कृष्णविवरांच्या प्रतिमा
कृष्णविवरे (Black Holes) च्या प्रतिमा मिळवण्यात शास्त्रज्ञांना जे यश मिळाले आहे, ही गोष्ट खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. हे यश सेलेब्रेट व्हायला हवं खरतर. या कृष्णविवरांचे वस्तुमान (मास) सुर्यापेक्षा चार दशलक्षाहून अधिक आहे. तीन वर्षापूर्वी कृष्णविवरांच्या मिळालेल्या प्रतिमांपेक्षा गुरूवारी(१२/मे/२०२२) रोजी मिळालेल्या प्रतिमा ह्या अधिक सुस्पष्ट आहे. गुरूवारी मिळालेल्या प्रतिमा ज्या कृष्णविवराच्या आहेत त्याचे नाव Sagittarius A* असे आहे. हे 'मिल्की वे' या आकाशगंगेतील कृष्णविवर आहे. मिल्की वे म्हणजे आपण ज्या आकाशगंगेत राहतो ती. हे कृष्णविवर मिल्की वे च्या एकदम मधोमध आहे, ज्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे जवळजवळ २७,००० प्रकाशवर्ष इतके दूर आहे. प्रकाशवर्ष हे अंतर मोजण्याचे एक एकक आहे. म्हणजे प्रकाश एका वर्षात किती अंतर कापतो ते अंतर म्हणजे प्रकाशवर्षे. प्रकाशाचा वेग आहे तीन लाख कि.मी. एका सेकंदाला. यावरून हे कृष्णविवर आपल्यापासून किती दूर आहे याचा थोडासा अंदाज येईल. मुळात कृष्णविवरांना इतके महत्व देण्याची गरज काय? याचे सगळ्यात महत्वाचे ...