Posts

सनातन्यांविरुद्ध बंड करणाऱ्या एका मुलीची गोष्ट

Image
 न्यूयॉर्क हे प्रचंड गजबजलेलं, आधुनिक, फॅशन चा झगमगाट असलेलं एक शहर. न्यूयाॅर्क मधील ब्रुकलीन या भागात तसेच युरोपमधल्या काही मोठ्या शहरात 'हासीदी' म्हणून एक कट्टर, कर्मठ, सनातनी ज्यू समुदाय आहे. हासीदी ही ज्यूंची एक उपशाखा आहे. या समुदायाच्या लोकांची दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हाॅलोकाॅस्ट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात कत्तल केली गेली. म्हणून हे लोक जर्मनीतून न्यूयॉर्क मध्ये स्थलांतरित झाले. तिथे स्वतःच्या समुदायाची वेगळी ओळख रहावी म्हणून या लोकांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेला, केशभूषेला अतोनात महत्त्व दिलेलं दिसतं. आजही देतात. पुरूष एक भलामोठा काळा झगा व डोक्यावर मोठ्या आकाराचं पागोटं परिधान करतात. मुली व स्त्रीयांनी घराबाहेर पडताना केसांभवती स्कार्फ गुंडाळलेलाच हवा ही सक्ती असते. पुरुष कानाभोवती कल्यांच्या जवळ आपले केस वेणीसारखे मोठे वाढवतात व ते चेहऱ्यावर रुळू देतात. या समुदायातल्या लोकांना इतराशी बोलायला मनाई असते. त्यांनी आपला समुदाय सोडून इतरांनी बोलणे टाळावे कारण यांना भिती असते की आपल्यातला कुणी  बिघडला तर, वाटला तर...?         यांच्या मुलांना घरा...

इतिहासाला कलाटणी देणारी पन्नास चरित्रे...

Image
मागच्या पंधरवड्यात 'अशोका विद्यापीठ' हा मोठ्या चर्चेचा विषय झाला होता. कारण होतं प्रा. प्रताप भानु मेहता आणि अरविंद सुब्रमण्यम या दोन प्राध्यापकांची केली गेलेली लाजिरवाणी हकालपट्टी. याच अशोका विद्यापीठात राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक असलेले सुनील खिलनानी यांचे 'इन्कार्नेशन - अ हिस्ट्री ऑफ इंडिया इन फिफ्टी लाइव्ह्ज' या पुस्तकाचा सविता दामले यांनी 'यांनी घडवला इतिहास' या नावाने केलेला हा अनुवाद मंजुळ प्रकाशनातर्फे प्रकाशित आहे. भारतीय इतिहासाचा पट हा प्रचंड मोठा आहे. त्यातील निवडक पन्नास व्यक्तींवर लिहिणे हे तसे अवघड काम. इतिहासाला आकार देण्याऱ्या काही व्यक्ती असतात. कित्तेक पुस्तकांना विषय पुरवण्याची ताकद असलेल्या या चरित्रांचा सहा सात पानात आढावा घेणे हे ही तसे अवघडच काम म्हणावे लागेल. पण हे आव्हान व्यवस्थितरित्या पेललं आहे प्राध्यापक खिलनानी यांनी. गौतम बुद्धापासून ते धीरूभाई अंबानी पर्यंत, म्हणजे जवळजवळ अडीच हाजार वर्षांच्या कालखंडाचा आढावा या पुस्तकात घेतला गेलेला आहे. भारत हा असा देश आहे की जिथे एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या कालखंडात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्र...

डाॅक्टर झिवागो

Image
विसाव्या शतकात जगभर गाजलेले दोन सिनेमे कोणते असा प्रश्न पडला तर जी दोन नावे समोर येतात त्यातले एक रिचर्ड अॅटनबरो यांचा 'गांधी' आणि रशियन कवी,कादंबरीकार पास्तरनाक यांच्या कादंबरीवर त्याच नावाने निघालेला सिनेमा  'डाॅ.झिवागो'.       डाॅ.झिवागो व त्यांची पत्नी टोनिया या दोघांची क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक गोष्ट. झीवागो साकारलाय ओमर शरीफ आणि टोनिया साकारली आहे चार्ली चॅप्लिन ची मुलगी जेराल्डिन च‌ॅप्लिन ने. प्रथम या कादंबरीचा सिनेमा करायचा ही योजना होती कार्लो पाॅन्टीची. पण त्याच्या योजनेप्रमाणे जर सिनेमा बनवायचा ठरला तर तो MGM ला फार महागात पडणार होता. शिवाय त्यात सोफिया लाॅरेन्स ला ही घ्यायचे असाही तो विचार करत होता, त्याच्यामुळे बजेट आणखीनच वाढणार होते. हे MGM काही मान्य झाले नाही. त्यांनी या सिनेमाला हँड- ओव्हर केला डेव्हिड लीन कडे. लीन ने राॅबर्ट बोल्ट कडून या सिनेमाची संहिता राजकीय न बनवता ललित बनवावी असे सांगून त्याच्याकडून ती तशी लिहून घेतली. ओमर शरिफ हा यात रशियन वाटावा म्हणून त्याचे गाल उचलावे लागणार होते त्यासाठी त्याचे गाल दोऱ्याने बांधावे लागत...

