजे इतर देश या व्यतिरिक्त तिसरे जग म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे आखाती देश होय.  विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा वाळवंटी प्रदेशातल्या या अरबी वाळूखाली खनिज तेलाचे साठे आहेत याचा शोध लागला तेव्हापासून ही वाळू भयंकर तापू लागली. टोळ्यांमध्ये राहणाऱ्या या अरबांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आपल्या जमिनीत सापडणारे हेच तेल आपल्याच माणसांना जाळणाऱ्या आगीत तेल ओतण्याची भूमिका पार पाडेल म्हणून? आपण नेहमी नव्वदोत्तर आर्थिक उदारीकरणाच्या गप्पा मारत असतो. पण सन २००० नंतर तेलासाठी, शस्त्रास्त्रे विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देशांनी केलेल्या नृशंस हत्याकांडा मुळे हीच अरबी वाळू अक्षरशः रक्ताने लाल झाली आहे. याला कोणताही आखाती देश अपवाद नाही. आखाती देशात पाश्चात्य देशांच्या भूराजकारणाने माजवलेला हा युद्धकहर नेमक्या शब्दात टिपला आहेत सुप्रसिद्ध जर्मन लेखक डॉ. मिशाएल ल्यूडर्स यांनी. डॉ. ल्यूडर्स हे जर्मनीतील ख्यातनाम राजनीतिज्ञ, जर्मन सरकारचे राजकीय आणि आर्थिक सल्लागार, अरब आणि इस्लाम विषयाचे ...

उषा प्रियंवदा यांच्या कादंबऱ्यांमधील स्त्री

Image
 पंचायत सिझन -२ पाहिली असेल तर त्यात रघुवीर यादव म्हणजेच पंचायत चे प्रधानजी यांच्यावर चित्रित केलेल्या एका दृष्यामधला हा खालील फोटो सर्वांनी पाहिला असेलच. तर, प्रधानजींच्या हातात आहे हिन्दी मधील जेष्ठ लेखिका उषा प्रियंवदा यांची "पचपन खंबे लाल दीवारें" ही कादंबरी. गेल्या वर्षी उषा प्रियंवदा यांच्या बऱ्याच कथा ऐकल्या होत्या. त्यांच्या कादंबऱ्याही वाचायला सुरुवात करायची होती पण, नोव्हेंबर २०२१च्या शेवटी मन्नू भंडांरींचे निधन झाले. मन्नूजींची पुस्तके पुन्हा वाचण्यात गर्क झाल्याने उषाजींना वाचायचं राहून गेलं होतं. 'पंचायत' मुळे ते पुन्हा उफाळून आलं.  उषाजींच्या "पचपन खंबे लाल दीवारे" आणि "रुकोगी नहीं राधीका?" या दोन्ही कादंबऱ्या ऐकल्या. त्यातली 'पचपन खंबे...' ही खूपच आवडली. "रुकोगी नहीं राधीका?" या कादंबरीचा मला शेंडा बुडूख असं काहीच हाती लागलं नाही. 'रुकोगी नही..' मधीली राधीका असेल किंवा 'पचपन खंबे...' मधली सुषमा, ही जी या दोन्ही कादंबऱ्यांमधली मुख्य स्त्री पात्र आहेत ती उत्तम शिकलेली आहेत. या दोघी स्वतःची मतं स्वत...

एक अप्रतिम शालेय विज्ञान पुस्तक.

