Posts

औकात दाखवणारं आयुष्य!

Image
  काही लोकांचं खरं हे इतकं खरं असतं की ते आपल्याला अक्षरशः खोटं वाटतं. आपण जे वाचत आहोत ते घडणं जणू काही अशक्यच आहे असंही वाटून जातं. हे असं वाटण्याचे कारण म्हणजे सिनेमा जगतातील एखाद्या यशस्वी अभिनेत्याने आपल्या कुकर्माची, पापाची इतकी जाहीर कबुली दिलेली माझ्यातरी वाचनात आलेली नाही. मी नुकतच अभिनेते पियुष मिश्रा यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी 'तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा' हे वाचली. सिनेमा जगत हे जरी जादुई असलं आणि पडद्यावर तीन तास मनोरंजन करत आपलं वास्तव जग विसरून एका आभासी दुनियेची सफर घडवत असलं तरी, पडद्यावर ते साकारीत करणाऱ्या अभिनेत्याचे वास्तविक आयुष्य हे इतकं स्ख़लनशील होतं हे पचवणं फार जड जातं. आयुष्याची ही अशी पार्श्वभूमी असताना आपल्याला पुन्हा चांगलं जगता येतं हा आत्मविश्वास काही लोक आपल्यामध्ये भरतात. पियुष मिश्रा हे त्यातलंच एक नाव!        पियुष यांचा जन्म ग्वाल्हेर मध्ये १९६३ साली झाला. कलेची प्रतिभा घेऊन जन्मलेले पियुष यांना लहानपणापासून काही वेगळं करण्याची तहान होती. पण वेगळं करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे समजण्याचं ते वयही ...

मातीगारी

Image
    आफ्रिकी साहित्य विश्वातील एक मोठं प्रस्थ म्हणजे गुगी वा थियांगो. थियांगो हे मूळचे केनिया या देशातील. थियांगो यांचे आपली मातृभाषा गिकुयू आणि इंग्रजीवरही प्रचंड प्रभुत्व आहे. सुरुवातीच्या चार कादंबऱ्या त्यांनी इंग्रजीत लिहिल्या. 'नागहिका दिंदा' हे नाटक लिहिल्यामुळे थियांगो यांना कैदेत ठेवले गेले होते. कैदेत असताना त्यांनी निर्णय घेतला की आपण कादंबरी ही आपल्या मातृभाषा गिकुयूतच लिहायला हवी. कैदेत लिहिण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करुन देत नसल्यामुळे त्यांनी आपली कादंबरी ही अक्षरशः टाॅयलेट पेपरवर लिहिली. पुढे त्यांनी आपल्या साहित्यिक अभिव्यक्ती साठी गिकुयूच कायम ठेवली. थियांगो यांची 'मातीगारी' ही कादंबरी सर्वप्रथम गिकुयू भाषेत १९८६ साली प्रकाशित झाली. माराठीत त्याचा नुकताच अनुवाद प्रसिद्ध केला आहे मैत्री प्रकाशनाने. तर अनुवाद केला आहे नितिन साळुंखे यांनी.      या कादंबरीच्या कथानकाला केनियातील तत्कालीन राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी आहे. केनियात सत्तर ऐंशीच्या दशकात प्रचंड राजकीय अनागोंदी होती. नावाला लोकशाही पण प्रत्यक्षात हुकूमशाहीच तिथे राज्य करत होती. अशा राजकीय...