'अनफर्गेटेबल' - जगजित सिंग

Image
 हे पुस्तक वाचेपर्यंत जगजित सिंग यांच्याबद्दल सर्वसामान्य रसिकाला जेव्हढी माहिती असते; तेवढीच माहिती मला होती. जगजित सिंह यांच्या ज्या काही गजल, चित्रपटातील गाणी आहेत उदा. 'तुम जो इतना मुस्कुरा रहे हो", "होटों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो", "तुमको देखा तो ये खयाल आया" इत्यादी. यापलीकडे माझी काही झेप गेली नाही. जगजित सिंग यांनी गायलेल्या गाणी गजला आपण ऐकल्या पाहिजे हे मला एका पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर जाणवले. लेखिका नीलांबरी जोशी यांचे 'मनकल्लोळ' हे ते पुस्तक.  नीलंबरी मॅडम यांना जगावेसे वाटेना, आत्महत्या करण्याचे विचार त्यांच्या मनात येत होते. त्या म्हणतात की त्यावेळी मी ब्लॅक कॉफीचे मगचे मग रिचवायचे आणि जगजित सिंग यांना ऐकत बसायचे. हे जेव्हा वाचलं त्यावेळी जगजित सिंग यांना ऐकले पाहिजे असं वाटायला लागलं. मागच्या महिन्यात उल्का राऊत यांनी हर्मन हेस या इंग्रजी लेखकाच्या 'सिद्धार्थ' या पुस्तकाचा अनुवाद केल्याची पोस्ट त्यांच्या फेसबुक भिंतीवर टाकली होती. मी ते पुस्तक त्यांच्याकडून मागवलं. सोबत त्यांनी हे 'अनफर्गेटेबल जगजित सिंह' ...

लाहोरचे अंतरंग...

Image
  लाहोर ... रावी नदीकाठी वसलेलं एक ऐतिहासिक शहर. एक असं शहर, की ज्याच्या अस्तित्वाचे दाखले रामायण काळापर्यंत देता येतात. कधीकाळी श्रीरामाचा पुत्र लव याचेही वास्तव्य या ठिकाणी होते म्हणूनच त्याचे नाव लाहोर पडले अशीही एक धारणा आहे. एक असं शहर की ज्याच्या रस्त्यावरून फिरताना कदाचित शहीद-ए-आझम भगतसिंगांनी राम प्रसाद बिस्मिल यांची 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है...' हे तसेच बुल्ले शाह या पंजाबी सुफी तत्वज्ञ कवीच्या कविता उंच रवाने म्हटल्या असतील. लाहोर! एक असं शहर ज्या ठिकाणी मुगल बादशहा औरंगजेब याने आपली प्रिय कन्या झैबुन्नीसा हिला नजर कैदेत ठेवले होते. झैबुन्नीसाने त्याच शहरात कवी साहित्यिकांची गुप्त मंडळे चालवली होती. लाहोरचा हा आणि असाच पुरातन तसेच आधुनिक कालखंडाचा आढावा घेतला आहे पाकिस्तानी लेखक हरून खालीद यांनी. खालीद यांची 'वॉकिंग विथ नानक' आणि 'व्हाईट ट्रेल' यानंतरच 'इमॅजिनिंग लाहोर' हे तिसरे पुस्तक होय. अनाम झकारिया (1971 या पुस्तकाच्या लेखिका) या त्यांच्या मैत्रीणी सोबत पाकिस्तानच्या फाळणीचा अभ्यास करताना खालिद यांचे लाहोर बद्दलचे वाचन वाढू ल...