Image
मार्च-२०१९ माझ्या मोठ्या बंधूंचे सासरे श्री अनंत शास्त्री लावर हे त्यांच्या एका मठाच्या पौरोहित्याच्या कामासाठी मेलबर्न ला गेले होते. त्यांना आम्ही सगळे अण्णाच्या म्हणतो. अण्णा तिकडून निघण्याच्या काही दिवस आधी मी त्यांना म्हणालो की येताना माझ्यासाठी  मेलबर्न मधले इयत्ता नववी व दहावीचे विज्ञान व गणितची क्रमिक पुस्तके घेऊन याल का? त्यांनी स्वतःचे काही सामान सोडून माझी ही तीन चार पुस्तके आणली ज्याचे वजन जवळजवळ ४-५ किलो तर सहज असेल. एकूण किंमतही साधारण ४५ आॅस्ट्रेलिअन डाॅलर इतकी झाली होती. ही पुस्तके माझ्यासाठी  घेऊन आल्याबद्दल अण्णांचे आभार मानतो.      तर सांगायचा मुद्दा हा की गेल्या दोन एक महिन्यापासून मी वेगवेगळ्या देशातील इयत्ता दहावीच्या गणित, विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास करत आहेत. वेगवेगळ्या देशात या वयोगटातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान हे विषय कसे शिकवले जातात? मला या गोष्टीचे खूप कुतूहल आहे. हे मेलबर्नचे इयत्ता दहावीचे विज्ञानाचे पुस्तक वाचताना मी विशेष आनंद झाला. आनंद यासाठी की या किशोरवयात असाही डिझाईन केलेला अभ्यासक्रम शिकवता येऊ शकतो. पहिल्या प्रकरण...

बदलाचा प्रवास

Image
 अमेरिकन जमिनीला वर्णसंघर्ष काही नवा नाहीये. सिव्हिल वॉरच्याही अगोदर पासून ते काल परवाच्या ब्लॅक लिव्ह्ज मॅटर वाल्या जॉर्ज फ्लाॅईड पर्यंतचा या चळवळीचा हा असा मोठा इतिहास आहे. या अमानवीय गोष्टींमध्ये झालेल्या मोठ्या बदलाची सुद्धा अमेरिकन माती साक्षीदार आहे. कित्येक गावे, शहरं या बदलाचे साक्षीदार म्हणून तो इतिहास आजही आपल्याला सांगू पाहत आहे. गेल्या चाळीस पन्नास वर्षांपूर्वीही हा वर्णसंघर्ष तितकाच टोकदार होता. हा वर्णसंघर्ष विज्ञानाची पंढरी समजल्या जाणाऱ्या नासा सारख्या संस्थेलाही चुकला नाही. अमेरिकेचा जॅकसन भाग असो वा दूरहॅम (नाॅर्थ कॅरोलीना) असो सगळीकडे कृष्णवर्णीय लोकांनी उपेक्षा, अवहेलना सहन केली आहे. श्वेतवर्णीय लोक आपल्याला माणसं म्हणून सुद्धा मोजत नाही. तिरस्काराची वागणूक तर पदोपदी देतात. कॅथरीन स्टॉकेट या लेखिकेची 'द हेल्प' नावाची कादंबरी वाचल्यावर लक्षात येतं की, अमेरिकेतील जॅकसन भागात घरकाम करणाऱ्या कृष्णवर्णीय मोलकरणीं साठी श्वेतवर्णीय लोक वेगळा संडास बांधत असत. 'रेस' नावाचा सिनेमा पाहिल्यावर लक्षात येतं की, एखाद्या खेळाडूने देशासाठी ऑलिम्पिक पदक जरी जिंकलं असल...

टोकदार तत्वज्ञ!

Image
 आज (१८ मे २०२२) थोर ब्रिटिश तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांची शतकोत्तर सुवर्ण (१५० वी) जयंती. त्यांच्या कार्याचा धावता आढावा घ्यावा म्हणून हा लेख. बर्ट्रांड रसेलचे रसेल हे घराणे इंग्लंडमधील एक सुप्रसिद्ध असे खानदानी घराण्यांपैकी एक आहे. या रसेल घराण्याने इंग्लंडला कित्येक मुत्सद्दी पुरवले. बर्ट्रांड रसेल यांचे आजोबा लॉर्ड रसेल हे लिबरल पक्षातर्फे इंग्लंडचे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत. बर्ट्रांड रसेल यांचे वडील एक मुक्त चिंतक होते. त्यांनी आपल्या मुलांवर पाश्चिमात्य वंशपरंपरेने आलेल्या ईश्वरशास्त्राचा बोजा लादला नाही. बर्ट्रांड रसेल वंशपरंपरा नाकारतो. म्हणूनच रसेल यांनी आपल्या नावामागे कधीही 'लाॅर्ड' हे नामाभिधान लावले नाही. महायुद्धाच्या विरोधात स्पष्ट, रोखठोक भूमिका घेतल्यामुळे त्यांची केंब्रिज मधून हकालपट्टी करण्यात आली. युद्ध विरोधामुळे रसेलला आपल्याच मायदेशी इंग्लंडात सामान्यांपासून ते राजकारणी, विचारवंतांपर्यंत सर्वांच्याच रोषाला सामोरे जावे लागले होते. तर्कशास्त्राच्या गुणांवर त्यांनी फार जोर दिला होता. गणिताला त्यांनी आपला देव मानलं होतं. 'माझ्याविषयी विचाराल तर गणिता शिव...