Scoop

Image
    जिग्ना व्होरा या गुन्हेगारी जगाच्या वार्ताहर. त्यांच्या 'बिहाइंड बार्स इन भायखळा' या पुस्तकावर आधारित व हंसल मेहता दिग्दर्शीत वेब सिरिज म्हणजे स्कूप. इतर वृत्तपत्रांना मिळण्यापूर्वी एखाद्या वृत्तपत्राला मिळालेली व त्याने प्रसिद्ध केलेली बातमी म्हणजे स्कूप. करिष्मा तन्ना या टिव्ही मालिका कराणाऱ्या अभिनेत्रीला स्कूप मध्ये जिग्नांची भूमिका साकार करण्याची चांगली संधी मिळाली आहे. त्या भूमिकेला पडद्यावर न्याय देण्यात ती मोठ्या प्रमणात यशस्वी ठरली आहे. जिग्ना ह्या 'एशियन एज' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या गुन्हेगारी जगताच्या वार्ताहर होत्या. 'मुंबई मिरर', 'मिड डे', 'फ्री प्रेस जर्नल' आणि 'एशियन एज' ही वर्तमानपत्रे आपला व्यवसाय वाढवणे, तसेच 'सर्वात आधी आपणच बातमी मिळवली/ छापली' या साठी या वर्तमानपत्रांची सुरु असलेली घाणेरडी चढाओढ या वेबमालिकेत पाहताना आपण फार अस्वस्थ होतो. सनसनाटी बातम्या मिळवायच्या. का मिळवायच्या ? तर, वर्तमानपत्राचा खप वाढवण्यासाठी. पत्रकारांनाही आपण किती डॅशिंग आहोत, आपली कशी वरवर पर्यंत 'पोहोच' आहे हे दाखवण्...

गृहभंग

Image
      डॉ.एस.एल.भैरप्पा यांची मराठी वाचकांना आज वेगळी स्वतंत्र अशी ओळख करून देण्याची काही एक आवश्यकता नाही. गेल्या तीन चार दशकांहून अधिक काळापासून मराठी वाचकांचा भैरप्पांच्या पुस्तकांशी परिचय आहे. भैरप्पांची मराठीमध्ये मोठी ओळख निर्माण करून देण्यामध्ये त्यांच्या पुस्तकांच्या अनुवादिका उमा कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे. उत्तम अनुवाद कसा असावा? यासंबंधीचे माझे साधे सोपे निकष आहेत. अनुवाद वाचत असताना आपण सतत अडखळतोय असं होता कामा नये. एखादं वाक्य वाचलं असता पुढचा संदर्भ लागण्यासाठी ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडू नये. गृहभंग या निकषावर अतिशय खरी उतरते. उमाताईंनी भैरप्पा यांची गेल्या वर्षी मराठीत अनुवादीत केली गेलेली कादंबरी म्हणजेच 'गृहभंग' ही होय. मला खूप आवडली ही कादंबरी.            'गृहभंग' चं कथानक घडतं ते १९२० - १९४५ या दरम्यान कर्नाटकातील 'रामसंद्र' या छोट्याशा गावात. ही गोष्ट आहे नंजम्मा ह्या कानडी ब्राम्हण स्त्रीची. या कादंबरीत वरील कालखंडात एकूण भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचं स्थान काय होतं हे वाचणं फार फार वेदनादायी आहे. नंजम्मा ...

डिजिटल किमानतावाद

Image
  डीप वर्क या दणदणीत खपाच्या पुस्तकानंतर लेखक कॅल न्यूपोर्ट यांचं ताजं पुस्तक म्हणजे 'डिजिटल मिनिमलिझम' हे होय. डिजिटल क्रांतीनंतर आणि समाज माध्यमांच्या विस्फोटानंतर मानवी एकाग्रतेची कधी नव्हे ती इतकी शकले उडाली आहेत. समाज माध्यमांचे व्यावसायिक प्रारूप हेच मुळात 'दिखावे की दुनिया' यावर आधारित आहे. अशा या काळात उपभोक्तावाद या वादाने जगातील सर्व वादांवर मात केली आहे. समाज माध्यमांवर सतत क्रियाशील असल्याने मी त्यावर नियमितपणे काही ना काही कृती (activity) केलीच पाहिजे हे एक मोठं अनामिक दडपण आपल्यावर पडत असतं. या क्रियाशीलतेचा सेलेब्रिटी वर्ग सोडल्यास इतरांना तसा आर्थिक फायदा काहीच नसतो. मात्र समाज माध्यमांवर वेळ घालवल्यामुळे त्यांचा मात्र चांगलाच आर्थिक फायदा होतो. आता प्रश्न आहे आपला की आपण त्यांच्या जाळ्यात किती अडकायचं? किती वाहत जायचं? फेसबुक मित्रयादीतलं कुणीतरी हाॅटेल मध्ये जेवायला गेल्याचे, फिरायला गेल्याचे, ट्रेकिंगला गेल्याचे फोटो टाकतं त्यामुळे आपणही अशा आनंदापासून वंचित रहायला नको म्हणून आपल्यालाही तसं करावं वाटतं. हा जो दबाव समाज माध्यमं आपल्यावर सतत टाकत आहेत य...