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा

Image
भारतात इयत्ता बारावी सायन्स झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला विचारा की  IIT-JEE या परिक्षेसाठी 'फिजिक्स' या विषयाच्या तयारी साठी कोणते पुस्तक वापरले? तर तो/ती फक्त एकच नाव घेईल ते म्हणजे 'कन्सेप्ट अाॅफ फिजिक्स बाय एच सी वर्मा'.      तर अशा या अफलातून पुस्तकाचे लेखक हरिश चंद्र वर्मा उर्फ H C Verma यांचा जन्म ३ एप्रिल १९५२ रोजी बिहार मधल्या दरबंगा नावाच्या एका निमशहरी भागात झाला. त्यांचे वडील हे गणिताचे शिक्षक होते. सुरवातीला गणिताचे प्राथमिक शिक्षण हे त्यांनी वडिलांकडेच घेतले. शालेय जीवनात त्यांना फारशी गती नव्हती. जसजसी ते वरच्या इयत्तेत जाऊ लागले तसतसी मग अभ्यासात त्यांची रुची वाढू लागली. आज जर वर्मा सरांच्या कामाचा झपाटा, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहीली तर कुणाचाही विश्वास बसणार नाही की, त्यांना स्वतःला इयत्ता दहावी पर्यत केवळ पास होण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला होता. आपण पास होऊ कि नाही ही भीती सतत मनात घर करून रहायची. अभ्यास, परीक्षेच्या भीतीचे भूत सतत त्यांच्या मानगुटीवर बसलेले असायचे. पण याच मुलाने बी.एस.सी. ला फिजिक्स हा विषय घेउन पटणा विद्यापीठात 3^rd रँ...

निडर अभिनेत्री - मेरील स्ट्रीप

Image
 वेळ होती गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०१८ ची. मेरील स्ट्रीपला 'गोल्डन ग्लोब लाईफ टाईम अचिव्हमेंट' अवाॅर्ड मिळालं होतं. या पुरस्कारासाठी व्हायोला डेव्हीस ही एक अंत्यत गुणी अभिनेत्री कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असते. (Viola Devis चा The Help हा सुदंर सिनेमा आवर्जुन पहा, त्याही पेक्षा The Help ही कॅथरीन स्टाॅकेटची कादंबरी वाचा) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कराताना व्हायोलाने मेरील बद्दल जो काही आदर व्यक्त केला ना आहे तो फार फार आतून आलेला, निकोप, निस्वार्थ असा होता. पिवळ्या रंगाच्या वन आॅफ शोल्डर ड्रेस घातलेली व्हायोला डेव्हिस म्हणते की, "मेरील तुझ्यामुळे मला अभिनेत्री असल्याचा अभिमान वाटतो, तुझ्यामुळे मला हा आत्मविश्वास आला की माझं शरीर, माझं वय, माझा चेहरा हा जसा आहे तसा पुरेसा आहे." व्हायोलाच्या अशा या बोलण्यामुळे प्रेक्षकात बसलेल्या प्रत्येकाला एक असं आनंदाचं भरतं आलेलं आहे हे स्पष्ट दिसतं होतं. गोल्डन ग्लोब पुरस्काराची लिंक       पुरस्काराची औपचारिकता आटोपल्यानंतर मेरील आपलं मत व्यासपीठावरून मांडायला सुरुवात करते. घसा बसलेला असतो तरी ती बोलतेच. या कार्यक्रमाच...

कालजयी दिनकर

Image
             सदियों की ठंडी बुझी राख सुगबुगा उठी,               मिट्टी सोने का ताज पहन इठलाती है,              दो राह, समय के रथ का घर्घर नाद सुनो,              सिंहासन खाली करो की जनता आती है| सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींच्या दडपशाही आणि संपुर्ण देशावर १९७५ सालानंतर तब्बल २१ महिने लादलेल्या आणिबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांचे एक देशव्यापी आंदोलन चालू होते. त्या आंदोलनाच्या यज्ञकुंडातून बाहेर पडणारी अग्निशिखा जनमानसात धगधगती ठेवण्याचे काम ज्या कवितेने केले होते ती कविता म्हणजे 'सिंहासन खालि करो की जनता आती है'.आणि या क्रांतिकारी कवितेचे उद्गाते आहे राष्ट्रकवी 'रामधारी सिंग दिनकर' उर्फ 'दिनकर'.       दिनकर हे आजही हिंदी साहित्यातील एक दिग्गज कवी म्हणून ओळखले जातात. ज्यांची ख्याती 'संसद से लेकर सडक तक, और जिल से लेकर जन-जन तक' अशी होती. दिनकरांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ सिमरिया (मुंगेर) जे आता बिहार मधिल बेगुसराय जिल्हात येते तिथे ...