कृष्णविवरांच्या प्रतिमा

Image
 कृष्णविवरे (Black Holes) च्या प्रतिमा मिळवण्यात शास्त्रज्ञांना जे यश मिळाले आहे, ही गोष्ट खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. हे यश सेलेब्रेट व्हायला हवं खरतर. या कृष्णविवरांचे वस्तुमान (मास) सुर्यापेक्षा चार दशलक्षाहून अधिक आहे. तीन वर्षापूर्वी कृष्णविवरांच्या मिळालेल्या प्रतिमांपेक्षा गुरूवारी(१२/मे/२०२२) रोजी मिळालेल्या प्रतिमा ह्या अधिक सुस्पष्ट आहे. गुरूवारी मिळालेल्या प्रतिमा ज्या कृष्णविवराच्या आहेत त्याचे नाव Sagittarius A* असे आहे. हे 'मिल्की वे' या आकाशगंगेतील कृष्णविवर आहे. मिल्की वे म्हणजे आपण ज्या आकाशगंगेत राहतो ती. हे कृष्णविवर मिल्की वे च्या एकदम मधोमध आहे, ज्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे जवळजवळ २७,००० प्रकाशवर्ष इतके दूर आहे. प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एक एकक आहे. म्हणजे प्रकाश एका वर्षात किती अंतर कापतो ते अंतर म्हणजे प्रकाशवर्षे. प्रकाशाचा वेग आहे तीन लाख कि.मी. एका सेकंदाला. यावरून हे कृष्णविवर आपल्यापासून किती दूर आहे याचा थोडासा अंदाज येईल.         मुळात कृष्णविवरांना इतके महत्व देण्याची गरज काय?  याचे सगळ्यात महत्वाचे ...

चरित्रलेखनाची वीण गुंफणाऱ्या वीणाताई

Image
 प्रिय वीणाताई,  सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि नमस्कार. गेल्या दशकभरातली माझी सगळ्यात मोठी कमाई जर काही असेल तर ती म्हणजे तुमचा मला मिळालेला स्नेह. फार थोडे लेखक मी असे पाहिले आहेत जे मला जसे त्यांच्या पुस्तकात, व्यासपीठावर पहायला मिळाले अगदी तसेच ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातही आहेत त्यात तुमचा क्रमांक वरचा. हा कमालीचा प्रामाणिकपणा मला तुमच्यात दिसतो. आज तुम्ही वयाच्या ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहात. अशा वेळी तुमच्यातल्या गुणांविषयी चार शब्द लिहून तुमची कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. मराठी साहित्य विश्वात नावापुढे 'कार' लागणाऱ्या बहुतेक तुम्ही एकमेव लेखिका असाव्यात. 'एक होता कार्व्हर' लिहिल्यामुळे तुम्ही 'कार्व्हरकार' झालात. वाचकांचं इतकं प्रेम तुम्ही कामावलेलं आहे. मराठी वाचकांना अनोळखी असणारे जवळजवळ डझनभर चरित्रे तुम्ही लिहिली आहेत. गेल्या चाळीस वर्षात कार्व्हरने हजारो - लाखो लोकांना जगण्याची प्रेरणा, उमेद दिली आहे. लीझ माइटनर, रोझलिंड फ्रँकलीन, सारखी स्री संशोधकांची चरित्र वाचून कित्येक तरूण मुलींना उमेदवारीच्या काळात प्रेरणा मिळाली. त्याचं...