समलैंगिक पालकत्वाची गुंतागुंत

Image
स्पॅनिश कवयित्री इव्हा बाल्तसार यांची 'बोल्डर' ही गेल्या वर्षी इंग्रजीत अनुवादित झालेली कादंबरीका. या कादंबरीकेचा स्पॅनिश मधून इंग्रजीत अनुवाद केला आहे जुलिया सॅन्से यांनी. या कादंबरीची बुकर इंटरनॅशनल प्राईज २०२३ च्या दीर्घ यादीत(आता लघू यादीतही) निवड झाली आहे. त्यांची पहिली कादंबरी 'परमाफ्राॅस्ट' हिची भाषा जरी स्पष्ट आणि उपरोधीत असली तरी त्यापेक्षाही काकणभर जास्त धीट भाषेचा वापर 'बोल्डर' ह्या कादंबरीकेत केलेला आहे. 'बोल्डर' ही एका समलैंगिक पालकांची गोष्ट आहे. समलैंगिक संबंधाचे एक विचित्र रूप चित्रपट, वेब मालिका मधून आपल्यासमोर उभी केलं गेलं आहे. समलैंगिक जोडपं म्हटलं की ते जणू दिवसभर प्रणयधुंद असतात की काय असच दाखवलं जातं. त्यांनाही पोट-पाणी आहे, त्यासाठी त्यांनाही कामधंदा करावा लागतो. सांसारिक जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर असते. त्यांनाही पालक व्हावसं वाटतं. 'बोल्डर'ची भाषा अत्यंत धीट, सडेतोड तर काही ठिकाणी शिवराळ आहे. 'बोल्डर' ही एक बावीशीतली भटकी (नॉर्मेडीक) तरुणी आहे. व्यवसायाने ती एक उत्तम आचारी आहे. 'बोल्डर'ची समसा नावाच्य...

एलिझाबेथ

Image
 १५४७ मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सहावा एडवर्ड याला अगदी थोड्या काळासाठी राज्योपभोग घेता आला. त्याच्यानंतर त्याची जेष्ठ कन्या मेरी ही सिंहासनावर आरूढ झाली होती. मेरी ही कट्टर कॅथलिक असते. तिला एका मोठ्या व्याधीने त्रस्त केलेले असते. मेरीच्या मृत्यूनंतर तिची प्रोटेस्टंट असलेली सावत्र बहीण एलिझाबेथ ही राज्यावर येते. हीच ती इंग्लंडच्या सुवर्णयुगाची विधाती म्हणून इतिहासात ख्यातनाम असलेली पहिली एलिझाबेथ राणी. शेखर कपूर यांचा एलिझाबेथ (१९९८) हा ब्रिटिश सिनेमा या राणीची कारकीर्द दर्शवतो. राज्यावर आल्यानंतर एलिझाबेथने आपल्या बाह्य व अंतर्गत शत्रूंना दूर करून आपलं आसन कशाप्रकारे सदा सर्वकाळासाठी बळकट केलं याची एक उत्कंठावर्धक कहाणी म्हणजेच 'एलिझाबेथ'        या सिनेमाची सुरुवात ज्या दृश्याने होते त्यात तीन प्रोटेस्टंट पंथीय व्यक्तींना (दोन पुरुष व एक स्त्री) एका भर चौकात सरणावर उभे केले जाते. हातपाय करकचून आवळलेले असतात. स्वतःला सोडवण्यासाठीची याचना, ते आजूबाजूच्या त्यांच्या मृत्यूचा तमाशा पाहायला आलेल्यांकडे अगदी जीवाच्या आकांताने करत ...