एक बेगम अशीही...

Image
  भारतीय उपखंडाचे रॅडक्लिफ रेषेमुळे जसे स्पष्ट दोन भाग केले गेले, तितक्या स्पष्टपणे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान व त्यांची पत्नी बेगम राणा या दोहोंचा विलगपणे विचार करणे अवघड आहे. बेगम राणांसारख्या निर्भय, महत्त्वाकांक्षी महिलेचे चित्रण करणे हेही तितकेच आव्हानात्मक. एका नव्याने जन्माला घातलेल्या राष्ट्राचे बाळंतपण करण्यासाठी बेगम राणा यांनी पदर खोचला होता. म्हणूनच त्या ‘मदर ऑफ पाकिस्तान’ म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी त्यांनी आपले दिल्लीतील घर- ज्याची नुसती बागच जवळजवळ तीन एकर एवढी होती- ते सोडले. ज्या घरात त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना (अशरफ आणि अकबर) यांना जन्म दिला होता, ते सोडून एका नव्याने जन्माला आलेल्या देशात कायमचे राहायला गेल्या होत्या. मुळात हा नवीन देश राष्ट्र म्हणून टिकेल की नाही याचीही खात्री नव्हती. हे दिल्लीतले घर फक्त एवढय़ासाठीच महत्त्वाचे आहे का? तर तसे अजिबात नाही. भारतीय मुस्लीम लीग ही याच घरात- ‘८, होल्डिंग रोड’ - वाढली, पोसली गेली. लीगच्या बैठकांवर बैठका या घरात झाल्या, ते मुस्लीम लीगच्या चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. हे सर्व विस्ताराने चित्रि...

'इति-आदि' - दैनंदिन वस्तूंच्या इतिहासाचा अथ: पासून इतिः पर्यंतचा धांडोळा.

Image
  केवळ सनावळ्यांप्रमाणे घडणाऱ्या घटनांचा तपशील देणे म्हणजेच सांस्कृतिक इतिहास लेखन असं नाहीये. सांस्कृतिक इतिहास हा काही केवळ लढाईच्या मैदानतच घडतो असंही नाही. तर तो प्रत्येक पिढ्यांच्या स्वयंपाक घरातही घडून गेलेला असतो. पण अशा इतिहासाची फारशी नोंद न घेणं, त्याचं दस्तऐवजीकरण न करणे हा आपल्या लोकांना लागलेला पूर्वीपासूनचा शापच आहे  जणू. सांस्कृतिक इतिहास लेखन हे किती वेगवेगळ्या अंगाने होऊ शकतं याचा जणू एक नवा मार्गच अरूण टिकेकर आपल्याला दाखवून देत आहेत. दैनंदिन खान्या-पिण्याच्या वस्तू या आपण कधीपासून वापरू लागलो आहोत? त्या वस्तू, खाद्यपदार्थ जर विदेशी असतील तर त्यांना सर्वप्रथम आपल्याकडे कोण घेऊन आलं? कोणत्या मार्गाने त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या, याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणे हा ही एक मोठा बौद्धिक आनंद देणारा भाग असतो. काही खाद्यपदार्थ हे उच्चभ्रू 'अभिजन' लोकांचेच होते. ते 'जनां'चे कसे झाले? उदा. आईस्क्रीम. तर काही खाद्यपदार्थ हे 'जनां'चे होते ते नंतर 'अभिजनां'त कसे रुळले? उदा. सिताफळ.  भारतीय गंधविद्या ही देखील किती विकसित होती हे ही या पुस्तका...

वैदिक

Image
 ' ऋषति-गच्छति संसारपारं इति ऋषि:' मानवमात्राचे इह तसेच पारलौकीक कल्याण बघण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे ते ऋषी. लोकांना एक विशिष्ट जीवनदृष्टी देणारा एक उन्नत जीव म्हणजे ऋषी. भारतीय संस्कृतीरूपी वृक्ष ज्या खतावर वाढला, पोसला, विस्तारला ती संस्था म्हणजे ऋषीमंडळ. हजारो वर्षांपासून भारतीयांच्या मनाची मशागत या ऋषीमंडळाने केली आहे आणि आजही विविध 'स्मृतींच्या' मार्फत हे मार्गदर्शन चालूच आहे. ऋषी हेही आपल्यासारखेच हाडामासाचे मनुष्य होते पण, आपल्या ज्ञानसाधनेतून, कर्मयोगातून उन्नत अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते. या विकासाची अवस्था इतकी उच्च की स्वतः सृष्टीकर्त्यालाही यांच्या चरणाजवळ बसून ज्ञानार्जन करण्याचा मोह वेळोवेळी व्हावा. या ऋषीपरंपरेतलं एक श्रेष्ठ कुळ म्हणजे 'भार्गव'. भृगु ऋषींपासून याची सुरूवात म्हणून याला भार्गव म्हटले जाते. या भृगुंचे पुत्र ऋचिक. ऋचिकांचे पुत्र जमदग्नी. जमदग्नींचे पुत्र परशुराम. या चार महान तपस्वींच्या जीवनकार्यावर राजीव पुरूषोत्तम पटेल लिखित आणि विहंग प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेली कादंबरी म्हणजे "वैदिक".       वैदिक वाड्मयाचा अभ्यास हा...