The Dropout

Image
फिलिस गार्डनर:- "तुला माहीत नसेल तर सांगते. वर्षानुवर्षे संघर्ष करत, रक्त आटवलं तेव्हा कुठे आज मुलींना, स्रियांना शिक्षणाचे दरवाजे उघडले आहेत. आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. तू चुकीच्या मार्गाने जात आहेस. आणि तुझ्या ह्या चुकीची किंमत कॅलिफोर्नियातील हजारो मुलींना भविष्यात चुकती करावी लागेल. फार संघर्ष केल्यानंतर हे दिवस आलेत, नास करु नकोस त्याचा." एलिझाबेथ :- "स्टीव्ह जाॅब्ज, बील गेट्स हे याच स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे Dropout विद्यार्थी होते. मला माझ्या जवळच्या लोकांनी सांगितलं आहे की मी अशीच ब्रिलिअंट आहे."  फिलिस गार्डनर:- "ब्रिलिअंट? तुला माहीत नाहीये का, माझ्या अवतीभोवती नोबेल लाॅरेट्स आहेत ते!"  अशा कठोरपणे नीतिमूल्ये जोपासणाऱ्या या प्रा. गार्डनर बाईंनी समजावून सांगितलं तरी त्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीच्या डोक्यात काही केल्या प्रकाश पडेना. कारण तिला एका वेडाने झपाटलेलं होतं. जगातील सर्वात कमी वयात अब्जाधीश होणं हे तिचं वेड. स्टॅनफोर्ड विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या या मुलीला या वेडाने इतकं झपाटून टाकलं की तिला अब्जाधीश होण्य...

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

Image
एकदा का चैत्र महिना सुरु झाला की गावागावात प्रत्येकाला चाहूल लागते ती आपल्या गावातील ग्रामदेवतांच्या यात्रेची. चैत्रात झाडांना जशी नवी पालवी फुटते तसेच मरगळलेल्या मनाला उत्साहाची पालवी फुटते ती या यात्रा उत्सवांमधून. दिवसेंदिवस काबाडकष्ट करून जेरीस आलेल्या शरीराला थोडा विसावा आणि कंटाळलेल्या मनानेही पुन्हा उत्साहाची भरारी घ्यावी हाच तर मूळ उद्देश असतो आपल्या सण उत्सवाच्या मागे. त्याला थोडे धार्मिक अधिष्ठान दिले जाते/गेले आहे इतकचं. पण या गावोगावच्या यात्रा, वेगवेगळे उत्सव हे चैत्र महिन्यानंतरच का येत असावे बरं ? या प्रश्नाचे उत्तर आपल्या कृषि संस्कृतीशी संबंधित आहे. चैत्रापर्यंत रब्बीचे पिकं काढून झालेले असतात. शेतकऱ्यांच्या गाठीशी थोडासा पैसाही आलेला असतो. उन्हाळा सुरु झाल्यामुळे शेतीची कामेही थोडी मंदावलेली असतात. आजकाल या काळात मुलांच्या परीक्षा देखील जवळजवळ संपलेल्या असतात. पण हे परीक्षांचे कारण झालं आजचं. या रिकाम्यावेळेत करायचे काय ? खाली मन शैतानका घर होता है असं जे म्हटलं जातं ते आपलं मन तसं सैतानी होऊ नये त्यासाठी त्या मनाला कुठेतरी चांगल्या कामात गुंतवावे लागेल. आता ते मन गु...

बदलत्या हवामानाचे आख्यान

Image
  साठ-सत्तरच्या दशकानंतर जगाच्या विचाराचा लंबक हा अति उपयुक्ततावाद तसेच भोगवादाकडे झुकलेला दिसतो आहे. गेल्या दोन-तीन दशकात झालेल्या आर्थिक उदारीकरणाने, माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे, साधनांच्या सहज उपलब्धतेमुळे मानवाकडून सातत्याने पृथ्वीला ओरबाडणे सुरूच आहे. पृथ्वी या शब्दाचा 'धैर्यशील' असाही एक अर्थ आहे. पण मानवाच्या औद्योगिक, व्यापार, दळणवळणामुळे प्रदूषण (जल, वायू, ध्वनी)कमालीच्या गतीने वाढत आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या जीवघेण्या प्रदूषणाबद्दल राजकीय नेत्यांची समज अतिशय तोकडी आहे. सर्वसामान्य नागरिकांना या समस्येचे गांभीर्य त्यांना सहज समजेल अशा सोप्या शब्दात कोणी सांगत नाही. या कारणांमुळे प्रदूषणाबद्दल ज्या गांभीर्याने जनचळवळ जगभर उभी राहायला हवी आहे तिला मर्यादा येत आहेत. पर्यावरणाच्या या धोक्याच्या घंटेचा हा घंटानाद मराठी भाषिकांना समजावण्याचा प्रयत्न गेल्या तीन दशकांपासून अतुल देऊळगावकर करत आहेत. हवामान बदल, पर्यावरण, निसर्ग, जैवविविधता या विषयावर सातत्यपूर्ण व अभ्यासू लिखाण ते करत आहेत आलेले आहेत. त्यांचं ताजं पुस्तक म्हणजे 'पृथ्वीचे आख्यान' हे राजहंस प्र...