Spelling Bee

Image
    अमेरिकेत दहा ते पंधरा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना एका स्पर्धेचं प्रचंड आकर्षक असतं अन् ती स्पर्धा म्हणजे 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी.' ही फक्त 'स्पेलिंग बी' म्हणूनही ओळखली जाते. अमेरिकेत सध्या या स्पर्धेत भारतीय वंशाची मुलं, मुली हे प्रचंड यश मिळवत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांना असं वाटत होतं की, "आपल्या कामाला इथे भारतात प्रतिष्ठा नाही किंवा म्हणावा असा वाव मिळत नाही किंवा पैसा मिळत नाही" त्या मंडळींनी भारत सोडून अमेरिकेत स्थाईक होण्याचा धोका पत्करला होता. ह्या पहिल्या पिढीचा काळ हा अमेरिकेत पाय रोवण्यातच गेला. दुसऱ्या पिढीलाही स्थिरस्थावर होण्यात बराच काळ गेला. पण गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून येत असलेल्या तिसऱ्या पिढीला मात्र चांगलेच सुगीचे दिवस आहेत. ह्या पिढीची म्हणजेच नव्वोद्दोत्तर पिढीची मुलं हे मात्र या स्पर्धेत कमालीचं यश मिळवत आहेत. लिंडन जाॅन्सन अमेरिकेचे अध्यक्ष असताना ३ आॅक्टो १९६५ साली त्यांनी एक बील पास केलं ज्याला 'नागरिकत्व कायदा १९६५' असे म्हणतात. या कायद्यात असं म्हटलं होतं की, "ज्यांना अमेरिकेत स्थाईक होण्याची...

फक्र-ए-अफगाण…

Image
अफगाणिस्तान या देशाचा इतिहास पाहता असे दिसते की, हा देश कायमच एक धगधगता अंगार राहीला आहे. आजही अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा मिळवला तेव्हा असे लक्षात वाटते की टोळी युगातून हा देश आजही बाहेर पडला आहे की नाही? पण याच पठाणांच्या देशात एक असा पठाण जन्माला आला होता ज्याने कधीही आपल्या हातात शस्त्र धरले नाही. मुळात ही कल्पनाच डोक्यात उतरत नाही की, एक पठाण गेल्या शतकात ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठं संघटन उभं करतो आणि त्याचा लढण्याचा मार्ग हा मात्र अहिंसा! पण हे खरं आहे की असा एक 'वीर' या मरूभूमीत जन्मला होता. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश म्हणजेच अवाढव्य अशा भारतीय उपखंडाचा इतिहास लिहिताना ज्यांना टाळून पुढे जाणे शक्यच नाही ते नाव म्हणजे खान अब्दुल गफारखान हे होय. बऱ्याच जणांना तर हे नावही ओळखीचं नसेल. स्वातंत्र्याच्या आगोदरची पिढी यांना 'खानसाहेब' किंवा 'बादशहाखान' म्हणत. इंग्रजीत 'फ्रंटिअर गांधी', हिन्दीत 'सीमान्त गांधी', मराठीत 'सरहद्द गांधी' तर अफगाणी लोक त्यांना 'बच्चा खान' म्हणत. पश्तू भाषेत 'बच्चा' शब्दाचा ...

निसर्गविनाश थांबवण्यासाठीची शेवटची हाक!

Image
     आपल्याकडे सर्वसामान्य व्यक्तिंची पर्यावरणाबद्दलची जी समज आहे ती फक्त 'झाडे लावा झाडे जगवा', 'पाणी आडवा पाणी जिरवा' आणि गेला बाजार 'गप्पी मासे पाळा हिवताप टाळा' इथपर्यंतच मर्यादित असते. पर्यावरणाची व्यापकता ही अशा चटकदार घोषवाक्यांपुरती तर अजिबात मर्यादित नाही. तसेच ती व्यापकता केवळ हवा, पाणी, झाडे इथपर्यंत ही मर्यादित नाही. उलट असं म्हणता येईल की, पर्यावरणाच्या अभ्यासाची, संवर्धनाची जी सुरुवात आहे ती मात्र ह्या गोष्टींपासून होते. हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणून आपण वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड ला जबाबदार धरतो. पण शास्त्रीय अभ्यास मात्र असं सांगतो की हवेच्या प्रदूषणास वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचा आठवा क्रमांक लागतो आहे. प्रदूषकांमध्ये प्रथम क्रमांकावर जर कोण असेल तर ती म्हणजे सर्व शहरांमध्ये सगळीकडे सुरू असलेली विविध प्रकारची बांधकामे, त्यातून पसरणारी धूळ. हवामान बदलामुळे मानव जातीचे व जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. निसर्ग विनाशामुळे तरुणाई कधी नव्हे ते आज सर्वात जास्त मानसिक तणा...