नाही नियम तरीही...

Image
 ' ब्लाॅकबस्टर' हे घरगुती मनोरंजन क्षेत्रातल्या एका दादा कंपनीचं नाव. साल होतं साधारण २०००.  त्यावेळी या कंपनीचे भांडवली बाजारातलं मुल्य होतं तब्बल सहा अब्ज अमेरिकन  डाॅलर. आणि त्यावेळी जगभरात ब्लाॅकबस्टरचे जवळजवळ नऊ हजार दुकाने होती. केवळ दोन वर्षंच आगोदर स्थापन झालेली एक छोटी कंपनी ती डबघईला आलेली होती. ब्लाॅकबस्टरने आपल्याला पदरात घ्यावं म्हणून ती छोटी कंपनी प्रयत्नशीलही होती. पण दुर्दैवाने ब्लाॅकबस्टर सोबत काही तिचा पदर जुळला नाही. हा व्यवहार होऊ शकला नाही म्हणून त्या छोट्या कंपनीने आपल्यात हळूहळू काही बदल केले. ब्लाॅकबस्टर मात्र आपल्यात काहीही बदल करायला तयार नव्हती. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ब्लाॅकबस्टरने २०१० साली आपली दिवाळखोरी जाहीर केली. २०१९ साली ब्लाॅकबस्टरचं फक्त एकच दुकान शिल्लक राहीलं. दरम्यानच्या काळात त्या छोट्या कंपनीने स्वतःतच काही महत्वपूर्ण बदल केले. २०१२ नंतर मोबाईल अॅपच्या माध्यमातून आॅनलाईन चित्रपट, वेबसिरीजचं प्रसारण सुरु केलं. स्वतःचे चित्रपट ,वेबसिरीजची निर्मीती करायला सुरुवात केली. २०१९ हे तेच साल होतं ज्यावेळी या छोट्या कंपनीची निर्मिती अस...

साहित्य संगीत सिनेमा - २०२०

Image
२०२० या सालाने आनंद दिला असं जर कुणी म्हणालं तर,  त्यावर  कुणाचाच  विश्वास बसणार नाही! सक्तीच्या टाळेबंदीमुळे माझं मात्र कचकावून वाचन, सिनेमे, वेबसिरिज पहाने जेव्हढं या वर्षी झालं आहे ते पुन्हा होणे नाही! या वर्षाची सुरूवात दमदार झाली होती. वीणाताईंच्या घरी मुक्कामी असताना झडलेल्या वाद विवादांनी चांगलीच तरतरी आली होती. पण नंतर पुढच्याच महिन्यात टाळेबंदी सुरू झाली आणि आर्थिक बाबतीत माझं चांगलच कंबरडं मोडलं. शेती आहे म्हणून तगलो अन्यथा ... हा 'अन्यथा' फार अस्वस्थ करतो मला आजही. करोना झालेल्या कित्येक मित्रांचे नातेवाईक गेले, माझेही काही नातेवाईक गेले. या सर्व नकारात्मक पार्श्वभूमीवर एकच कोणती आनंदाची गोष्ट घडली असेल तर ती आहे वाचन, सिनेमे आणि वेबसिरिज पाहणे हे होय!  वाचनाच्या, पाहण्याच्या, लिखाणाच्या दृष्टीने हे वर्ष कमालीचं सुखद गेलंय. त्याच आनंदाचा हा धावता धांडोळा. टाळेबंदीत असेल किंवा ती शिथिल झाली त्यावेळी मला कित्येक लोकांनी, मित्रांनी पुस्तके पाठवली त्याबद्दल त्यांच्या ऋणातच मला रहायला आवडेल. यावर्षीचा शेवट तर फार गोड झालाय सातआठ महिन्यापासून अमेरिकेच्या इतिहासा...