ढगातून पडलेली मुलगी!

Image
   वेळ होती १९७१ च्या ख्रिसमसच्या आदल्या दिवशीची. त्यावेळी युलियाना कपके (Juliane Koepeke) ही सतरा वर्षाची एक तरुण मुलगी होती. आपल्या आईसोबत तिने पेरूची राजधानी लिमा इथून पुकाल्यासाठी फ्लाईट पकडली होती. त्यांचं शेवटचं गंतव्यस्थान होतं पेंगुआना. पेंगुआनाचं स्थान हे ॲमेझॉन च्या घनदाट जंगलाच्या पोटात आहे. जिथे एक जैविक संशोधन केंद्र देखील आहे. युलियानाची आई ही त्या केंद्रात गेल्या तीन वर्षापासून काम करत होती. युलियानाची आई मारिया आणि तिचे वडील हॅन्स विल्यम कपके हे दोघेही प्राणी शास्त्रज्ञ. लहानपणापासूनच युलियानावर आईवडिलांमुळे प्राणीशास्त्राचे चांगले संस्कार झालेले होते. जणू प्राणीशास्त्र हे त्यांच्या रक्तातच होतं. युलियानाला कधी स्वप्नातही वाटलं नसेल की आपलं हेच प्राणिशास्त्रातलं ज्ञान पुढे आपला जीव वाचवण्यास कामी येणार आहे ते! युलियाना आणि तिची आई मारिया या दोघी विमानात बसल्या आणि काही वेळाने लाॅकहीड -L- 188A या विमानाने हवेत झेप घेतली. उड्डाण होऊन अवघे पंचवीस मिनिटंही झाली नसतील, जेव्हा विमान पेंगुआनामधील ॲमेझाॅनच्या घनदाट जंगलावरून उडत असताना अचानकपणे उठलेल्या एका चक्रीवादळाच...

Totalitarianism ची भाष्यकार हॅना अॅरेंट

Image
 ज्यूंचा खातमा करण्याच्या मोहिमेत जवळजवळ साठ लाख लोक प्राणाला मुकले. त्यातल्या पन्नास लाख ज्यू एकट्या अॅडाॅल्फ आइकमन (चित्रपटात उच्चार आहे 'आइशमान') याने मारले होते. हिटलरनेच आइकमनला गेस्टोपोंच्या ज्यू विभागाचा प्रमुख केलं होतं. जर्मनी, झेकोस्लोव्हाकिया, नेदरलँड, हंगेरी, ग्रीस, फ्रान्स, प.रशिया या ठिकठिकाणाहून ज्यूंना पकड्यात आले होते. आॅस्ट्रीयाच्या आॅश्वित्समध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका छावणीत विषारी वायूने एका वेळी पंधरा हजार लोक मारले जात असे. पुढे दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. इस्रायली गुप्तहेर संघटना 'मोसाद' चा प्रमुख इसर हॅरल यांना  आइकमनचा सुगावा लागला. हॅरल ने खात्री करुन घेतली की तो आइकमनच आहे का म्हणून. हॅरल यांनी ही माहिती इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियाॅन यांना कळवली. गुरियाॅन यांनी आइकमनला पकडायला सांगितले. आइकमन पकडला गेला खरा पण ते अर्जेटिना मध्ये. आइकमनला अर्जेटिना मधून गुपचूप इस्रायल मध्ये आणलं गेलं आणि त्याच्यावर जेरुसलेम मध्ये खटला भरला गेला. या खटल्याच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी 'द न्यू याॅर्कर' या अमेरिकन वृत्तपत्रातर्फे एक जर्मन ...