साहित्य -सिनेमा - २०२२

Image
  वाचन, लेखन आणि सिनेमा पाहणे या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. यावर्षी वर्षभर ॲग्रोवन मध्ये एक 'मशागत' नावाचं साप्ताहिक सदर लिहिलं. मशागतचा अतिशय चांगला अनुभव आला. यावर्षीची सुरुवातच खूप छान झाली होती. पुणे आकाशवाणीवरील 'साहित्य विश्व' या कार्यक्रमात मराठी पुस्तकांची ओळख करवून देता येत होती. सात आठ मराठी पुस्तकांवर लिहायची संधीही मिळाली. पण पुढे हा कार्यक्रमच पुणे आकाशवाणीने बंद केला. तरी साधना, लोकसत्ता बुकमार्क, कर्तव्य साधना इथे चांगल्या पुस्तकांवर लिहिता आलं याचं समाधान आहेच. या वर्षी (२०२२) 'सिद्धार्थ' या हरमन हेस लिखित नोबेल पारितोषिक विजेत्या कादंबरीला प्रकाशित होण्यास १०० वर्ष पूर्ण होत असल्याने दिल्लीच्या गाॅथे इनस्टिट्यूट, मॅक्समुल्लर भवनाच्या वेबसाइटसाठी सिद्धार्थवर एक लेख लिहिला. जयश्री हरी जोशींमुळे ही संधी मिळाली.    शेती, काॅलेज, क्लासेस, या व्यापातून वाचनासाठी वेळ काढणे ही खरंच मोठी कसरत आहे. २३ जुलै रोजी आजीचे निधन झाले. तसेच २० आॅक्टोबरला गावात झालेल्या ढगफुटीने वाचनात मोठाच खंड पडला. मानधनाच्या बाबतीत मला साधना, लोकसत्ता आणि ॲग्रोवन यां...

कॅमेऱ्याच्या लेन्स मधून जीवन

Image
आपण दिग्दर्शक व्हावं ही जाणीव स्टिव्हन स्पिलबर्ग यांना अगदी लहानपणीच झाली होती जेव्हा, त्यांच्या वडिलांनी (अरनाॅल्ड) स्टिव्हन यांच्या हातात एक कॅमेरा दिला होता. स्टिव्हन लहानपणापासूनच त्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने छोट्या छोट्या फिल्म्स् तयार करु लागले.  रिचर्ड ड्रेफुल (जॉज मधला अभिनेता) म्हणतात की,"जॉजचं शूटिंग सुरू झालं होतं २ मे ला आणि मला ३ मे ला घेतलं. त्यावेळी त्यांच्याकडे ना कोणता शार्क होता ना कोणती पटकथा ना कोणताही अभिनेता/अभिनेत्री होती." स्पीलबर्ग म्हणतात की,"जाॅजच्या पटकथेला कधीच पूर्णविराम दिलेला नव्हता. शूटिंगच्या बारा तास आधीही कधी कधी पटकथेत बदल केले जात असे."  दिग्दर्शक म्हणून हे मला खूप घाबरवणारं असायचं की, "माझ्या हातात आत्ता जी पटकथा आहे ती काल रात्री जी होती ती नाहीये, त्यामुळे रात्री जी पटकथा होती ती सकाळी शूटिंगच्या वेळेस असेलच असं नाही." स्टुडिओत एक मोठं कृत्रिम तळं असताना देखील स्पिलबर्ग यांनी जाॅजचं शूटिंग मात्र प्रत्यक्ष महासागरात केलं. जमिनीवर शूटिंग करणे आणि समुद्रावर शूटिंग करणे यात मोठा फरक असतो. समुद्रावरची आव्हाने ही वेगळी अस...